• 92
  • 1 minute read

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर…!

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर…!

१. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर …!

२. डाऊ प्रकल्पाविरोधात पहिल्यांदा ठोस भूमिका घेऊन वारकऱ्यांसोबत लढा देणारे, बाळासाहेब आंबेडकर …!

३. वारकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर ….!

४. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यावर अंगावर वकिलाचा कोट चढवून कोर्टात अर्ग्युमेंट करून तरूणांना जेलबाहेर काढणारे, बाळासाहेब आंबेडकर ….!

५. डरबन (द. आफ्रिकेमध्ये) सयुंक्त राष्ट्र (UNO) संघात भारतातील जाती व्यवस्थेवर सखोल मांडणी करून देशातील काळी बाजू जगासमोर आणणारे, बाळासाहेब आंबेडकर ..!

६. सरकारविरोधी भूमिका घेतल्यावर रासुका लावून त्यांच्यावर दमन लादले गेलेल्या चंद्रशेखर रावणच्या जामिनासाठी उभे राहणारे, बाळासाहेब आंबेडकर ….!

७. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रभर जातीअंत परिषद घेत जातव्यवस्था वेशीवर टांगणारे बाळासाहेब आंबेडकर …!

८. देशात पहिल्यांदा स्त्री मुक्ती परिषद घेणारे, बाळासाहेब आंबेडकर ….!

९. लवासामध्ये गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदुकी ठेऊन कवडीमोल भावाने जमीनी हडपणार्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन लवासाचा काळा चेहरा समोर आणणारे, बाळासाहेब आंबेडकर …!

१०. मराठा मोर्च्यादरम्यान राज्यातील दलित विरुद्ध मराठा वातावरण पेटत असताना मनुवाद्यांचा डाव हाणून पाडणारे, बाळासाहेब आंबेडकर…!

११. आरएसएसची अवैध शस्त्रास्त्रे अन त्याचे षडयंत्र बाहेर काढणारे, बाळासाहेब आंबेडकर..!

१२. देशाच्या राजकारणात पहिल्यांदा तृतीयपंथी समूहाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून नेतृत्व देणारे, बाळासाहेब आंबेडकर ..!

१३. किनवट, नंदुरबार, अकोला पॅटर्न राबवून महाराष्ट्राचा 7/12 आमच्या नावावर असं म्हणाऱ्यांना सणसणीत चपराक बसवणारे, बाळासाहेब आंबेडकर ..!

१४. वंचितांना राजकीय आत्मभान देऊन ह्या व्यवस्थेत आम्ही सुद्धा नायक होऊ शकतो, हा विश्वास देणारे, बाळासाहेब आंबेडकर.!

या सारख्या अनेक ऐतिहासिक घटना राज्याच्या, देशाच्या राजकीय, सामाजिक पटलावर मांडणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या मंगलकामना…!!

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *