/ दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे अर्थशास्त्रातील कामगिरीबद्दलचे पुरस्कार काल तीन अर्थतज्ञानांना जाहीर झाले. त्यानिमित्ताने अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे अर्थशास्त्रातील कामगिरीबद्दलचे पुरस्कार काल तीन अर्थतज्ञानांना जाहीर झाले. त्यानिमित्ताने अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल.
नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात झाली १९०१ साली. आल्फ्रेड नोबेल या अब्जाधीशाच्या इच्छेनुसार हे पुरस्कार फक्त पाच क्षेत्रासाठी देण्यात येऊ लागले. भौतिक, रसायन, साहित्य, वैद्यकीय आणि शांतता !
अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जावा असे काही आल्फ्रेड नोबेल यांनी लिहून ठेवले नव्हते.
१९६८ सालापर्यंत नोबेल पुरस्कार फक्त या पाच क्षेत्रातील कामगिरीसाठी दिले जात होते ; किती ६८ वर्षे !
अर्थशास्त्रातील तथाकथित नोबेल पुरस्कार स्वीडनच्या केंद्रीय बँकेने (Sveriges Riksbank) नोबेल यांच्या स्मरणार्थ १९६९ पासून द्यायला सुरुवात केली.
(गुगल देखील करू शकता )
_________
आतापर्यंतचे अर्थशास्त्रातील सारे तथाकथित नोबेल पुरस्कार मार्केट तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या, मार्केट इकोनॉमीतून तयार होणाऱ्या प्रश्नांची धार बोथट करण्यासाठी वैचारिक फ्रेम , कल्याणकारी कार्यक्रम सुचवणाऱ्या अर्थतज्ज्ञांना देखील दिले आहेत.
पण जागतिक कॉर्पोरेट/ वित्त भांडवलशाहीला / मार्केट तत्त्वज्ञानाच्या मूलभूत मांडणीला आव्हान देणारी मांडणी करणाऱ्या एकाही अर्थतज्ज्ञांला दिला गेलेला नाही.
(संदर्भ मंथली रिव्ह्यू एप्रिल २०२५) _________
गेल्या काही दशकात मार्केट इकॉनॉमी आर्थिक तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला कित्येक गंभीर प्रश्नाच्या खाईत लोटले आहे.
त्या आर्थिक तत्वज्ञानाची चिरफाड करणारे मूलभूत आणि मौलिक संशोधन जगात होतच असते. पण त्याची दखल नोबेल पुरस्कार समिती घेणार नाही.
तरुणांनॊ, हे असे का ? हे असेच का ? तसे का नाही ? हे प्रश्न विचारा.