• 9
  • 1 minute read

जागतिक आणि भारतीय कॉर्पोरेट मीडिया: राजकारण आणि भांडवलशाहीवर प्रभाव

जागतिक आणि भारतीय कॉर्पोरेट मीडिया: राजकारण आणि भांडवलशाहीवर प्रभाव

जागतिक आणि भारतीय कॉर्पोरेट मीडिया: राजकारण आणि भांडवलशाहीवर प्रभाव

जगातील पहिल्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्तीची (एलोन मस्क) X म्हणजे पूर्वीचे ट्विटर वर मालकी आहे

जगातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या (Larry Ellison) यांच्या कुटुंबाच्या मालकीची Paramount Media, US TV network CBS आहे आणि नजीकच्या काळात ते Warner Brothers (ज्याचा मालकीचे CNN आहे) विकत घेतील अशी बातमी आहे. 
 
जगातील श्रीमंतांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या (मार्क झुकेरबर्ग) यांच्या मालकीचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअँप आहेत 
 
जगातील श्रीमंतांमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या (जेफ बेझोस) यांच्या मालकीचे वॉशिग्टंन पोस्ट आणि ऍमेझॉन स्टुडिओ आहे.
 
(संदर्भ: Robert Reich, Senior USA Economist, Political activist) 
 
वरील सर्व व्यक्ती अमेरिकन आहेत, त्यांच्या मिडिया कंपन्या अमेरिकन आहेत पण त्यांचे मिडिया प्लॅटफॉर्म जागतिक आहेत. अगदी आपल्या भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.
 
भारतात देखील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडियावरील कॉर्पोरेट श्रीमंत व्यक्ती/ त्यांच्या कंपन्यांची मालकी सतत वाढत आहे. पुढच्या दहा वर्षाचा वेध घेतला की गंभीरता कळते. आजच मुकेश अंबानी यांच्या २७ चॅनेल तर अदानी यांचे १८ मालकीचे आहेत. 
 
वर फक्त सहा व्यक्ती, औद्योगिक घराण्याचा उलेख आहे. तो फक्त मुद्दा अधोरेखित करण्यासाठी. यांच्या व्यतिरिक्त जे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मिडिया प्लॅटफॉर्म आहेत ते देखील मूठभर श्रीमंतांच्या मालकीचेच आहेत. 
मिडिया हा एक उद्योग/ इंडस्ट्री असली तरी ती इतर अनेक उद्योगांपेक्षा भिन्न आहे. खरतर एकमेवद्वितीय आहे. 
 
सर्व प्रकारच्या मीडियातून नागरिकांच्या मनावर, विचार करण्याच्या पद्धतीवर निर्णायक आकार देता येतो हे तर पुरेसे सिद्ध झाले आहे. त्यातून मग राजकीय अर्थव्यवस्था आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो. 
 
उद्योजक ह्यावेळी मीडियाची मालकी घेतात त्यावेळी नफा कमावणे असतेच. पण त्याहीपेक्षा मोठा अजेंडा राजकीय असतो. 
 
कॉर्पोरेट मीडियाच्या ग्राहकाची संख्या बघितली की त्यांची राजकीय ताकद लक्षात येईल. 
 
सर्वच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मक्तेदारी किंवा ऑलिगोपोली वाढणे, महाकाय संपत्ती हातात येणारे ओलीगार्क वाढणे, संकुचित वंशवादी, फॅसिस्ट राजकीय शक्ती सत्तास्थानी येणे……या सगळ्याचा परस्पर संबंध आहे. 
 
पण ही प्रक्रिया कशी साध्य होते ? ती साध्य होते कोट्यावधी नागरिकांच्या विचार करण्याच्या, जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला विशिष्ट आकार दिला गेल्यामुळे. आणि त्याचे साधन आहे प्रगत तंत्रज्ञानानावर आधारित मीडियावर महा श्रीमंत मूठभर ओलीगार्कची मालकी! 
काही तरुण मित्र विचारतात की सर तुम्ही भांडवलशाही प्रणालीची राजकीय अर्थव्यवस्था समजावून घेण्याचा नेहमी आग्रह धरता ते का ? त्यांच्यासाठी !
 
जागतिक कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाहीविरुद्ध जगभर आणि भारतात प्रचंड असंतोष आहे. पण त्याचा ओरखडा देखील त्या प्रणालीवर उठत नाही. त्याची झळ त्या प्रणालीला बसत नाही. कारण तो असंतोष विखुरलेला आहे. त्याला टोक येत नाही. प्रचंड वाफ तयार होत असते पण ती लाखो शिट्या मधून बाहेर पडत असते. अगदी हाताबाहेर जाईल त्यावेळी शासनाची दंडसत्ता असतेच. 
 
टोक येणे गरजेचे आहे. त्यासाठी सहमती तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यक्रम, प्राधान्यक्रमांवर सहमती तयार व्हावी लागेल. त्यासाठी घटना केंद्री कमी, जास्त प्रणाली केंद्री राजकीय विश्लेषण गरजेचे आहे. 
 
संजीव चांदोरकर 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *