• 74
  • 1 minute read

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ३
————————–
‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

“तमसो मा ज्योतिर्गमय” असा आपल्या भारतीय-आध्यात्मिक अंतःप्रज्ञेचा मोक्षाप्रत नेणारा ऊर्ध्वप्रवास… तर, भाजपाई बनावट-बेगडी ‘हिंदुत्वा’चा प्रवास उलटा किंवा अधोगामी : ‘प्रकाशाकडून अंधाराकडे’ नेणारा…!!!

…सापाच्या विषासारखी या ‘अघोषित आणीबाणी’तली हुकूमशाही, गुलामगिरी (जशी ती, ‘गोदी-मिडीया’तल्या गलेलठ्ठ पगाराच्या अँकर्स, मालक-संपादक व इतर पत्रकारांच्या रक्तात उतरलीय); तुमच्याआमच्या अंगात-रक्तात हळूहळू खोलवर भिनू पहातेय… तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका!
तुमच्या मातीत घट्ट रुजू पहात असलेली ही विषवल्ली जर, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीत शेतातलं तण उपटून फेकून द्यावं, तशी… आपण मतपेटीतून उपटून फेकून दिली नाही; तर, मतदारराजा, तुझं ‘लोकशाहीचं पीक’ हातचं गेलं म्हणून समज! हे ‘हुकूमशाही’चं तण…तुमचंआमचं जीणं हराम करेल, जगणं मुश्किल करेल…आणि, त्याविरुद्ध, कोणी साधा आवाजसुद्धा उठवू शकणार नाही!
…आज लोकशाहीचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या विरोधकांना फक्त, तुरुंगातच डांबलं जातंय, उद्या रशियातला पुतीन करतो तसं, विरोधकांना तुरुंगात डांबून विष चारुन मारणं, किती दूर आहे?…कारण ते क्रौर्य, ती हुकूमशाही-जुलूमशाही प्रवृत्ती, या लोकांनी काळ्या टोपीसह इटलीचा नृशंस हुकूमशहा मुसोलिनीकडून उसनी घेतलीय.

…लक्षात ठेवा की, रावण प्रत्येकवेळी साधुचा वेष धारण करुनच सीतेचं अपहरण करतो, असं नव्हे; तो कधि कधि खुद्द रामाचाच वेष परिधान करुन येतो.
…भाजपा नावाचा ‘रावण’, ‘सब का साथ, सब का विकास’ पुटपुटत, विकासाचं सोंग घेऊन २०१४मध्ये प्रथम आला, २०१९मध्ये तो बालासोर ‘सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपाने ‘देशभक्ति’चं सोंग वठवत आला आणि आता २०२४मध्ये, अयोध्येतल्या राममंदिराच्या निमित्ताने रामभक्तिचं ‘दशावतारी-सोंग’ वठवत परत आलाय…आपण, गेल्या दोन्ही खेपेस फसलो. आपल्या देशातल्या ‘लोकशाहीरुपी सीते’चं अपहरण करुन, तो आज इथेच ठिय्या देऊन बसलाय (लंकेत परत जायची सोय नाहीच; ‘कच्चाथिवू’ बेटावरुन लंकेशी हकनाक दुश्मनी घेऊन बसलेत ना).
या लोकसभा-निवडणुकीनंतर आपल्या देशात निवडणुका होणारच नाहीत, असं नाही…त्या होतील; पण, त्या कशा होतील…तर जशा त्या चीन, उ. कोरिया व रशियामध्ये होतात, तशाच होतील. तिथल्या निवडणुकांमध्ये ‘लोकेच्छा’ नव्हे; तर, राज्यकर्त्यांची सत्तापिपासू ‘पाशवी इच्छा’ प्रतिबिंबित झालेली असते.
…नाहीतरी, ब्लादिमीर पुतिनसारखाच क्रूर, विकृत मनोवृत्तीचा रशियाचा भूतपूर्व अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन म्हणायचा की, “निवडणुकीत ‘मतदार’ महत्त्वाचे नसून ‘मत मोजणारे’ महत्त्वाचे असतात” (आपल्याकडे, EVMs, निवडणूक-आयोग आणि ईडी/आयटी/सीबीआयसारख्या दमनकारी सरकारी-यंत्रणा महत्त्वाच्या असतात). अशाच हडेलहप्पीने व दडपशाहीनेच तर, पुतिन आजवर बेगुमानपणे निवडणुका जिंकत आलेत. आपली सत्ता तहहयात कायम राखण्यासाठी राज्यघटनेत वेडेवाकडे बदल करत आलेत, विरोधकांना सरळ ठार मारत किंवा त्यांच्यावर विषप्रयोग करत आलेले आहेत…हाच, (रास)पुतीन नावाचा सत्तापिपासू फुगा, आपल्यासाठी ‘धोक्याचा कंदील’ बनून लोकसभा-निवडणुकीच्या तप्त हवेत वर लटकतो आहे…आपली नजर, किमान वर तर जायला हवी ना!

– राजन राजे(अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

0Shares

Related post

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन… मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड. वडिलांनी घरात एका…
धुळे जिल्हा वकील संघाचा बांधकाम विभागाला घेराव यशस्वी; लिफ्ट दुरुस्ती व नवीन लिफ्ट बसविण्याचे आश्वासन

धुळे जिल्हा वकील संघाचा बांधकाम विभागाला घेराव यशस्वी; लिफ्ट दुरुस्ती व नवीन लिफ्ट बसविण्याचे आश्वासन

धुळे जिल्हा वकील संघाचा बांधकाम विभागाला घेराव यशस्वी; लिफ्ट दुरुस्ती व नवीन लिफ्ट बसविण्याचे आश्वासन धुळे,…
मराठी माणसांच्या अहितासाठीच असणारी, ठाकरे बंधुंची युती कुणासाठी फायद्याची ?

मराठी माणसांच्या अहितासाठीच असणारी, ठाकरे बंधुंची युती कुणासाठी फायद्याची ?

उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या सेनांकडे महाराष्ट्राचे हित अस्मितेचा कधीच कुठला कार्यक्रम नव्हता व आज ही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *