भारतीय लोकशाही बाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढा जागरूक व जबाबदार नेता भारतात अजूनही जन्मला नाही केवळ देशाच्या सीमा निश्चित करणारे व समाजाला गुलाम ठेवणारे स्वातंत्र्य बाबासाहेबांना नको होते .लोकशाही म्हणजे बहुसंख्यांकाने अल्पसंख्यांकावर केलेले शासन असेही बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते. लोकशाहीला घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे व भारतीय समाजाची समता, स्वातंत्र्य, बंधुता,व न्याय यावर आधारित कायद्याचे व समतेचे, समानतेचे राज्य स्थापन होण्याचे स्वप्न पाहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणत्याही प्रकारचाअडथळा नसताना लोकशाही शासन व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी ज्यांचे अस्तित्व आवश्यक आहे अशा पूर्वावर्ती शर्ती कोणत्या आहेत? भारतीय लोकशाही बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अगदी स्पष्ट व स्वातंत्र्य नंतरच्या भारतीय समाज रचनेसाठी मार्गदर्शक होते. आज स्वातंत्र्याला 78 वर्ष झाल्यानंतर या लोकशाहीचा आढावा घेतल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्द खरा ठरतो आहे.भारतातील कामगार, अल्पसंख्यांक, दलित,बहुजन, आदिवासी समाजाच्या समस्या उभ्या आहेत.स्वातंत्र्यानंतर जातीय व धार्मिक संकुचित पणा अधिकच वाढत गेला आहे आणि या भावनांना खतपाणी प्रत्यक्षपणे हरेक राजकीय पक्ष करतो आहे. शासन प्रशासनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वापासून फारकत घेतो आहे.(दुर्लक्ष करतो आहे.) दुसरीकडे संविधानाला कुचकामी ठरवून त्याला बदलविण्याचा कट रचला जातो आहे.अशा गंभीर समयी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय मार्गदर्शन समाजासमोर आणणे लोकशाही प्रति जागरूक असणे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे…जय संविधान….. ******** मिर्ज़ा वहाद बेग विदर्भ प्रदेश अध्यक्ष जनशक्ती भ्रष्टाचार समस्या निवारण संघटना महाराष्ट्र व भारतीय मुस्लिम परिषद महाराष्ट्र राज्य ________