मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मुंबई : मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबेडकरांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे.

आंबेडकरांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर आरोप केले. त्यांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ख्रिश्चन कुकी समाजावर अन्याय केल्याचे सांगितले. तसेच लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न :
१) जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग सरकारने ख्रिश्चन कुकी समाजाचे जातीय शुद्धीकरण का केले?
२) कुकी समाजाची घरे जाळली जात असताना, महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान गप्प का राहिले?
३) हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ते इतर राज्यांमध्ये प्रचारात व्यस्त का होते?
४) सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास मोदी सरकार नकार का देते?
५) आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?

आंबेडकरांनी या प्रश्नांच्या माध्यमातून मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सरकारकडून या घटनांबाबत ठोस उत्तर आणि कारवाईची मागणी केली आहे.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *