• 33
  • 1 minute read

आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश – ३३ हजार हरकतींचा टप्पा पार

आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश – ३३ हजार हरकतींचा टप्पा पार

आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश - ३३ हजार हरकतींचा टप्पा पार

पुणे: महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत पुकारलेल्या लोकचळवळीला मोठे यश मिळत आहे. ‘महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण पुनर्विलोकन समिती’ (पद्मपाणी फाउंडेशन) तसेच राज्यातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन्ही विचार प्रवाहातील आतापर्यंत प्रशासनाकडे ३३,००० पेक्षा अधिक ईमेलद्वारे हरकती प्राप्त झाल्या आहेत. ही संख्या समाजातील तीव्र अस्वस्थता आणि जागृतीचा मोठा पुरावा आहे.
 
आज ‘पुनर्विलोकन समिती’चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बार्टी (BARTI), पुणे येथील निबंधकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून दोन अत्यंत महत्त्वाची फलिते समोर आली आहेत:
१. प्रशासनाकडून अधिकृत पोहच (Acknowledgment): उपवर्गीकरणाबाबत आक्षेप नोंदवणाऱ्या प्रत्येक ईमेलला आता प्रशासनाकडून अधिकृत ‘Reply’ किंवा पोहच दिली जाईल, असे आश्वासन निबंधकांनी दिले आहे. यामुळे प्रत्येक हरकतीची अधिकृत दप्तरी नोंद होणार आहे.
२. बदर समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी: न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल तयार करताना अशी कोणतीही पारदर्शक प्रक्रिया राबवली नाही, तसेच अहवाल तयार करताना जनभावना जाणून घेण्याऐवजी गोपनीयतेला अधिक महत्त्व दिले, याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बदर समितीने जनतेला पुरेसे ऐकून न घेता दिलेला हा ‘गोपनीय’ अहवाल नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा आहे.
राहुल डंबाळे यांनी यावेळी प्रशासनाला इशारा दिला की, “प्रशासनाने या ३३ हजार हरकती केवळ तांत्रिक न मानता, त्यामागील सामाजिक भावना आणि कायदेशीर मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा. ज्याप्रमाणे आता ३३ हजार दोन्ही विचार प्रवाहातील लोक स्वतःहून ईमेल करत आहेत, तशी संधी बदर समितीने का दिली नाही? केवळ राजकीय हेतूने आणि शास्त्रीय डेटाशिवाय केलेले उपवर्गीकरण समाजात फूट पाडणारे ठरेल.”
या लोकचळवळीला अधिक धार देण्यासाठी आणि पुढील कायदेशीर रणनीती ठरवण्यासाठी येत्या २६ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे ‘संयुक्त गोलमेज परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
“आरक्षणाचे घटनात्मक अस्तित्व टिकवण्यासाठीचा हा लढा ३३ हजार हरकतींवर थांबणार नाही, तर तो अधिक तीव्र केला जाईल,” असा निर्धार राहुल डंबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.
0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *