• 53
  • 1 minute read

कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप

कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप

कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप

धुळे –जिल्हा परिषद धुळे येथील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, धुळे यांच्या कार्यालयात पंचायत समिती साक्री येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तथा कवी डॉ दिलीप लोखंडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त डॉ.गिरीश पाटील जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेचे मार्गदर्शक डॉ संजय पाटील यांनी प्रास्ताविकात डॉ दिलीप लोखंडे यांच्या सेवा कार्यातील कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला, तसेच साहित्य क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील कामाविषयी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना माहिती दिली.पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.हंसराज देवरे, सरचिटणीस डॉ.रमण गावित, कार्याध्यक्ष डॉ.नरहर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.शामराव कवडे, पदाधिकारी डॉ.सोहनलाल राठोड, डॉ.दीपक राजपूत, साक्री तालुका अध्यक्ष डॉ.शरद नांद्रे, डॉ.शेख धुळे, डॉ.किरण राठोड, डॉ.मंगेश सोनवणे शिरपूर, डॉ.ईश्वर देसले आदि उपस्थित होते.
शेवटी डॉ.रमण गावित यांनी सर्वांचे आभार मानले.
 
3Shares

Related post

माथे पर लगा कलंक छिपाने की नहीं मिटाने की जरूरत है – शूद्र शिवशंकर सिंह यादव

माथे पर लगा कलंक छिपाने की नहीं मिटाने की जरूरत है – शूद्र शिवशंकर सिंह यादव

मूलनिवासी मिशन से भी उम्मीद नहीं की जा सकती !  आज शूद्र मिशन के पक्ष में…
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली, १३ ऑगस्ट:…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *