/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा वकील संघात अभिवादन कार्यक्रम व ‘मध्यस्थता आणि जामीन’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा वकील संघात अभिवादन कार्यक्रम व ‘मध्यस्थता आणि जामीन’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन...
धुळे जिल्हा वकील संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी वकील संघात मध्यस्थता आणि जामीन’ या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.प्रविण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल पाटील होते.यावेळी जेष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.
न्या.प्रवीण कुलकर्णी यांनी या प्रसंगी न्या. कुलकर्णी यांनी मध्यस्थता यावर न्यायिक प्रक्रियेमधील उपयोगिता, वाद निकाली काढण्यातील महत्त्व तसेच जामिनाच्या कायदेशीर तरतुदी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. सतेंद्र कुमार अंतील यांच्या जजमेंटच्या अनुषंगाने जामीन अर्जाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
एफआयआर नोंदणीपासून ते निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, सीआरपीसी कलम ४०, ४१, ४१(अ), ७(अ), ८ यांतील तरतुदी,सांगत ७ वर्षांच्या आतील गुन्ह्यांमध्ये अटक न करता नोटीस देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ॲड.राहुल पाटील यांनी वकिलांसाठी मध्यस्थता विषयक प्रशिक्षणाची गरज व्यक्त करत लवकरात लवकर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम न्या.कुलकर्णी यांनी आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ॲड.प्रभावती माळी मॅडम यांनी मध्यस्थता या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या अभिवादनाने व आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना उपाध्यक्ष ॲड.मधुकर भिसे,सूत्रसंचालन सचिव ॲड. सुधा जैन मॅडम यांनी तर ॲड. सचिव ॲड. बळीराम वाघ यांनी आभार मानले.
या व्याख्यानाला जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.तसेच जेष्ठ विधीज्ञ, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.