• 146
  • 1 minute read

भारतीय समाजात सहजीवनी समुपदेशनाचे स्थान

भारतीय समाजात सहजीवनी समुपदेशनाचे स्थान

परिचयोत्तर विवाह : लेखांक : ५

“कपडा चांगला रंगविण्यासाठी आधी तो स्वच्छ धुतला पाहिजे.” – गौतम बुद्ध

येणारी पिढी ही पारंपरिक धारणांचा पगडा घेऊनच प्रौढ होते. या धारणांना सामाजिक विषमतेचे एक अटळ वास्तव आहे. भारतात ही विषमता जशी जातिव्यवस्थेच्या उतरंडीची आहे, तशीच ती लिंगभावी विषमता देखील आहे. ती प्राय: स्त्री-पुरुष विषमता आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत फक्त पुरुषच ‘पुरुषी विचार’ करतात असे नव्हे तर अपरिहार्यपणे स्त्रियाही ‘पुरुषी’च विचार करतात.

हा पुरुषी विचार ब्राह्मणी पित्रुसत्ताक व विज्ञानद्रोही आहे. पूजाअर्चा व कर्मकांडात मश्गुल ठेवणारा आहे. म्हणून विज्ञान तंत्रज्ञान घेऊन आलेल्या प्रत्येक आक्रमकाने आमच्यावर सहज शेकडो वर्षे राज्य केले आहे. आजही करत आहेत. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.

बदलत्या व गतिमान वास्तवात विवाह जमविण्यातील समस्या जातवर्गीय पार्श्वभूमीनुसार भिन्न आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गात त्या कमी असल्या तरी मध्यमवर्गापासून पुढे त्या जटील बनलेल्या दिसताहेत. त्यातही शहरी नोकरपेशा -व्यावसायिक व ग्रामीण शेतकरी कुटुंबातील समस्या पुन्हा भिन्न आहेत.
परिचयोत्तर विवाह चळवळ प्रथमतः शहरी मध्यमवर्गातच केंद्रित होईल व तिथे सफल झाली तर ग्रामीण शेतकरी कुटुंबापर्यंत जाईल.

मुलींना नोकरी-व्यवसायानिमित्त उपलब्ध झालेला बाहेरचा अवकाश हा त्यांच्या अपेक्षांना मुखर करतो. तर आपल्या परंपरागत धारणा अजूनही चालून जातील, असे भावी पत्नीला ग्रुहित धरणारा शहरी मध्यमवर्गीय तरुण समजतो !

वास्तवात हे नव्याने उपलब्ध झालेले स्वातंत्र्य व उत्कर्षाच्या संधी आणि त्यातील जीवघेणी स्पर्धा, अनिश्चितता यांचे सुस्पष्ट आकलन झाल्याशिवाय विवाहपूर्व संवाद वास्तवात फलदायी ठरणार नाही.
परिचयोत्तर विवाह केंद्रानेही हे बहुपदरी वास्तव आजच्या तरूणाई समोर ठेवणे गरजेचे आहे.
(समाप्त)

– किशोर मांदळे

0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *