• 446
  • 1 minute read

तेजस्वी यादव यांनी टाकलेल्या जाळ्यात संघी मासळी फसली…!

तेजस्वी यादव यांनी टाकलेल्या जाळ्यात संघी मासळी फसली…!

तेजस्वी यादव यांनी नवरात्रीत मासे खाल्याची राष्ट्रीय न्यूज होते पण मणिपूरमध्ये पोलिसांच्या गाडीतून दोन महिलांना बाहेर काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो, यातील एक महिला देशाच्या सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या एका जवानाची पत्नी आहे. पण ही राष्ट्रीय न्यूज होत नाही. सोशल मिडियाचा अपवाद सोडला तर बाकी गोदी, दलाल मिडिया याची साधी दखल ही घेत नाही. हे केवळ अन केवळ राम राज्यातच होऊ शकते. कुणी काय खावे ? कधी काय खावे ? कुणी कुठले कपडे घालावे ? महिलांच्या ब्रा अन् पँटीचा रंग काय असावा ? हे ठरविणाऱ्या मनुस्मृतीच्या कायद्याचे राज्य राम राज्याच्या आडून प्रस्तापित होत आहे. त्यामुळे हे राम राज्य या देशातील अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी व महिला समाज व वर्गाला संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेण्यासाठीच स्थापित करण्यात येत आहे. तोच अजेंडा संघ व भाजपचा आहे.
संघ व भाजपच्या धर्मांध राजकारणाचा चेहरा उघडा नागडा करण्यासाठी तेजस्वी यादव यांनी मासे खातानाचा व्हिडिओ जाणीवपूर्वक स्वतः च वायलर केला आहे. अन तेजस्वी यांना जे काही अपेक्षित होते. तेच घडले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ नवरात्री सुरु होण्याच्या एक दिवस अगोदरचा आहे. या वक्तव्यानंतर संघ, भाजपचे नेते व ट्रोल गँगचे चेहरे पाहण्या लायक झाले आहेत.
देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. महिला व अल्पसंख्यांक समाज सुरक्षित नाहीत. सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु आहे. शिक्षण व्यवस्थेचे बाजारूपणा सोबतच धार्मिककरण झाले आहे. विकसनशील व विकसित देश म्हणून जो गौरव देशाला मोदींच्या अगोदरच्या पंतप्रधानांच्या काळात प्राप्त झाला होता. तो ही आता राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने कृषि क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बँका अन् सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत. मात्र यातील कुठलाच विषय भाजपच्या निवडणूक अजेंड्यात नाही. एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के असलेला हिंदू खतरे मैं है, असा नारा देत त्याच हिंदूंच्या देशाची लूट सुरु आहे. त्याच हिंदूंच्या मुली, बहिणी अन् माता सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत. त्यांचे त्या जेथे असतील तेथे लैंगिक शोषण होत आहे. न्याय व्यवस्था अन् हिंदूंची धार्मिक स्थळे ही त्यास अपवाद नाहीत. पण त्या विषयी चर्चा नाही. चर्चा तेजस्वी यादव यांच्या मासे खाण्याची होत आहे.
तेजस्वी यादवच्या मासे खाण्याची चर्चा करताना, त्यावर आपली मतं मांडताना अन् याबद्दल त्यांना ट्रोल करुन धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असलेली हिंदुत्व वादी गँग मात्र कत्तलखाने चालवित आहे. हजारो टन मास निर्यात केले जात आहे. अन् या कत्तलखान्याचे सर्व मालक संघ, भाजप व मोदीच्या परिवारातील आहेत. यातील अनेकजण यावेळी निवडणुका ही लढवित आहेत. तसेच निवडणूक निधी ही या कत्तलखान्याची मालकांकडून घेतली जात आहे.
कुणी काय खावे हा मिडियाच्या पुढे प्रश्नच असायला नको. पण देशातील मिडियात ही ब्रेकिंग न्यूज होत आहे. गेल्या दहा वर्षातील मिडियाचे चरित्र एकदम नीचपणाची हद्द पार करुन गेले आहे. संघ, भाजप अन् त्यांचा दलाल मिडियाचा हाच नीचपणा जगासमोर आणण्यासाठी तेजस्वी यादव यांनी हा व्हिडिओ वायलर केला आहे. अन् त्यात ते यशस्वी झाले आहेत. संघ व भाजपचे चरित्र नागडे करण्याचा प्रयत्न तेजस्वी सतत करीत असून प्रत्येक वेळी त्यांना त्यात यश ही येत आहे. संघ व भाजपच्या राजकारणाला समजणारेच भाजपला आव्हान देवू शकतात. भाजपचा पर्याय ठरू शकतात. तेजस्वी यादव हे या पर्यायातील एक नाव आहे.


– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…
कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदा आणि सायबर-फॉरेन्सिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख: : लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न मुंबई, २९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *