- 169
- 1 minute read
गांधी जयंती… ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा बर्थ डे !
गांधी जयंती… ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा बर्थ डे !
2 ऑक्टोबर 2018.हाच इव्हीएम विरोधी आंदोलनाचा जन्मदिवस.या दिवशी लोकांचे दोस्त संघटनेतर्फे जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या कमळावर बसलेल्या पुतळ्यासमोर लोकांच्या दोस्तच्या पन्नासेक दोस्तानी इव्हीएम विरोधी उपवास आंदोलन केले.एकच घोषणा दिली…ईव्हीएम हटाव,देश बचाव !
2019 नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला.जनता दल ( सेक्युलर ) च्या चर्चगेट येथील कार्यालयात माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी इव्हीएम विरोधात बैठक आयोजित केली.या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी इव्हीएमचा घोळ आकडेवारीनिशी सर्वांसमोर मांडला.त्यातून जन्म झाला इव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचा. लोकांचे दोस्त रवि भिलाणे,जनता दलाच्या ज्योती ताई बडेकर,सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे राष्ट्रीय निमंत्रक झाले.या चौघांनी पुढाकार घेऊन गल्ली ते दिल्ली सभा,बैठका,मोर्चे निदर्शने, इव्हीएम विरोधी महा उठाव आयोजित करून इव्हीएम विरोधात देशभर जनजागृती केली.अर्थात मुंबई,महाराष्ट्र आणि देशातील असंख्य विद्यार्थी, दलित,आदिवासी,महिला,युवक संघटना,भाजप विरोधी डावे,पुरोगामी पक्ष,आंबेडकरी पक्ष संघटना आणि सर्व सामान्य नागरिकांनी हा प्रश्न उचलून धरला.त्या प्रत्येकाचे नावानिशी योगदान लिहिणे केवळ अशक्य.राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण,काँग्रसचे भाई जगताप,लोकांचे दोस्त,मैत्रकुल,विविध विद्यार्थी,सामाजिक संघटना,कार्यकर्ते… कोणा कोणाची नावे लिहू…
इव्हीएम विरोधी आंदोलनाने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले.संयुक्त पत्रकार परिषद घेतली.मात्र काही नेत्यांच्या यू टर्न मुळे आंदोलन फसले.पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी दिल्लीतील काही वकिलांनी पुढाकार घेऊन आंदोलन तेज केले.पण राजकीय इच्छाशक्ती अभावी त्याचा निर्णायक रिझल्ट बघायला मिळाला नाही.
आज महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने या सर्व आठवणी ताज्या झाल्या.2 ऑक्टोबर 2018 रोजी इव्हीएम विरोधी आंदोलनाची सुरुवात करताना जे सोबत होते त्यांचीही आठवण काढणे क्रमप्राप्त आहेच.लोकांचे दोस्त सुनिल साळवे,बाळासाहेब उमप,पोपट सातपुते,सुरेंद्र आणि ममता अढांगळे,प्रदीप सुर्यवंशी,विनायक मगरे,नसीम शेख,इंदुमती भालेराव, दिपक नाईकनवरे आणि त्यांची पत्नी, आदल्या दिवशी माझ्यासोबत मुंबईतील महात्मा गांधींच्या पुतळ्याचा शोध घेत फिरणारा संतोष गवळी,जुहू पोलिसांनी माझ्यासह नोटीस बजावली ते रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ निकाळजे, सत्शील मेश्राम तसेच आंदोलनासाठी सर्वप्रथम हजर झालेले पत्रकार राजा आदाटे, दिपक कैतके,दोस्तांच्या प्रत्येक आंदोलनाची दैनिक सकाळ मध्ये बातमी देणारे पत्रकार दोस्त संजय शिंदे,आंदोलनाचे बॅक ऑफिस सांभाळणारे भानुदास धुरी,प्रशांत राणे,लढाऊ बॅकबोन ज्ञानेश पाटील,संजीवनी नांगरे,सुनंदा नेवसे,दैवशाला गिरी,संदेश गायकवाड,संध्या पानसकर,प्रवीण मसुरकर,राजू शिरधनकर,बाळासाहेब पगारे,अशोक विठ्ठल जाधव,अशोक सुर्यवंशी,मंगेश साळवी,सिताराम लवांडे…त्याचबरोबर सरकारी नोकरी सांभाळूनही आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रमुख कार्यकर्ते…अशा सगळ्यांची नावे लिहिणेही कठीणच.असंख्य दोस्तांची साथ होती.
त्या पहिल्या आंदोलनाकडे सगळ्याच प्रस्थापित नेते,कार्यकर्ते आणि पक्षांनी पाठ फिरवली होती. पण पाच पन्नास कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या त्या इव्हीएम विरोधी आंदोलनाचा मुद्दा आज पाच सहा वर्षांनी देशभरातील किमान पन्नास टक्के लोकांना पटला असून त्यासाठी ते प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करत असतात.यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती कोणती ?
आपण आपलं काम करत राहूया दोस्तांनो…गांधी जयंतीच्या सदिच्छा !!
– रवि भिलाणे,लोकांचे दोस्त