औचित्य आणि अगत्य ••••••••••••••••••• २४फेब्रुवारी : जागतिक मुद्रण दिवस आणि बहिणाबाई चौधरी जन्मदिवस
गरजेतून मानवाने तंत्र शोधले. पहिली गरज उदरभरणाचीच होती. म्हणून शिकारीचे, पशुपालनाचे व शेवटी शेतीचे तंत्र शोधून तो स्थिर झाला. बारोमास हुकमी अन्न मिळण्याची हमी त्याच्या बुद्धीला चालना देऊन गेली. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व ते तंत्र छंदात बांधले. तेच पहिले मंत्र. ज्ञानाचे हे पहिले अमूर्तीकरण ‘श्रुती’वर होते. ऐकणे व कंठस्थ करणे व पुढच्या पिढीला ऐकवणे. याच ‘बोली’ला व्याकरणाचे नियम आले व ती ‘भाषा’ बनली. भाषेला लिपीबद्ध करण्यात यश आल्यावर ज्ञान संक्रमीत होऊ लागले. तरीही, ज्ञान मोठ्या प्रमाणात संक्रमीत करण्यासाठी मुद्रणकलेच्या शोधापर्यंत थांबावे लागले. १४५०ला जोहान गटेनबर्ग याने मुद्रणतंत्राचा (printing Press) शोध लावला. १३९८ला जन्मलेला गटेनबर्ग १…