• 9
  • 1 minute read

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?

      राज्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या कक्षेत राहिलेले नाही. मंत्र्यांना पोलिस रक्तबंबाळ होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी चोप देत आहेत. पाखंडी धर्म व्यवस्थेत बुवाबाजी आणि कर्मकांडाच्या नावाखाली महिलांचे मानसिक, शारिरीक शोषण खुलेआमपणे सुरू असून यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. हे नीच कृत्य करणाऱ्यांवर शासन आणि प्रशासनाचा वरदहस्त आहे. अशी एक नव्हे शेकडो उदाहरणे राज्यभर आहेत. दलाल व समाजकंटकांचा शासन व प्रशासनात सुळसुळाट सुरू असल्याने कसलीच गोपनियता राहिलेली नाही. मंत्र्यांचे बंगले आणि बेडरूम ही सुरक्षित राहिले नाहीत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला उभे करण्याचे काम विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात सुरू आहे. शंभुराजे देसाई, मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनी दिलेला चोप आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानातील बेडरूमधील व्हिडिओ वायरल झाल्याने स्पष्ट झाले आहे. कायद्याचे राज्य, गुड गव्हर्नन्स हे आता कायद्यावर आणि बोलण्यासाठी ही राहिलेले नाही. 
         राज्याचे मंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सहकारी असतात व हे मंत्री म्हणजे सरकार ही असते. या मंत्र्यांना म्हणजे सरकारला सरकारच्याच पोलिसांनी खुलेआम चोप दिला. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन ६५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आणखी एका दशकानंतर या स्थापनेचा अमृत महोत्सव असेल, पण पोलिसांनी मंत्र्यांना चोप दिल्याची घटना महाराष्ट्रच काय बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात ही घडल्याचे अद्याप ऐकिवात नाही. भाजपच्या सत्ताकाळात हे सारे घडत आहे. घडवून आणले जात आहे. सत्तेची लालसा आणि शत प्रतिशत भाजपा, यासाठी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करण्याचा हा प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक केला जात आहे.
       मुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्षनेते, तसेच विधिमंडळ व संसद सदस्यांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून सरकारी निवासस्थाने देण्याची प्रथा आपल्या देशात आहे. या निवासस्थानात अनेकदा अनेक बेकायदेशीर कृत्य झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पण नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ ज्या प्रकारे वायलर झाले आहेत, तसे या अगोदर कधी ही झालेले नाही. २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी बनविलेला एक व्हिडिओ वायलर झाला होता. त्या व्हिडिओत अमृता फडणवीस या रियाज अली या टिक टॉक आर्टिस्टसोबत ” आज मैने मूड बना लिया है ” या पंजाबी गाण्यावर मूडमध्ये नाच करताना दिसल्या आहेत. टिक टॉक हे माध्यम बदनाम असल्याने त्यावर याच काळात बंदी ही घालण्यात आली होती. पण याच माध्यमावरील आर्टिस्ट सोबत सरकारी निवासस्थानात व्हिडिओ बनविण्यात आला व तो वायलर ही करण्यात आला होता. हे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते. पण प्रसिद्धी मिळविण्यासाठी ते सारे करण्यात आले. नैतिकतेची चाड आणि भान नसल्याचे हे एक उत्तम उदाहरण फडणवीस परिवाराने पुरोगामी महाराष्ट्रा समोर उभे केलेले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत हे बसत नसले तरी संघाच्या परंपरेला साजेसे आहे.
            तर आज त्या पुढे जाऊन फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ धमाल करीत वायलर झाला आहे. फडणवीस यांचे राजकारण यास जबाबदार असल्याने या सत्तेच्या माध्यमातून ते महाराष्ट्राला कुठे घेऊन जात आहेत ? हा गंभीर व तितकाच चिंताजनक प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आहे. याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असून फडणवीस यांच्या या उद्योगांना वेळीच लगाम घातला नाहीतर यांचे आणखी गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. यात काही शंका नाही.
          महाराष्ट्राच्या राजकारणात व विधिमंडळात नरहरी झिरवळ वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करीत असले तरी शरद पवार यांच्या प्रस्थापित राजकारणाशी ते जोडले गेले आहेत. तर जातीय समिकरण साधत राजकारण करण्यासाठी पवारांनी ही अशांना सत्तेत सहभागी करून संधी दिली. यातून झिरवळ सत्तेच्या मुख्य प्रवाहात आलेले असून आपल्या आदिवासी असल्याचा पुरेपूर फायदा ही ते उठवित आहेत. गेल्या वर्ष दीड वर्षांपूर्वी हे महाशय सपत्नीक जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्या साधेपणाचे व संस्कृतीचे दर्शन घडविले होते. त्यांचा हा दौरा खूप चर्चेचा विषय ठरले होते. अन आजच्या व्हिडिओ सारखीच त्यावेळी राज्यभर चर्चा झालेली होती. पण सत्तेचा माज, मस्ती काय असते. ते आता वायलर झालेल्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसून आले आहे.  
       
           अजित पवार गट फडणवीस यांचे सॉफ्ट टार्गेट…..
 
           झिरवळ यांच्या वायलर व्हिडिओत जो पवन यादव दिसत आहे, तो तृतीयपंथी आहे. त्याचा वावर मंत्र्याच्या निवासस्थानात आणि बेडरूमपर्यंत बेधडकपणे सुरू आहे. अन हा वावर केवळ झिरवळ यांच्यासोबतच नाहीतर अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानात असाच व्यवहार राहिला आहे. हे आता उघड झाले आहे. हे प्रकरण केवळ नुसता वावर एवढ्या पुरताच मर्यादित नाही. तर आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगपर्यंतचा राहिलेला आहे. पवन यादव याचे सख्खे भाऊ रवी यादव यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, या प्रकरणाचा अधिक तपास झाला तर अनेक मंत्री आणि त्यांचे असे व्हिडिओ बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र तपास होईल का ? तशी इच्छा शक्ती प्रशासनाची आहे का ? तर याचे उत्तर नाही असाच आहे. मात्र जे फडणवीस आणि भाजप, संघाच्या टार्गेटवर आहेत त्यांच्याबाबतीत हे होऊ शकतो.
          अशोक खरात असेल अथवा झिरवळ यांचा व्हिडिओ असेल असाच वायलर झालेला नाही. या प्रकरणात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस यांचे सॉफ्ट टार्गेट आहे. अजित पवार यांना टार्गेट करून त्यांच्या काटा काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. अशोक खरात प्रकरणात खरातच्या इतक्याच दोषी रुपाली चाकणकर आहेत. हे मान्यच. पण या प्रकरणात त्या एकट्याच आहेत, असे ही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील ही आहेत. त्यांनी आपल्या मुलासोबत रक्ताने अंघोळ केल्याची चर्चा आहे. मग त्याचा या प्रकरणी तपास का नाही. या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या सर्वांची नावे जाहीर केली पाहिजेत. जनतेसमोर सर्वच आले पाहिजे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मणिपूरमध्ये बलात्कार झालेल्या महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही. मात्र ते अशोक खरात यांना भेटतात. ही भेट नेमकी कशासाठी झाली ? हे ही बाहेर येणे गरजेचं आहे. मात्र हे कधीच बाहेर येणार नाही. 
          शिंदे गटाचे दीपक केसरकर, खुद्द एकनाथ शिंदे अशोक खरात यांच्याशी संबंधित आहेत. हे संबंध नेमके कुठल्या पातळीपर्यंत आहेत याचा ही तपास होणे गरजेचे असून ते ही जनतेला कळले पाहिजे. या शिवाय भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील आणि विधिमंडळातील तीन चार डझन आमदार, तितकेच प्रशासकीय अधिकारी ही अशोक खरात यांच्या संपर्कात होते. मात्र त्याबाबत विधिमंडळात चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन पाळले ? हे मौन का बाळगले गेले. महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या प्रकरणी मुख्यमंत्री का बोलत नाहीत. हा प्रश्न सरकारच्या भूमिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो.
        
 अशोक खरात व झिरवळ प्रकरणी फडणविसांचे मौन चिंताजनक….!
 
           अशोक खरात आणि झिरवळ यांच्या व्हिडिओची चर्चा महाराष्ट्रात एपस्टीन फाईल प्रमाणे सुरू आहे. खरात प्रकरणात तर रोज पिडित महिला पुढे येत असून त्या तक्रारी करीत आहेत. पवन यादवचा अतिशय कडक बंदोबस्त असताना मंत्र्यांच्या निवासस्थानात बेधडक वावर कसा काय आहे. बेडरूममधील व्हिडीओ कोण काढतोय ? ते वायलर कसे काय होऊ शकतात. हे सर्व होताना निवासस्थानातील सुरक्षा व्यवस्था नेमकी काय करीत आहे. याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही ते महत्त्वाचे आहे. पण याबाबतीत मुख्यमंत्र्यांचे आणि तेच गृहमंत्री असल्याने त्यांचे मौन चिंताजनक आहे. 
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक खरात व झिरवळ या दोन्ही प्रकरणाकडे किती गंभीरपणे पाहत आहेत, याबाबतीत शंका निर्माण झालेली आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून अशोक खरात हा लिंग पिसाट महिलांचे लैंगिक शोषण करीत असताना त्याच्या दरबारात मंत्र्यांचा, आमदारांचा आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर राहिला आहे. खरातने जे धाडस दाखवत हे कांड केले आहे, शासन व प्रशासनाचा पाठिंबा असल्यामुळेच केले आहे. या पाच वर्षांच्या काळात किमान चार वर्ष फडणवीस यांच्याकडेच गृह विभाग आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी त्यांची सुद्धा आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला जात असेल, घेतला जात असेल, तर शासन व्यवस्थेचा प्रमुख आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचा ही राजीनामा मागितला पाहिजे. घेतला पाहिजे. अन नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तो दिला ही पाहिजे. पण या सरकारकडून, फडणवीस यांच्याकडून तशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरेल. फडणवीस असो की अन्य मंत्री, आमदार अथवा प्रशासकीय अधिकारी यांची या अशोक खरात प्रकरणात नक्कीच चौकशी होईल, पण जे फडणवीस व सरकारला नको आहेत. संपवायचे आहेत त्यांचीच चौकशी होईल. बाकी कामाचे व फायद्याचे आहेत. ते कितीही गुन्हेगार असले तरी त्यांना वाचविले जाईल. झिरवळ हे ही आपल्या किती कामाचे व फायद्याचे आहेत ? हेच ठरवून त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राला कलंकित करून हादरवून सोडणाऱ्या या दोन्ही प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत. हेच या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
…..
………. राहुल गायकवाड 
 
9967380268
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…
महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान! महाड येथे केलेल्या चवदार तळ्याचा मुक्तीसंग्राम, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मसंगर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *