राहुल गांधी ने "हायड्रोजन बाँब" फोडला, एकदाचा. खुप दिवसांपासून फोडणार फोडणार चालले होते. मुख्य प्रश्न आहे, आता पुढे काय ?
एका बाजुला तुम्ही निवडणूक आयोग आणि भाजप यांनी मिळुन देशाच्या निवडणूक प्रक्रियामध्ये घोटाळे करून देशात आणि अनेक राज्यात सरकार स्थापन केले असे म्हणताय. आणि दुसऱ्या बाजुला तोच निवडणूक आयोग घेत असलेल्या निवडणुकांमध्ये, निवडणूक प्रक्रियामध्ये सहभागी होता, ह्याचा अर्थ काय ? जेव्हा तुमच्या जवळ निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांचे ढीगभर पुरावे आहेत, ते कसे भाजपला निवडणूक जिंकून देतात हे तुम्हाला माहीत आहे, मग हे सगळं माहीत असुनही तुम्ही घोटाळेबाज निवडणूक आयोग घेत असलेल्या बिहार च्या निवडणुकी मध्ये सहभागी का झालात ? तुम्ही निवडणुकीवर बहिष्कार का नाही केला ?
तुम्हाला म्हणजेच राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला जेव्हा असे माहित आहे की 2024 मध्ये झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळे करून भाजप ने ह्या राज्यात सरकार बनवले आहेत , तेव्हा काँग्रेस ह्या राज्यात आपल्या सर्व आमदारांना राजीनामा द्यायला लावुन तिथे पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात ह्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन का करत नाही ? घोटाळे करून स्थापन झालेल्या विधानसभांमध्ये सहभागी होऊन तुम्ही निवडणूक आयोगाला आणि निवडणूक प्रक्रियेला मान्यता देत आहात की नाही ?
एका बाजुला निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यां विषय बोलने आणि दुसऱ्या बाजुला निवडणुकीत सहभागी होणे, निवडणून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांना, घोटाळ्यातून बनलेल्या विधानसभेत कायम ठेवने, निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांविरोधात जनआंदोलन न करणे, हा काँग्रेसचा, राहुल गांधीचा दुटप्पीपणा आहे.
राहुल गांधीने आता आणखी “हायड्रोजन बाँब” ची आतिषबाजी न करता, त्वरीत महाराष्ट्र आणि हरियाणातील आपल्या आमदारांना राजीनामा द्यायला सांगुन, भविष्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकून, निवडणूक आयोगाविरोधात आणि भाजप सरकार विरोधात जनआंदोलन सुरू करायला पाहिजे. अन्यथा राहुल गांधींना जनता सिरीयसली घेणार नाही.