• 29
  • 1 minute read

काँग्रेस मुक्त भारत नारा देत भाजपचा काँग्रेस युक्त प्रवास सुरु…!

काँग्रेस मुक्त भारत नारा देत भाजपचा काँग्रेस युक्त प्रवास सुरु…!

देशातील सर्वांत मोठा व धनवान पक्ष असलेल्या भाजपकडे लायक कार्यकर्ते, पदाधिकारी अन् उमेदवारांचा नेहमीच अभाव राहिलेला आहे. काँग्रेस मुक्त भारतचा नारा देत काँग्रेस युक्त भाजपचा प्रवास आता सुरू आहे. भाजपच्या 303 लोकसभा सदस्यांपैकी 167 लोकसभा सदस्य हे मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. तर यंदा होत असलैल्या लोकसभा निवडणूकीत भाजपने महाराष्ट्रातून ज्या 20 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अर्धे उमेदवार हे काँग्रेस पक्षाचेच नेते आहेत. याचा सरळ अर्थ हा आहे की आज ही भाजपकडे लायक उमेदवारांचा वणवा आहे. तसेच विरोधकांच्या घराणेशहीवर टीका करणाऱ्या भाजपने 20 पैकी ज्या 8 जणांना उमेदवारी दिली आहे. ते घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
भाजपकडे लायक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा वणवा आहे. मात्र EVM मशीनच्या मदतीने भाजप निवडणूक जिंकत आहे. तर देशाची संपत्ती विकून, इलेक्ट्रोरल बॉण्डसारखे घोटाळे करून भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी धन गोळा केले आहे. लोकशाहीत मतं विकत घेणे व निवडुण आलेल्या उमेदवारांना खरेदी करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरु शकतो. तो गुन्हा भाजप रोजच करीत आहे.
नंदुरबार येथून भाजपने पुन्हा हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्या काँग्रेस नेते व मंत्री राहिलेल्या व असलेल्या विजय गावित यांच्या कन्या आहेत. तर धुळे येथून उमेदवारी मिळालेले सुभाष भामरे यांच्या मातोश्री गोजरबाई भामरे या काँग्रेसच्या आमदार होत्या. स्वतः सुभाष भामरे हे ही काँग्रेसचे पदाधिकारी राहिले आहेत. दिंडोरी , भिवंडी व नांदेडमधून उमेदवारी मिळालेले अनुक्रमे भारती पवार, कपिल पाटील व प्रताप पाटील चिखलीकर है ही मूळचे काँग्रेसचे आहेत.
राहिला प्रश्न घराणेशाहीचा तर हिना गावित, स्मिता वाघ, सुभाष भामरे, रक्षा खडसे, अनुप धोत्रे, पियूष गोहिल, पंकजा मुंडे, रणजित नाईक निंबाळकर, सुजय विखे अन् प्रताप पाटील चिखलीकर हे राजकीय घराणेशाहीतुनच आलेले आहेत.
सांगलीतून उमेदवारी मिळालेले संजयकाका पाटील, लातूरमधून उमेदवारी मिळाली सुधाकर शृगारे, अहमनगरमधून उमेदवारी मिळालेले सुजय विखे पाटील, पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे ही काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत. तर धुळ्यातून रामदास तडस यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असुन ते ही शेतकरी संघटनेचे नेते राहिलेले आहेत. तर माढा येथून उमेदवारी मिळालेले रणजित नाईक निंबाळकर यांचे वडील हिंदुराव शिवसेनेचे नेते राहिले आहेत. जाहीर झालेल्या भाजपच्या 20 उमेदवारांमध्ये 11 जण हे काँग्रेस व अन्य पक्षातून आले असून मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना या उपऱ्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…
वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

“राजकारण हा काही आट्यापाट्याचा खेळ नाही. तो आमच्यासाठी संग्राम आहे, तो आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *