• 54
  • 1 minute read

अमेरिकेतील पहिल्या चार श्रीमंत व्यक्ती खालील मीडियाचे मालक, चालक आहेत.

अमेरिकेतील पहिल्या चार श्रीमंत व्यक्ती खालील मीडियाचे मालक, चालक आहेत.

Elon Musk: X
Larry Ellison: CBS, likely takeover of TikTok 
Jef Bezos: Washington Post, Twitch 
Mark Zuckerberg: Facebook, Instagram, Whatsapp 

इतरही अनेक आहेत. उदा रुपर्ट मरडोक वगैरे 

यातील काहींची फुटप्रिंट जागतिक आहे. उदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 

कोट्यावधी लोकांनी काय वाचायचे, बघायचे, ऐकायचे आणि मुख्य म्हणजे विचार कसा करायचा हे हाच मिडिया ठरवत असतो. 
____

आज जगातील अमेरिकेसकट अनेक देशात असंतोष धुमसतो आहे. त्याची मुळे टोकाची आर्थिक, संध्याची विषमतेमध्ये आहेत. ती गेल्या ४० वर्षातील नव उदारमतवादी धोरणांची परिणीती आहे हे अनेक अभ्यासक दाखवून देत आहेत. 

नवउदारमतवादी धोरणांची ढकलशक्ती आणि लाभार्थी दोन्ही याच व्यक्ती आणि कॉर्पोरेट राहिल्या आहेत 
_____

याच कॉर्पोरेट आजच्या काळातील कोट्यावधी जनतेच्या मनातील असंतोषाला व्यक्त करणारे, त्यांना त्या त्या इश्यूवर संघटित होण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. ते अर्थातच त्यांची लोकशाही प्रणाली आणि सामान्य नागरिकांप्रति बांधिलकी आहे म्हणून नाही. त्यांचा तो धंदा आहे. नमूद करायचा भाग हा की त्यांचा त्या प्लॅटफॉर्मवर एखादी कंट्रोल आहे. काही क्षणात कळ फिरवून ते आपला access बंद करू शकतात. 

या अनेक देशात लोकशाही अजूनही आहे. त्या निवडणुकात नागरिक मतदारांमधील असंतोष मतपेटीद्वारे व्यक्त होतो अशी थियरी तरी आहे. हीच मंडळी आणि कॉर्पोरेट निवडणुकांमध्ये कोण निवडून येणार यावर निर्णायक प्रभाव पाडत आहेत. 

भारतातील मिडिया मालकांची आणि निवडणूक निधी पुरवणाऱ्यांची यादी आपल्याला माहीत आहे. 

असंतोषाचे जनक, असंतोषाला प्लॅटफॉर्म देणारे आणि असंतोष निवडणुकीद्वारे व्यक्त होताना त्याचे रिझल्ट्स काय असतील हे ठरवणारे एकच आहेत. 

आजच्या जगातील हा सर्वात मोठा संरचनात्मक विरोधभास (structural contradiction) आहे. 

संजीव चांदोरकर (२४ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *