भिमाकोरेगाव स्मारकासाठी निधी नसल्याने नाराजीची भावना… वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार : राहुल डंबाळे
पुणे : राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांमध्ये भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ शौर्य स्मारकासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजीची भावना तयार झाली असून भीमा कोरेगाव स्मारक लवकरात लवकर करण्याच्या राज्य शासनाच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणून या अर्थसंकल्पातच पुरेशी तरतूद करण्यात यावी असा आग्रह भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदीन समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे राहुल डंबाळे व डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी शासनाकडे केला आहे.
स्मरकासाठीच्या निधीसाठी उद्या दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने किमान 50 कोटी रुपये चालू वर्षासाठी भीमाकोरेगाव स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावेत व याद्वारे भूसंपादन तसेच अन्य पायाभूत सुविधा विकसित कराव्यात यासाठी अजित पवार यांचेकडे आग्रह धरणात येणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.
दरम्यान अजित पवार यांनीच स्मारकाची घोषणा केली असल्यामुळे ते ते हे स्मारक नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास असून आम्ही केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करतील असा विश्वास असल्याने या प्रकरणी लगेचच आंदोलन करण्याची कोणतीही गरज नसल्याचे राहुल डंबाळे यांनी यावेळी सांगितले.