१४ एप्रिल २०२४- (ठाणे वर्तकनगर) शिव, शाहू, फुले, डॉ.आंबेडकर विचार मंच ठाणे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला अनुसरुन बुद्धरूप (बुद्ध मूर्ती) प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता, ह.भ.प. आशिष जाधव महाराज यांच्या शुभहस्ते बुद्धरुपाचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मा.आबासाहेब चासकर यांनी सर्वांसमेत बुद्ध वंदना घेऊन उपस्थित मान्यवर पाहुणे व कार्यकर्ते यांच्या समोर सद्यस्थितीत देशातील नागरिकांच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास खास देहू वरून आलेले हभप आशिषजी महाराज यांनी प्रबोधन करताना भगवान बुद्ध आणि संत तुकाराम महाराज यांची विचारांची पद्धत किती मिळतीजुळती आणि प्रगल्भ होती यावर विचार मांडले, त्यानंतर वारकरी संप्रदायाचे आंदोलन हे विद्रोही होतेच परंतू व्यवस्थेत असलेल्या कर्मठांनी त्यांच्या विरोधात दिशा बदलण्यासाठी आणि अज्ञान पेरण्यासाठी सतत काम केले आहे , याचा प्रत्यय पदोपदी येताना दिसत आहे, म्हणून सत्य काही लपून राहिलेले नाही, हा बहुजनवादी इतिहास आज परत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बहुजन संत महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचे काम लोक आपापल्या परीने पुढे रेटतच आहेत, ते कठीण काम सातत्याने कसे करीत आहेत याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन हभप आशिषजी महाराज यांनी यावेळी केले. प्रमुख पाहुणे मा.कर्मवीर सुनीलजी खांबे, मुख्य प्रवर्तक दी भिमाई मागासवर्गीय क्रेडिट सोसायटी मा.राजेशजी पवार, मा. यल्लाप्पाजी गायकवाड – ज्येष्ठ समाजसेवक,मा.डॉ. चंदन जोगे सर, मा.मधुकर मोरे – शिवसेना शाखाप्रमुख खोपट, लोकशाहिर बाळासाहेब जोंधळे, बीआरएसपीचे प्रभाकर जाधव, वंचित बहुजन आघाडी मा.संतोष खरात, ठाणे शहर अध्यक्षा महाराष्ट्र लोकाधिकार समिती श्रीमती संध्या म्हसकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निमंत्रक – तथागत मित्र मंडळ पदाधिकारी, तसेच शिव,शाहू, फुले,आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. धनाजी सुरोसे, यांनी उपस्थित पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमित खरात यांनी उपस्थितांना खिरदान करून आभार प्रकट केले.