असा सवाल करीत ग्रीसमधले कामगार, विद्यार्थी व जनता एकजूटीने सलग दोन वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत.
काय घडलंय नेमकं ?
तर ग्रीसमध्ये टाम्पी येथे दोन रेल्वेगाड्यांची (एक मालगाडी व दुसरी ट्रेन) समोरासमोर टक्कर होऊन ५७ लोक मृत्युमुखी पडले. ज्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. हा अपघात नाही. शासनाचा हलगर्जीपणा आहे. सार्वजनिक परिवहनाकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आहे. खाजगीकरणाला सरकार उत्तेजन देत आहे. नफेखोरी ही एकमेव प्रेरणा आहे.
आंदोलनाची घोषणा आहे : Our Lives Against Your Profit’
आपल्या सामाजिक जीवनाचा जो ‘कुंभमेळा’ झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर ग्रीस मधील सुशिक्षित जनता व जागृती पाहता येईल. आपले सरकार सध्या आहे तेही सार्वत्रिक व औपचारिक शिक्षण मोडीत काढायला निघाले आहे. कुठून येणार जनतेत जागृती ? साहित्य संमेलनाच्या मंचावरून तारा भवाळकरांनी औपचारिक व सार्वत्रिक शिक्षणाला ‘आधुनिक पांडित्य’ म्हणून हिणवले आहे ! सरकारी खर्चाने संमेलन आणि सरकारची री ओढणारे आपले साहित्यिक ! जनता अज्ञानीच राहील याची दक्षता घेणारे !