• 129
  • 1 minute read

डोनाल्ड ट्रम्पचे दावे गंभीर, पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

डोनाल्ड ट्रम्पचे दावे गंभीर, पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील “युद्ध थांबवले” तसेच “पाच विमाने पाडली गेली” असेही सांगितले आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत दाव्यांना थेट आव्हान निर्माण झाले आहे.
 
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देशात शांतता राखण्याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी देशाला स्पष्टपणे सांगावे की ट्रम्प हे असे दावे का करत आहेत? त्यांनी कोणाचे, कोणत्या पाच विमानांबद्दल उल्लेख केला आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
 
“ही वेळ काही लपवाछपवी करण्याची नाही. ट्रम्प यांच्या या दाव्यांवर मोदींचे मौन हे भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहचवत आहे, तसेच सशस्त्र दलांचे आणि जनतेचे मनोधैर्य खचवत आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
0Shares

Related post

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……..ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !          …
सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *