• 40
  • 1 minute read

आयपीएलच्या निमित्ताने !

आयपीएलच्या निमित्ताने !

आयपीएलच्या निमित्ताने !

त्यांच्यावर टीका करू नका ; त्यांचा हेतू विधायक आहे. ते तुम्हाला स्थितप्रज्ञ बनवत आहेत !
 
सध्या आयपीएल सुरु आहे. काही आठवड्यापूर्वी सलामीच्या सामान्यांमध्ये ५२ कोटी दर्शकानी टीव्ही आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ३२ कोटी मिनिटे मॅचेस बघितल्या ; आयपीएलची सर्व सिझनची आकडेवारी बघून आपली बुबुळे बाहेर येतील 
 
आणि हा पुरावा दिला जात आहे की भारतात स्पोर्ट्स इंडस्ट्री वेगाने वाढत आहे हे सांगण्यासाठी 
 
हे घडत आहे ज्यावेळी जवळपास प्रत्येक लहान मोठ्या शहरात मुलांच्या खेळण्यासाठीच्या मैदानांवर लँड माफिया आक्रमण करत आहेत.मोजक्या खाजगी / कॉर्पोरेट शाळा सोडल्या तर लाखो शाळांमधील मुलामुलींना साधे खेळ खेळण्यासाठी छोटे, दगड धोंडे नसलेले, चांगली माती असणारे मैदान देखील नाहीये. 
 
खेळाची मैदाने , बागा , मोकळ्या जागा आक्रसत आहेत. त्यावर असलेली रिझर्वेशन्स जनतेने निवडून दिलेले जनप्रतिनिधी उठवत आहेत. सर्व काही कायद्याला धरून !  
हा विरोधाभास कोट्यवधी लोकांच्या अंगवळणी पाडला जात आहे , टोकाच्या विरोधाभासाचे न्यू नॉर्मल नकळत गळी उतरवले जात आहे ; खाली फक्त तीन उदाहरणे. या सगळ्यांचे स्केल आठवून बघा. दडपण येईल. 
 
आर्थिक, भौतिक ओढग्रस्तीमुळे कोट्यवधी नवरा बायकोचे, आईवडील मुलांचे, रक्ताचा नात्यांचे संबंध ताणलेले असताना 
 
टीव्ही मालिकांद्वारे अस्तित्वात नसलेली एकत्र कुटुंबे , त्यातील सासू-सुना , नणंद-भावजयी, त्यांच्यातील नकली प्रेम लुटुपुटुची भांडणे दाखवून कौटुंबिक मूल्ये रुजवण्याचा दावा केला जात आहे.  
 
कोट्यावधी कुटुंबे, अल्प आणि बेभरवशाचे उत्पन्न , बेरोजगारी, अपुरे वेतनमान , किफायतशीर न राहिलेली शेती, महागाई, सतत वाढत्या कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेली असताना. 
 
वर्तमानपत्रे , टीव्ही , सोशल मीडियावर दागिने, नवनवीन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, फॅशन इंडस्ट्री, खाद्यपदार्थ यांच्या आकर्षक जाहिरातींचा मारा केला जात आहे 
ग्रामीण भागात आतबट्याची शेती करावी लागणाऱ्या तरुणांची लग्ने होत नाहीत , तर शहरी भागात नोकरी / नियमित उत्पन्न नसळ्यामुळे लग्ने करू शकत नाहीत.  
 
त्यांना नट / नट्याच्या लफड्याच्या , लग्नाच्या बातम्या, त्यांना झालेल्या छोट्या बाळांच्या, त्यांनी विकत घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरांच्या / बंगल्यांच्या , अंतर्गत सजावटीच्या …चित्रफिती / रसभरीत वर्णने दाखवून जिभल्या चाटायला लावले जात आहे 
 
आजूबाजूला बघितले तरी अशा विरोधाभासाची अनेक उदाहरणे समोर येतील. कोणीही आम्हाला खेळण्यासाठी मैदाने द्या, आम्हाला उपभोगाच्या वस्तू खरेदी करण्याएवढी क्रयशक्ती द्या…अशी मागणी लावून धरत नाहीत. 
 
त्यांना दोष देऊ नका. त्यांचा हेतू स्वच्छ असतो ; तो हेतू असतो तुम्हाला स्थितप्रज्ञ बनवण्याचा ! 
 
मानवी दुःख , यातना , भावनिक गुंतवणूक हे सारे भ्रम आहेत हे तुमच्या मनावर बिंबवण्याचा !
 
तुमचे प्रश्न तुमचे व्यक्तिगत प्रश्न आहेत ; कदाचित दुर्दैवाचा फेरा असेल. तुमच्या प्रश्नाचा शासनाच्या आर्थिक धोरणांशी / त्याचा ओमिशन्स आणि कमिशन्सशी काहीही संबंध नाही हे तुम्हाला शिकवण्याचा त्यांचा हेतू असतो. 
 
दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधण्याचा, स्वतःचे दुःख विसरायला लावण्याचा महान, उदात्त विचार….. 
 
संजीव चांदोरकर
0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *