• 60
  • 1 minute read

नांदेड लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वंचितचा पाठिंबा नाही, काँग्रेसने मतदारांची दिशाभूल थांबवावी.

नांदेड लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वंचितचा पाठिंबा नाही, काँग्रेसने मतदारांची दिशाभूल थांबवावी.

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने व काँग्रेस पक्षाने मतदारांची दिशाभूल करू नये. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

आज महाविकास आघाडीच्या नांदेड प्रचार कार्यालयाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे खोटे विधान महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी अशा प्रकारचा कुठलाही पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी राज्याची प्रवक्ते फारूक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच जिल्हा महासचिव शाम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव अमृत नरंगलकरही यांची उपस्थिती होती.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सात जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ असे जाहीर केले होते. त्यापैकी कोल्हापूर आणि नागपूर येथील काँग्रेस उमेदवारांना वंचितने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उर्वरित अन्य ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकृत पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आला नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली स्थिती असून नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेला राजकीय बदल लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी इतर कुठल्याही पक्षापेक्षा सरस आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार द्यावा असा ठराव पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीकडे पाठवला आहे.

अशात महाविकास आघाडीने दिलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे अशी खोटी वल्गना माध्यमांशी बोलताना केली आहे. यावर आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा चांगला समाचार घेताना नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बी टीम आहे. नांदेड मधील काँग्रेस हे अशोक चव्हाण चालवीत आहेत अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व विशेषत: काँग्रेस पक्ष हा मतदारांची दिशाभूल करीत आहे. यावर मतदाराने विश्वास ठेवू नये या ठिकाणी भाजपाला हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकदीने लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

– शिवा नरंगले

0Shares

Related post

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…
स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृह देशाच्या आर्थिक राजधानीत का नको ?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *