• 32
  • 1 minute read

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी!

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी!

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी!

गुजरात : गुजरातमधील सुरत येथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांची अत्यंत गंभीर स्थिती समोर येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
 
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट करत, “अब नही आउंगा दोस्त”, असे म्हणत रेल्वे स्टेशनकडे पळत जाणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
 
स्वतःला “विश्वगुरु” म्हणवणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला. गुजरातमध्ये गॅस सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून, यामुळे आतापर्यंत जवळपास 3 लाख मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत. या परिस्थितीमुळे देशभरात रिव्हर्स मायग्रेशन वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जीवघेण्या उन्हात मजुरांना 24 तास रांगेत उभे राहावे लागत असून, एवढ्या प्रतीक्षेनंतरही त्यांना रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नसल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचार व रॅलींमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत, सामान्य जनता भुकेने त्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “मुजरा मोदीच्या डान्सची किंमत देश चुकवत आहे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 
या ट्विटमुळे गुजरातमधील मजुरांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
 
0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *