मुंबई : लता मंगेशकर असो अथवा तिचे बंधू अथवा भगिनी हे सारे कुटुंब असंवेदशील आहे, हे एक वेळा नाही तर अनेक वेळा याच कुटुंबाने अनेक वेळा आपल्या व्यावहारातून दाखवून दिले आहे. दया, माया, धर्मदाय अथवा उपकारांची जाणीव या साऱ्या गोष्टीं व मंगेशकर कुटुंब यांचा दुरूनही संबंध नाही. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलला ज्यांनी जागा दिली त्यांच्याकडून या कुटुंबाने बाजार भावाप्रमाणे बिल वसूल केले आहे. उपकारांची जाणीव न ठेवणारे हे कुटुंब आहे, अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर सोशल मिडियावर व्यक्त होत आहे.
प्रस्तुतीसाठी आलेल्या एका महिलेवर डिपॉझिट वेळेत भरले नाही म्हणून या हॉस्पिटलमध्ये या महिलेला दाखल करून घेतले नाही. परिणामी उशीर झाल्याने तिने बाळांना जन्म दिला पण ती आपल्या बाळाला पाहण्यासाठी जिवंत राहिली नाही. यास फक्त अन् फक्त या मंगेशकर कुटुंबाची असंवेदनशीलताच जबाबदार आहे. त्यामुळे हे कुटुंब किती ही मोठे असले तरी हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर खुनाचा व दोन अनाथ बाळांना अनाथ करण्याबाबतचा गुन्हा सोशल मिडियावर व्यक्त होणाऱ्या भावनांचा विचार करून नोंदविला गेला पाहिजे. कारण येथे एका महिलेचा खून झाला असून दोन बाळ अनाथ झाली आहेत. आपल्या सुखासाठी व एकांतवासासाठी मंगेशकर कुटुंबाने सरकारी कामात अडचण निर्माण करून जनतेच्या विकास कामांना विरोध केल्याची उदाहरणे ही आहेत. तर हॉस्पिटलसाठी अनेक सरकारी सुविधा घेवून त्या बदल्यात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे हा निचपणा आहे. या कुटुंबाने तो अनेकवेळा केला आहे. त्यामुळे सरकारने या हॉस्पिटलला दिलेल्या सुविधा काढून घ्याव्यात, जमिनीची किंमत आजच्या बाजारभावाने वसूल करावी, अन् नुकत्याच घडलेल्या प्रकरणात गुन्हे दाखल करावेत.