• 23
  • 1 minute read

नाशिकमध्ये लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष?

नाशिकमध्ये  लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष?

नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा (Maratha) समाजाने दिला आहे. छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमधील मराठा आंदोलकांनी भुजबळांना पाडण्याच प्रण केलाय. याला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

छगन भुजबळांना लोकसभेचं तिकिट मिळाल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तूम्ही एक भूजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे. छगन भुजबळ हे आमेच नेते आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांना उमेदवारी दिली तर आण्ही त्यां्या पाठीशी उभे राहाणार अशी भूमिका प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात 15 टक्के मराठा आणि 60 टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे भुजबळांना पाडणं शक्य नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशाराच प्रकाश अण्णा शेंडगे (Prakash Anna Shendge) यांनी दिलाय.

प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी बहजुन पार्टीच्या (OBC Bahujan Party) उमेदवारांची तिसरी यादी जहीर केली. लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. बीडमध्ये यशवंत अण्णा गायके, जालन्यात डॉ. तानाजी भोजने, अहमदनगरमध्ये दिलीप खेडकर आणि साताऱ्यात सुरेश कोर्डे यांना उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी मतात विभाजन नको म्हणून हरिभाऊ शेळके यांनी इथीन आपली उमेदवारी मागे घेतली आहे. 

0Shares

Related post

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…
वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

“राजकारण हा काही आट्यापाट्याचा खेळ नाही. तो आमच्यासाठी संग्राम आहे, तो आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *