• 90
  • 1 minute read

गौरव गोगाईनी लोकसभेत उडविल्या मोदी सरकारच्या चिंधड्या..!

गौरव गोगाईनी लोकसभेत उडविल्या मोदी सरकारच्या चिंधड्या..!

निर्लज्जपणाला ही एक ना एक दिवस स्वतःची लाज वाटते...! हे ओम बिर्ला, मोदी, शहा व भाजप सदस्यांच्या बॉडी लॉग्वेंजमधून स्पष्ट दिसतेय....!

          निर्लज्जपणाला ही एक ना एक दिवस स्वतःची लाज वाटतेच, तशीच अवस्था आज मोदी, शहा यांच्यासह सर्व मंत्र्यांची व भाजपची झालेली असून त्यांना लाज वाटू लागली आहे. अन त्यामुळे त्यांच्या देह बोलीत ( बॉडी लॉग्वेंज) कमालीचा बदल ही घडताना दिसत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेत्यांची अवहेलना करणारे, त्यांना बोलू न देणारे, त्यांची टिंगल टवाळी , अवमान, अपमान करणारे, अहंकारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि छोट्या छोट्या मंत्र्यांचा व सदस्यांचा साराच्या सारा अहंकार गळून पडल्याचे या अधिवेशनात दिसत आहे. सारा माज उतरलेला दिसतो आहे. अन हा अहंकार व माज केवळ विरोधी पक्ष नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच उतरलेला नाही. तर मोदी, शहा, राजनाथ सिंह, ओम बिर्ला व भाजप सदस्यांमधील निर्लज्जपणाला ही आता स्वतःहून स्वतःची लाज वाटू लागली आहे. हे सत्य आहे. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे गौरव गोगाई यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोबाल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशाच्या सीमांची सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि विदेश नीतीबाबतच्या धोरणांच्या त्यांनी चिंध्या चिंध्या केल्या. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या शहा, राजनाथ सिंह आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे चेहरे बघण्यासारखे होते. देशाच्या समोर अंतर्गत व बाह्य ज्या समस्या आणि आव्हाने उभी राहिली आहेत, त्यास सरकारची धोरणे व नीतीच जबाबदार असून सरकार या समस्या व आव्हाने जाणीवपूर्वक उभ्या करीत आहेत, असा आरोप ही गोगाई यांनी केला. 
          देश हित में हम सरकार से सवाल करेंगे…! सरकार से सवाल करना हमारा अधिकार है…! हे म्हणत गोगाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी सत्तापक्षाच्या सदस्यांमधील नैतिकतेलाच लाज वाटू लागल्याने ते गप्प होते. संसदेचे अधिवेशन सुरु होताच उपराष्ट्रपती जगदीप घनकड यांनी राजीनामा दिला. दिला म्हणण्या पेक्षा तो घेतला गेला, हे म्हणणे योग्य ठरेल. भाजप व सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही. हे दर्शविणारा हा राजीनामा आहे. पहलगाम, सिंदूर यात्रा व धनकड यांचा राजीनामा या संदर्भात अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमक प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत मोदींमध्ये नव्हती, त्यामुळेच ते संसद अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विदेश दौऱ्यावर निघून गेले होते. हा विदेश दौरा म्हणजे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नसल्याने केलेले पलायन होते. जन्मदात्या आईवडिलांचे घर असेल अथवा पत्नी जशोदाबेन असेल यांना सोडून पलायन हे ही जबाबदारीतून अंग काढून केलेले पलायनच आहे. अन् असे पलायन करणे त्यांचा उपजत गुण आहे.
            आपल्या खाजगी व राजकीय जीवनात त्यांनी अशी खूप पलायन केली आहेत. पहलगाम आतंकी हल्ल्यानंतर संसदेचे विशेष सत्र बोलविण्याची मागणी विरोधी पक्ष करीत होते. पण देशातील कुठल्याही समस्या व प्रश्नांची जबाबदारी घ्यायची नाही, हे ठरविलेल्या मोदींनी विरोधकांची ही मागणी मान्य केली नाही. पण ज्या भीतीने मोदींनी तेव्हा व आता ही पलायन केले होते, त्यापासून त्यांची व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सुटका नाही. काँग्रेस पक्षाचे गौरव गोगाई यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था, त्याबद्दलची धोरणे, विदेश नीती, युद्ध विरामबाबत सरकारने घेतलेली भूमिका या साऱ्यांना गोगाई यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सभास्थानी बसलेले मोदींचे शिपाई ओम बिर्ला यांची अवस्था या अधिवेशनात अतिशय केविलवाणी झालेली आहे. गोगाई सरकारवर प्रश्नांचा भडीमार करीत असताना ही त्यांची अवस्था एकदम केविलवाणी होती. मोदी, शहा, राजनाथ सिंह व डोबाल यांची धुलाई होताना ही, ती पाहण्या खेरीज अन्य कुठलाच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ओम बिर्ला, अमित शहा, अन मोदी भक्त सदस्य हे सारे बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.  
    
       बकवास पंतप्रधान, बकवास भाषण व निर्जीव चेहरे….!
 
        तसेच विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करण्याची हिंमतच मोदींमध्ये आता राहिलेली नाही. गोगाई, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आदीच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदींना सारखे पाणी प्यावे लागले. शब्द बाहेर पडत नव्हते. हे दृश्य विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करण्याचे बळ आणि नैतिकताच संपल्याचे लक्षण आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ” बीना पानी पिते ही मोदी की ” बॅन्ड बजायी, पर बारबार पानी पिकर भी मोदी कुछ बोल नहीं पाये. मोदींचे भाषण ऐकल्यावर असे वाटले की, इतका बकवास पंतप्रधान व इतके बकवास भाषण या अगोदर संसदेत कुठल्याच पंतप्रधानांनी केले नाही. बाके वाजले, पण सारेच्या सारे चेहरे निर्जीव वाटत होते. साऱ्या देशाने हे दृश्य आज लोकसभेत पाहिले. 
        खरे तर, संसदीय राजकारणात संसदीय मार्गाचा अवलंब करून विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करणे हे मोदींना कधीच जमले नाही व जमणार ही नाही. संसदीय राजकारणी म्हणून त्यांचा पिंड नाही. संसदीय राजकारणाचा अनुभव नसताना मोदी दोन दशके गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. पण या दोन दशकतातील त्यांचा कार्यकाळ हा असंसदीयच राहिलेला आहे. गेल्या ११ वर्षांपासून ते देशाचे पंतप्रधान आहेत, पण देशाच्या संसदीय राजकारणाला गौरव व अभिमान वाट्टेल, असे एक ही काम त्यांनी केलेले नाही. त्यामुळेच गेल्या 11 वर्षात त्यांनी एक ही पत्रकार परिषद घेतली नाही, हे ही एक पलायनच असून लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रश्नांपासून केलेले पलायन आहे. संसद अधिवेशनाची तारीख ठरली असतानाच विदेशी दौऱ्याचे नियोजन करणे, राष्ट्रपतीनंतर देशाचे दुसरे नागरिक असलेले उपराष्ट्रपती या पदावरील व्यक्ती राजीनामा देत असताना पंतप्रधानाचे देशात नसणे, या गोष्टी केवळ मोदीच्या सत्ताकाळतच शक्य आहेत. अन्य कुठल्या ही देशात अशी उदाहरणे सापडणार नाहीत. 
       
              ज्या भीतीमुळे मोदींनी पलायन केले होते, त्याचाच सामना आता संसदेत करावा लागतोय….!
 
            देशांतर्गत समस्या अधिक भेडसावत मोदीसमोर उभ्या असतात व त्यामुळे ते प्रचंड दबावाखाली असतात, त्यावेळी ते फेरफटका मारण्यासाठी विदेशी दौऱ्यावर जातात. यावेळी ही ते गेले होते. पहलगाम आतंकी हल्ला, सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, या हल्ल्यानंतर अगदी दिवसाढवळ्या आतंकवाद्यांचे गायब होणे, त्यानंतर भारतीय सैन्याने आतंकी ठिकाणावर केलेले हल्ले, त्या हल्ल्यातील नाकामी, युद्ध विराम करण्याचा मोदी ऐवजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय, त्यामुळे दुनियाभर मोदींची झालेली थू थू, मोदींनी दुनियाभर पाठविलेल्या खासदारांचे शिष्टमंडळ, त्यातील समोर आलेली निकामी, जागतिक पातळीवर फसलेली विदेशी धोरणे, त्यामुळे गेलेली पत, संविधान व लोकशाहीची होत असलेली पायमल्ली, देशांतर्गत धार्मिक तणावाचे वातावरण, त्यामुळे अल्पसंख्यांक समाजात निर्माण झालेली भिती, निवडणूक आयोगाचे संघीकरण, अदानी व अंबानींच्या माध्यमातून होणारी देशाची लूट, संघ व भाजप नेत्यांची द्वेषपूर्ण वक्तव्य आणि फसलेली सिन्दुर यात्रा आदी प्रश्नांचा भडीमार या अधिवेशनात विरोधकांकडून होणार हे निश्चित होतेच व होत ही आहे. 
          विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होणाऱ्या प्रश्नांचा सामना करायला लागू नये, त्यातून किमान ४ दिवस तरी सुटका मिळावी, यासाठी मोदींनी संसदेच्या अधिवेशनाच्या तारखा माहित असताना जाणीवपूर्वक हा विदेशी दौरा आखलेला होता. पण त्यातून सुटका मिळताना दिसत नाही. विरोधी पक्षांनी संसदेत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी द्यावीच लागणार आहेत. कारण हे प्रश्न केवळ राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले नाहीत, तर देशातील अंधभक्तांचा काही टक्का सोडला तर देशातील सर्व जनतेने केले आहेत. जनता मोदींकडे या प्रश्नांची उत्तरे मागत आहे.
           देशासमोर असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय समस्या व आव्हानाबाबत विरोध पक्ष सतत सरकारला जाणीवा करून देत आलेला आहे. पण सरकार विरोधकांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींना आजच्या सर्व समस्यांबाबत अगदी संसदेत बोलताना अनेकवेळा जाणीवा करून दिल्या आहेत. GST आणि नोटबंदीमुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडेल, यासंदर्भात अवगत केले होते. कोरोनाबाबत ही अवगत केले होते.पण प्रचंड अहंकाराने ग्रस्त व अदानीच्या हिताला प्राधान्य देत मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जीव गेले. तर पहलगाम आतंकी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामचा निर्णय घेऊन तो मोदींवर लादला व मोदींनी तो भारतीय सेना आणि 140 कोटी भारतीयांवर लादला, याचे मुख्य कारण मोदींचे अदानी प्रेम हेच आहे. हे लपून राहिलेले नाही. तर ट्रम्प यांनी हे एक वेळा नव्हे तर 26 वेळा बोलून दाखविले आहे. यामुळे सार्वभौम राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेबाबत जगापुढे पहिल्यांदाच प्रश्न उभे राहिले आहेत. 
         अशा सर्व वातावरणात देशाच्या संसदेत विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याची संधी मोदींपुढे होती व आज ही आहे. पण तितकी समज त्यांच्याकडे नाही. अन ही समज नसल्यानेच देशासमोरील अंतर्गत व बाह्य समस्या सुटण्या ऐवजी त्या येणाऱ्या काळात आणखी गंभीर होण्याचीच दाट शक्यता आहे. याबाबतच देश हितासाठी विरोधी पक्षांचे नेते सरकारला सावध करण्यासाठी संसदेच्या या अधिवेशनाचा माध्यम म्हणून वापर करीत आहेत. खरे तर संसदेचे हेच मुख्य कार्य आहे. पण मुखिया नेहमी प्रमाणे व सवयी प्रमाणे भीतीने 56 इंचाची छाती घेऊन पलायन करीत फिरत आहे. देशाला पंतप्रधानांची गरज असताना आज ही संसदेतून मोदी गायब आहेत.
         देशाचा पंतप्रधान, मुखिया म्हणून सर्व पातळीवर अपयशी ठरल्यानंतर विदेशात जाऊन करोडो रुपये खर्च करायचे, हा उद्योग मोदींचा आहे. त्यातून स्वतःची वाहवा करून घेण्यात कसले देश आहे ? पण देशातील पत संपल्यानंतर मोदी नेहमीच या मार्गाचा अवलंब करीत आलेले असून त्यासाठी ते निमंत्रणे असली तरी आणि नसली तरी विदेशी दौरे करतात. बळजबरी निमंत्रणे मिळवितात. आता ते ब्रिटनला गेले होते. तेथे त्यांची गरज नव्हती. उद्योग व विदेश मंत्र्याचे काम होते. पण मोदी गेले. स्वतःचं स्वतःचे स्वागत करून घेतले. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. हे विदेशी दौरे म्हणजे इव्हेंट असतात. दौऱ्याचा कार्यक्रम ठरला की, आपल्या देशातून एक टीम जाते. त्या विदेशी राष्ट्रातील भारतीयांशी संपर्क केला जातो. लाखो रुपयांचा चुराडा करीत त्यांना मोदींच्या स्वागताला आणले जाते. मोदींचा उदोउदो केला जातो. द्विपक्षीय करार केलेले जातात, ते करार केराच्या टोपलीत टाकण्यासारखेच असतात. व्यापार संबंध अधिक घट्ट करण्यासाठी द्विपक्षीय वार्ता होत असल्या तरी त्या विदेशी राष्ट्रांच्याच फायद्याच्या असतात. मोदींनी ब्रिटनमध्ये या संदर्भात केलेली चर्चा व करार ब्रिटनच्याच अधिक फायद्याचे आहेत. ब्रिटनमधून येणारी दारू आता आपल्या देशात करमुक्त होणार आहे. फायदा ब्रिटनच्या दारू निर्मिती कंपन्यांचा होणार आहे. 
          तसेच गोदी मिडीयाचा ही होणार आहे. कारण विदेशातील मोदीच्या स्वागताचे कव्हरेज करून मोदींना कागदी आतंरराष्ट्रीय नेता बनविण्याचा ठेका आज गोदी मिडीयाने घेतलेला आहे. यामुळे देशासमोरीला समस्या कशा सुटतील, याचे उत्तर मोदींसकट कुणाकडेच नाही. मोदींचा दौरा एक इव्हेट म्हणून गोदी मिडियाने दाखविला. मोदींची वाहवा केली. पण पहलगाम हल्ला घडवून पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून आपल्याच जनतेला मारणाऱ्या पंतप्रधान मोदीचे स्वागत करणारे विदेशातील भारतीय मूर्ख आहेत. अन त्या दौऱ्यांचे कव्हरेज करणारा भारतीय गोदी मिडिया ही मूर्खच आहे. यावर जगभराने शिक्कामुहर्तब ही केले आहे. या उलट विरोधी पक्षांचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी व देशातील जनता मोदींना एक पंतप्रधान म्हणून विचारत असलेले प्रश्न या मिडियाने विचारले असते तर मोदी सरकार इतके बेजबाबदार वागले नसते. अन् मोदींमुळे देशाचे सर्वच पातळीवर होत असलेले नुकसान, नाचक्की झाली नसती. 
……………………………..
 
राहुल गायकवाड 
महासचिव समाजवादी,
पार्टी महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *