• 137
  • 1 minute read

*पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्य शासनाची मान्यता

*पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्य शासनाची मान्यता

पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्य शासनाची मान्यता

मुंबई दि.18 -.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड अधिकृत असल्याचा निकाल धर्मदाय आयुक्त कार्यालयाने यापूर्वीच दोन वेळा दिलेला आहे.
       या निर्णयास मागील 12वर्षात कुठेही कायदेशीर आडकाठी आलेली नाही.कोणत्याहि न्यायालयात या अध्यक्ष पदास आव्हान देण्यात आलेले नाही.त्यामुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयाने दोन वेळा रामदास आठवले यांच्या बाजुने  दिलेला निकाल ग्राह्य मानुन राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन ना.रामदास आठवले यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे.त्यानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष रामदास आठवले असुन त्यांच्या अध्यक्षतेत पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे कामकाज अधिकृत चालले आहे.रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणुन शिफारसी करतील त्या शिफारसी अनाधिकृत असल्याने स्विकारु नयेत.या बाबतचे पत्र राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना पाठवले आहे.याबाबत ची माहिती आज ना.रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.गरवारे क्लब येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
                          पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पिपल्स एज्यकेशन सोसायटीतील गटबाजीला आता पूर्णविराम मिळेल.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे मुंबई,नवि मुंबई,महाड,पुणे कोल्हापुर,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बेंगलोर,बुध्दगया(बिहार) या ठिकाणी अनेक शैक्षणिक संकुल आणि वसतीगृहे आहेत.परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पी.ई.एस.या संस्थेचा आम्ही विकास करणार आहोत.राज्यात सर्व जिल्ह्यात जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरु करणार आहोत. राज्य बाहेर अन्य राज्यांत सुद्धा जमीन मिळवून संस्थेचा अधिक विकास करणार आहोत . 
 
छत्रपती संभाजीनगर मध्ये मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे.गरीब मुलांना पुर्व प्राथमिक पासुन इंग्रजी माध्यमांचे चांगले शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.कमवा आणि शिका या तत्वावर ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा आमचा मानस आहे असे पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले या वेळी पत्रकार परिषदेत म्हणाले. 
 
ना.रामदास आठवले हे पी.इ.एस चे अध्यक्ष आहेत.उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात,विश्वस्त सदस्यपदी पद्मश्री ऍड.उज्जवल निकम,जस्टीस सुरेंद्र तावडे, ऍड.बाबुराव बर्वे,डॉ.वासुदेव गाडे,डॉ.सुनिल खापरडे,अरविंद सोनटक्के,प्रो.एस.एल भागवत,डॉ.एम.व्यकंट स्वामी तर सचिवपदी डॉ.वामन आचार्य  आहेत अशी कार्यकारणी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. 
           डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्यकेशन सोसायटीच्या 11 पैकी 4 सदस्य हे सवर्ण समाजाचे आणि 7 सदस्य दलित समाजाचे घेण्याचा नियम संस्थेच्या घटनेत केलेला आहे. पी.इ.एस च्या शाळा,कॉलेज, मध्ये केवळ दलितांचीच मुले नाही तर सर्व समाजातील गरिब मुलांना शिक्षणाची संधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली.या संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यानंतर त्यांचे पुत्र यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर या संस्थेचे अध्यक्ष झाले.त्यानंतर जस्टिस आर आर भोळे, बसव लिंगप्पा,रंगनाथन, प्रितमकुमार शेगावकर हे अध्यक्ष होते.त्यानंतर 2 जुलै 2012 रोजी ना.रामदास आठवले हे पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे मेंबर आणि अध्यक्ष झाले.धर्मदाय आयुक्त कार्यालयाने पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन  ना.रामदास आठवले यांच्या नावास दोनवेळा अधिकृत मान्यता दिली आहे.त्यामुळे आता राज्य शासनाने ही ना.रामदास आठवले यांच्या नावास अधिकृत मान्यता दिली असुन त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने राज्यभरातील विद्यापीठांना दिलेला आहे.आता संस्थेत कोणतेही वाद नसून गटबाजी ही नाही सर्वांनी डॉ बाबसाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन संस्थेस कोणतेही राजकारण करून अडचण न करता सहकार्य करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे  बी के बर्वे, डॉ उमाजी मस्के, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
हेमंत रणपिसे 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *