• 300
  • 1 minute read

देऊर खुर्द चे सरपंच अखेर पायउतार जिल्हाधिकारी यांनी फेटाळला विवाद अर्ज

देऊर खुर्द चे सरपंच अखेर पायउतार जिल्हाधिकारी यांनी फेटाळला विवाद अर्ज

ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी दिला निर्णय

धुळे – दि.१० (प्रतिनिधी)
तालुक्यातील देऊर खु. येथील सरपंच सुदाम देसले यांचे विरुद्ध ग्रामपंचायत सदस्या सौ. पूनम गणेश देसले व इतर सदस्यांनी तहसीलदार धुळे ग्रामीण यांचेकडे अविश्वास नोटीस दिल्याने दि. ७/३/२०२४ रोजी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता.
सदर ठरावा विरुद्ध सरपंच यांनी जिल्हाधिकारी धुळे यांचेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५( ए)(बी) प्रमाणे विवाद अर्ज क्र. १०/२०२४ चा दाखल करून दाद मागितली होती.सदर कामी जिल्हाधिकारी यांनी ठरावास स्थगिती नाकारल्याने सरपंच यांनी ना. उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली होती.
मात्र सदर कामी जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी दरम्यान पुनम देसले यांच्या वतीने त्यांचे विधिज्ञ ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी दि.५/८/२०२४ रोजी सरपंच यांचा विवाद अर्ज फेटाळून त्यांना सरपंच पदावरून पायउतार केले याकामी ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला.यावेळी ज्युनिअर वकील ॲड.सारंग जोशी यांनी कामकाज पाहिजे.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *