- 31
- 1 minute read
नकली आंबेडकरवाद्यांनो आतातरी हुजरेगीरी थांबेल का.??
भाजपा आणि संघाला संविधान संपवायचे आहे, आरक्षण संपवायचे आहे. त्यांचा तो पहिल्या दिवसा पासुनचा अजेंडा आहे. ही विचारांची लढाई आहे....!!
संविधानातील आरक्षणाचे तत्व संपवण्यासाठी संघाने कंबर कसली आहे. आणि त्यासाठी संघाने आरक्षणाच्या विषयावर देशभरात कमालीचा गोंधळ माजवून. आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक अशी समाज फाळणी करण्याची चाल खेळलेली आहे….!!
संघाच्या रणनीती चाच भाग म्हणून उत्तरेतील गुर्जर, आणि जाट या मोठ्या आणि प्रस्थापित जातींना तसेच गुजरात मधील पाटिदार आणि महाराष्ट्रातील मराठा जातीला संघाने आरक्षण मागायला लावून आमचे सरकार आले तर तुम्हाला आरक्षण देऊ अशी फुस लावली होती. संघाच्या इशा-या वरुन धनदांडग्या आणि प्रस्थापित जातींनी आरक्षण मागायला सुरुवात केली. आंदोलने उभी राहिली.तरुणांना भडकवण्यात आले. सरकारी संपत्तीची नासधूस केली. अनेकांचे बळी घेतले.आणि जर आम्हाला आरक्षण मिळतं नसेल तर मग कुणालाच आरक्षण नसावे ही भाषा आरक्षण मागणाऱ्या नेत्यांच्या तोंडी आली हा योगायोग नाही तर ती समजून उमजून आरक्षणाचे तत्व संपवण्यासाठी खेळलेली खेळी होती…!!
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि संविधानाचे शिल्पकार तथा आरक्षण दाते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा का नाहीत.? त्याचे उत्तर सोपे आहे. आरक्षणाच्या जनकाचे मराठा आंदोलन कर्त्याना देणेघेणे नाही. त्यांची लढाई तात्विक नाहीच.कारण आरक्षण मिळविणे हा ऊद्देशच नाही तर मराठा आरक्षणाच्या नावाखाली समाजात दुही निर्माण करणे.घोडे आणि गाढवाच्या शर्यतीचा विषय चर्चेला घेऊन आरक्षण तत्व संपवण्यासाठी काम करणे. ओबीसी बहुजनांना ऊचकवून समाजात द्वेष पेरणी करणे हा कार्यक्रम आखल्या गेला आणि त्याप्रमाणेच सर्व सुरू आहे….!!
भाजपा आणि संघाला संविधान संपवायचे आहे, आरक्षण संपवायचे आहे. त्यांचा तो पहिल्या दिवसा पासुनचा अजेंडा आहे. ही विचारांची लढाई आहे….!!
भाजपा आणि संघ हे आमचे वैचारिक विरोधक आहेत. ते त्यांचा अजेंडा राबवितात.त्यांना संविधान संपवायचे आहे.आपणं संविधान वाचविण्यासाठी लढलं पाहिजे. ही आपल्या लढाईची रुपरेषा आहे. सामना सरळ आहे. मनुवादी विरुद्ध संविधानवादी….!!
लढा निकराचा आणि आणिबाणीचा आहे.
निकराचा लढा लढतांना विरोधकां बद्दलचं चित्र स्पष्ट असेल तर यश मिळविण्यासाठी बळ मिळतेय. आणि आपल्या भुमिकेत संभ्रम असेल तर लढा यशस्वी होऊच शकत नाही हे तत्त्व लक्षात घेतले पाहिजे….!!
आता संविधानवादी छावणीने लक्षात घेतले पाहिजे की, मनुवादी छावणीत कोण, कोण आहे.?
संविधान विरोधक, आरक्षण विरोधक म्हणून मनुवादी छावणीत फक्त भाजपा आणि संघ आहे असे समजणे हे कमालीचे अज्ञान ठरु शकते म्हणून आरक्षण विरोधकांचा भुतकाळ आणि अनुभव तपासून घेऊनच विरोधक ठरविले पाहिजे…!!
शरद पवारांच्या दोन्ही शाखा संघाच्या इशा-यावर काम करतात हे सुप्रिया सुळे यांनी काल आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करुन अधिक स्पष्ट करुन सांगितले आहे….!!
सेक्युलर बुरखा पांघरूण कॉंग्रेस पक्षात संघी वावरतात आणि कॉंग्रेस पक्षाचं धोरण तेच आखतात हे या अगोदर अनेकदा सिद्ध झाले आहे….!!
गेल्या ७५ वर्षाचा अनुभव हेच सांगतोय की,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे संविधानवादी आहेत किंवा आरक्षणवादी आहेत या संभ्रमात कुणीही राहू नये. ते घराणेशाही वाले, सरंजामी वृत्तीचे आहेत आणि सत्तेसाठी संघाच्या कार्याला वाहून घेतात म्हणून ते संविधान विरोधी, आरक्षण विरोधी सुद्धा आहेत….!!
मनुवादी छावणीत सवर्णांनी भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा राजकीय पक्षांना सामावून घेतले आहे हे वास्तव लक्षात घेऊन आरक्षण बचाव, संविधान बचाव लढाई लढावी लागेल हे सुत्र लक्षात असू द्या…!!
आता रिपब्लिकन पक्षाच्या गटाच्या नावाखाली कुणी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतं घरोबा करीत असेल तर तो संविधान बचाव साठी अडथळा नाही का.? ही मनुवादी छावणीशी जवळीक नाही का.?
कुणी दगडापेक्षा विट मऊ म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनुवादी छावणीत चला म्हणतं असेल तर तो आपल्या तात्विक लढाई ला अडथळा नाही का.??
कुणी विचारवंत बनून राजकीय शहाणपणं सांगतांना आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना मते देण्याऐवजी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मते द्या आणि संविधान वाचवा असा फतवा काढतं असेल तो आपला विश्वास घात नाही का.??
सत्तेसाठी आणि संविधान संपवण्यासाठी मनुवादी सवर्णांनी महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे गट निर्माण करुन.सवतासुभा ऊभा करुन आंबेडकरी विचारधारेचे स्वतंत्र राजकारण ऊभेच राहू दिले नाही.आंबेडकरी विचारांची राजकीय ताकद क्षीण केली हा अनुभव आहे….!!
रिपब्लिकन गटा तटाचा प्रयोग यशस्वी होतं नाही हे लक्षात येताचं पाताळयंत्री विरोधकांनी विचारवंत नावाची नवी नकली आंबेडकरवादी जमात जन्माला घातली आणि आंबेडकरवादी राजकारण क्षीण करण्याचा २०२४ मध्ये यशस्वी प्रयोग केला आहे….!!
रिपब्लिकन गटाचे पुढारी कॉंग्रेस पक्षाच्या ओसरीतच आपले संसार थाटून जगलेत सर्वांना माहीत आहे. आता विचारवंत नावाची नकली जमात सुद्धा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओसरीतच आपला संसार थाटून बसली आहे….!!
आणखी किती काळ हुजरेगीरी करायची.? अरे तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य डावावर लागले आहे.? संविधान संपले. आरक्षण संपले आणि ते संपवण्यासाठी मनुवादी छावणीत भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऐकीकरण झाले असेल तर समाज बांधवां हूज-यांना ठणकावून सांग आतातरी हुजरेगीरी थांबवं…!!
मुठभर हुजरेगीरी करणारे ऐकणार नसतील तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. नाही तर आम्ही मनुवादी छावणीशी जो लढा आरंभला आहे त्याला यशस्वी करु शकणार नाही. आरक्षण वाचवता येणार नाही हेही लक्षात घे….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.