• 22
  • 1 minute read

जेष्ठ साहित्यिक डी.एल.कांबळे यांचे बौद्ध समाजावर उपकारच !

जेष्ठ साहित्यिक डी.एल.कांबळे यांचे बौद्ध समाजावर उपकारच !

कल्याण ( प्रतिनिधी) – आजच्या घडीला देशातील विविध विद्यापीठांमध्ये पाली भाषेचे अध्यासन आहेत. पाली भाषेतील जे जे साहित्य आहे, त्याचे मराठीत भाषांतर होणे आवश्यक आहे. असं महान कार्य करणारे जेष्ठ साहित्यिक डी.एल.कांबळे साहेब यांचे बौद्ध साहित्य आणि समाजावर उपकारच आहेत, असं प्रतिपादन प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीचे महासचिव आणि ग्रंथ प्रकाशन आणि महाड सत्याग्रह चर्चासत्र समारंभाचे अध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी काढले.
कल्याण पुर्वच्या राजभर नगर येथील धम्मदीप बुद्ध विहार येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डी.एल. कांबळे अनुवादित जातक अठ्ठकथा खंड-८ आणि धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथ प्रकाशन व चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून डॉ. चंद्रशेखर भारती बोलत होते.
विचारपीठावर जेष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, लेखक डी.एल. कांबळे, डॉ. ग्रीष्म खोब्रागडे, एन.एस. भालेराव, प्रा.युवराज मेश्राम, भंते संघपाल उपस्थित होते.
डॉ. भारती पुढे म्हणाले, आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशीच महाराष्ट्र शासनाने अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये एक निर्णय असा होता की संस्कृत,तेलगू, गोर-बंजारा भाषा अकादमी स्थापन करण्यासाठी 50 कोटींचा निधी मंजूर. मात्र गेली अनेक वर्ष पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे बाबत प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी प्रयत्न करूनही काहीच हालचाली महाराष्ट्र शासन करत नाही. पाली भाषा अकादमी स्थापन करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाही. साहित्यिक कंपूगिरी वाढल्याने पाली भाषेचे असे हाल होत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता संविधान रक्षण करणे, ही आपली जबाबदारीच नाही तर कर्तव्य देखील आहे.
प्रा. शुक्राचार्य गायकवाड म्हणाले की डी. एल. कांबळे साहेब पाली भाषेतून जातक कथा मराठी भाषेत आणून एक प्रकारे आपल्यावर उपकार करीत आहेत. जातक कथांमध्ये तथागत बुद्ध तत्कालीन राजे-महाराजांना कसे वागावे? याबद्दल प्रबोधन करीत असत सध्याच्या राजांबद्दल न बोललेलं बरं!
डॉ. ग्रीष्म खोब्रागडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. मात्र सध्याच्या परिस्थितीत ब्राह्मणी व्यवस्था आणि मनुस्मृती परत डोके वर काढत आहेत. ४जून च्या निकालानंतर आपली परिस्थिती फारच दयनीय होणार आहे ;तेव्हा आपण जागृत राहिले पाहिजे. त्यानंतर एन एस.भालेराव यांनी बुद्ध शिष्य आयुर्वेदाचार्य जीवक हा कसा पारंगत वैद्य होता,हे गोष्टीरूपाने सांगितले.
जेष्ठ साहित्यिक डी.एल. कांबळे सर ग्रंथाची भूमिका मांडताना म्हणाले की, बुद्ध तत्त्वज्ञानाचे मुळ जे त्रिपिटक आहे ते म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. सर्व विचारांचे माणिक, मोती,हिरे या त्रिपिटकात आहे. जातक कथा या इ.स.पूर्व 2300 वर्षापूर्वीच्या आहेत. त्यातीलच कथा घेऊन रामायण, महाभारत आणि पंचतंत्र लिहीले गेले आहेत. पाली भाषेतील त्रिपिटकाचे मराठीत भावानुवाद करणे तसे फार जिकारीचे काम आहे. परंतु समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे,हे जाणून आपण हे काम करत आहोत.
त्रिपिटकातील निती कथा या आजच्या संदर्भातही तंतोतंत लागू होतात, हेच या ग्रंथाचं महत्त्व आहे. तथागताचे विचार हे कालातीत आहे; हेच यावरून सिद्ध होतं.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्ञाबोधि साहित्य अकादमीचे सचिव प्रा. युवराज मेश्राम सर यांनी केले. तर कार्यक्रमास ॲड शंकर रामटेके, देवचंद अंबादे, यशवंत बैसाणे, महेंद्र बारसागडे, शाम भालेराव, राजेंद्र पवार ,उमेश गोटे, सुरेश माटे,डॉक्टर संघमित्रा आदी लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

– डॉ- चंद्रशेखर भारती

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *