वाढदिवसाला अथवा इतर आनंदाच्या क्षणी देण्यापेक्षा भाज्या देण्याची प्रथा सुरू करावी का? कारण आपण दिलेले पुषपगुच्छ लोक तिथेच टाकून जातात. त्याचा काही उपयोग देखिल होत नाही त्या पेक्ष भाज्या खाल्ल्या तरी जातील. आणि नकळत शेतकरी बांधवांना मदत होईल. आपल्याला जे परवडेल असे आंबा , पेरू , सफरचंद , चिक्कू असे सिझनल फळाची टोपली आपल्या बजेटनुसार देता येऊ शकते. टोपलीवर प्लॅस्टिकच्या आवरणाऐवजी सुती कापड किंवा गमछा बांधता येईल. म्हणजे तो कपडा पण कामाला येईल. वेगवेगळ्या भाज्या महाग पडत .असतील तर एक किंवा दोनच भाज्या देता येतील पाश्चात्य संस्कृती अवलंबण्यापेक्षा आपली देशी संस्कृती अंमलात आणण्याचा प्रयत्न करु त्यामुळे आपले शेतकरी बंधूंचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपला तेवढाच थोडाफार खारीचा वाटा…