- 10
- 1 minute read
महास्थवीर चंद्रमणी यांचा जन्मदिनानिमित्त
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 26
महास्थवीर चंद्रमणी यांचा जन्मदिनानिमित्त
पूज्य भदन्त ऊ. चंद्रमणी महास्थवीर यांचे कुशीनगर, उत्तरप्रदेश येथे दि. ८ मे १९७२ रोजी महापरीनिर्वाण झाले होते.
महाथेरो चंद्रमणी मूळ म्यानमार ( ब्रम्हदेश)चे होते. यांचा जन्म ६ जून १८७६ ला ब्रम्हदेश मधील आराकान प्रदेशातील अक्याब जिल्ह्यातील पौपडग्वाऊ या गावात झाला. त्यांचे लहानपणीचे नांव साबांऊ होते. त्यांच्या वडिलांचे नाव ऊ चोमो व आईचे नाव अवां असे होते. चंद्रमणी हे जेष्ठ बंधू होते म्हणून त्यांच्या नावाच्या पहिले ऊ शब्द लावला जातो. त्यांना एक बहिण व लहान भाऊ होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. भंते ऊ चंद्रिमा यांनी सन १८८८ मध्ये त्यांना श्रामनेरची दीक्षा देवून प्रव्रज्जित केले. सन १८९१ मध्ये त्यांना भारतात पाठविण्यात आले. ते कलकत्ता येथे आले. त्यानंतर ते ज्या ठिकाणी तथागत बुद्धाला संबोधि प्राप्त झाली त्या बुद्धगयेला दर्शन घेण्यासाठी गेले. त्याठिकाणी ब्रम्हदेशच्या राजाने बुद्धविहार निर्माण केले होते त्याठिकाणी श्रामनेर चंद्रा राहत होते. यावेळेस बुद्धगयेवर महंतांचा ताबा होता. त्या महंताने भंतेजीवर हल्ला केला व भिख्खूंना मारहाण केली. त्यानंतर भंते चंद्रमणी ब्रम्हदेशला परत गेले व १८९३ ला पुन्हा भारतात आले. भंतेजी कलकत्ता येथील महाबोधी सोसायटी मध्ये राहण्यासाठी गेले. त्यानंतर कुशीनगर येथे आले. तेथे त्यांनी बुद्ध विहार बनविले. त्यांनी पाली त्रिपिटकांचे अध्ययन केले. त्यांचे उपसंपदा झाल्यानंतर त्यांचे नाव भिख्खू चंद्रमणी ठेवण्यात आले. भंतेजी कुशीनगर येथे राहिले त्याठिकाणी एक विहीर निर्माण करण्याचे ठरविले. १८९६ साली त्याठिकाणी तथागताची महापरिनिब्बान मुद्रेत असलेली प्रतिमा सापडली. त्याठिकाणी छोटेसे विहार तयार करण्यात आले. त्या प्रतिमेची पूजापाठ ब्राम्हणाच्या हाती होते. या विहाराचे सुत्र बौद्धांच्या हाती यावे म्हणून भंतेजी नी इंग्लंड पर्यंत पत्रव्यवहार केला. सन १९०१ साली भंते चंद्रमणी यांनी कलकत्त्याच्या इंग्रज गव्हर्नरला अर्ज करून कुशीनगरच्या बुद्ध विहारात बुद्धाच्या प्रतिमेची पूजा करण्याची परवानगी मिळावी याकरिता अर्ज केला होता. परंतु तो नाकारण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी एक
शिलालेख सापडला होता. तो तथागतांच्या परिनिर्वाणाची आहे हे सिद्ध झाले. १९०४ मध्ये कुशीनगरचा बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात आला. भंतेजीनी कुशीनगर येथे निर्वाण धर्मशाळा,१९१० ला सारनाथ ला बर्मी धम्म शाळा,१९२६ ला महानिर्वाण स्तुप कुशीनगर आणि निःशुल्क पाठशाळा सुरू केली. तसेच श्रावस्ती येथे बौद्ध विहार व लुंबिनीचे बुद्ध विहार इत्यादी संस्थांना सहकार्य केले.
त्यांचे कुशीनगर येथून नागपुरात आगमन झाले. त्यांच्यासोबत भन्ते संघरत्न, भंते प्रज्ञानंद महाथेरो, भंते सद्दतिस्स महाथेरो नागपुरात पोहोचले होते. १४ ऑक्टोबर १९५६ विजयादशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सकाळी ९ वाजता महास्थवीर भंते चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सहपत्नी धम्मदीक्षा घेतली.
• पहिले बौद्ध पद्धतीचे लग्न…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्याच्या दुसर्याच दिवशी लष्करीबाग जुने हरदासनगर येथे बौद्ध पद्धतीने पहिले लग्न लावण्यात आले. हे लग्न महाथेरो चंद्रमणी यांच्या उपस्थितीत पार पडले. वर वामन मोटघरे तर वधू दमयंती रामटेके होत्या. पुढे याच जागेवर भारतीय सत्धम्म विहार उभे राहिले. या बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाथेरो चंद्रमणी यांच्या पवित्र अस्थी आहेत.
• बाबासाहेब आणि भंते चंद्रमणी यांच्यामध्ये धम्मदीक्षे अगोदरचा रंगलेला प्रसंग…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा कार्यक्रमाच्या अगोदर भंते चंद्रमणी यांच्या बरोबर धम्मदीक्षा या विषयावरती चर्चा करीत असताना बाबासाहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि भंते चंद्रमणी यांना विचारले होते कि, धम्मदीक्षा घेण्यासाठी काय करावे लागेल ? यावरती भंते चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना उत्तर दिले कि, धम्मदीक्षा घेण्यासाठी आपणास त्रिशरण, पंचशील ग्रहन करावे लागेल. या उत्तरावर बाबासाहेबांचे समाधान झाले नाही. बाबासाहेबांनी लगेच भंते चंद्रमणी यांना पुढील प्रश्न केला कि, त्रिशरण, पंचशील ग्रहन करुन झाल्यानंतर पुढे काय करायचे? यावरती भिक्खू चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना उत्तर दिले आणि म्हटले कि, त्रिशरण, पंचशील ग्रहन करुन झाल्यानंतर आपणास
बुध्दं सरणं गच्छामी
धम्मं सरणं गच्छामी
संघं सरणं गच्छामी
असे तीन वेळेस म्हणावे लागेल.
भंते चंद्रमणी यांनी असे उत्तर देताच बाबासाहेबांनी पुढील कोणताही प्रश्न केला नाही. कारण बाबासाहेबांनी मुळ ज्या कारणामुळे धर्म परिवर्तनाचा विषय भंते चंद्रमणी यांच्यापुढे उपस्थित केला होता. ते बोलण्याची वेळ आता आली होती. यांवरती बाबासाहेब भंते चंद्रमणी यांना म्हणतात. मी बुध्दाला शरण जाण्यास तयार आहे. मी धम्माला शरण जाण्यास तयार आहे. परंतु मी संघाला अजिबात शरण जाणार नाही. कारण बुध्दाला आणि धम्माला शरण जाण्यासाठी माझी मानसिक तयारी आहे परंतु संघाला शरण जाण्यासाठी माझी मानसिक तयार नाही. बाबासाहेबांच्या या मतावरती भंते चंद्रमणी यांच्यावरती खुप मोठे संकट आले होते. कारण बाबासाहेब धम्माचे खरे चिकित्सक होते. खरे प्रचारक होते त्यांना धम्माचा प्रचार शुध्द स्वरुपात पाहिजे होता. त्यांना बुध्दांचा धम्म संपुर्ण भारतभ जेर पसरलेला पाहायचा होता, आणि ही जबाबदारी भिक्खू संघाची होती. बुध्दांच्या काळातील भिक्खू संघाबद्दल बाबासाहेबांनी म्हटले होते कि, “Bikkhu Sangh Was The Army Of The World”. हा क्रांतीकारी भिक्खू संघ बाबासाहेबांना न दिसता आळसी, कामचुकार, विधी करुन निधी मिळविणारे, कर्मकांड करणारे, बुध्दांचा मुळ संदेश जनमाणसात पसरविण्याऐवजी भलता सलता विकृत प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ बाबासाहेबांच्या निदर्शनास आला होता यामुळेच बाबासाहेबांनी भारत बौध्दमय करण्याच्या दृष्टीने जे काही संकेत दिले होते त्यापैकीच एक म्हणजे असे कि, ‘गरज पडल्यास नवा भिक्खू संघ निर्माण करणे.’ ज्याप्रमाणे सम्राट अशोकांनी बौध्द धम्मामध्ये जंत आणि पंथ निर्माण करणार्या नकली साठ हजार भिक्खूंची बौध्द धम्मातून हकालपट्टी केली होती त्याचप्रमाणे वरील बाबासाहेबांचे वाक्य ही हेच दर्शविते. बाबासाहेब गरज भासल्यास नवा भिक्खू संघ निर्माण करु पहात होते. यामुळेच बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या वेळेस भंते चंद्रमणी यांना स्पष्ट सांगितले कि, मी संघाला शरण जाणार नाही. बाबासाहेबांनी वरील वाक्य निंदा किंवा चेष्टा या उद्देशाने भंते चंद्रमणी यांना म्हटले नव्हते तर जाणिवपुर्वक आणि विचारानेच ते असे बोलत होते. भंते चंद्रमणी हे त्याकाळातील अत्यंत हुशार आणि शिलवान असे भिक्खू होते. भंतेंना बाबासाहेबांच्या असे बोलण्याचा अर्थ समजला होता. बाबासाहेब ही भंतेचे हाव भाव टिपत होते. बाबासाहेबांनी भंते चंद्रमणी यांना पुढील प्रश्न केला आणि म्हटले कि, आपल्या या विवादीत चर्चेवरती काही तरी मार्ग असेल तर नक्कीच सांगा ? बाबासाहेबांचा हा प्रश्न सुध्दा खुप महत्वपुर्ण होता. ही चर्चा मिलिंद आणि नागसेन यांप्रमाणेच चालू होती असे म्हटल्यास अतिशियोक्ती ठरु नये. बाबासाहेब जर संघाला शरण गेले नसते धम्मदीक्षा झालीच नसती, हे भंते आणि बाबासाहेब देखिल चांगलेच जाणून होते. म्हणूनच भंते चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असेच उत्तर दिले आणि म्हटले कि, आपल्या विवादित चर्चेवरती नक्कीच मार्ग आहे आपण बुध्दाला सरण जाण्यासाठी तयार आहात. धम्माला सरण जाण्यासाठी तयार आहात मग आपण आताच्या काळातील संघाला सरण न जाता बुध्दांच्या काळातील संघास सरण जाण्यासाठी तयार आहात काय? यांवरती बाबासाहेबांनी म्हटले कि,
होय मी बुध्दांच्या काळातील संघास सरण जाण्यास तयार आहे. ही चर्चा झाल्यानंतरच धम्म दिक्षा कार्यक्रम संपन्न झाला. आजचा भिक्खू संघ आणि बुध्दांच्या काळातील भिक्खू संघ या दोघांच्या कार्यामध्ये बरेच अंतर आहे हेच बाबासाहेबांना दाखवायचे होते. बाबासाहेबांच्या मी संघास (आजच्या) शरण जाणार नाही या वाक्यामधून नक्कीच काहीतरी शोध आजच्या भिक्खू संघाने आणि बौध्द अनुयायीँनी घेतला पाहिजे…
* ४ थी बौद्ध धम्म विश्व परिषद…….
१५ नोव्हेंबर १९५६ ला नेपाळ मध्ये ही बौद्ध धम्म परिषद भरली. त्यावेळेस नेपाळचे राजे महेंद्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भंते चंद्रमणींना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. या प्रसंगी सर्वांना भंतेजींनी त्रिशरण आणि पंचशील दिले. या परिषदेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण जगप्रसिद्ध भाषण झाले. याप्रसंगी भदंत आनंद कौसल्यायन आणि भदंत राहुल सांकृत्यायन उपस्थित होते. नंतर ६ डिसेंबर १९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अकस्मात निधन झाले. या घटनेचा फार मोठा धक्का चंद्रमणी भंतेजींना बसला. या प्रसंगी बोलताना भंतेजी म्हणाले की, बाबासाहेब आपल्यात नाहीत म्हणून निराश होवू नका. त्यांचे विचार सतत आपण आदर्श मानावे. त्यांच्या शिकवणूकीचा विसर पडू देवू नका. बाबासाहेब भगवान बुद्धांनंतरचे खरे बोधिसत्व आहेत. मी बाबासाहेबांचा खरा गुरू पण माझ्या पेक्षाही माझा शिष्य मोठा विद्वान होता याचा मला अभिमान वाटतो. भंतेजी पूढे म्हणाले की,धर्माच्या वाढीसाठी आपण पडतील ते कष्ट उपसण्यास सज्ज राहिले पाहिजे. भंतेजींनी बुद्ध शासनाच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न केले. नंतर भंतेजींची तब्येत बिघडली. ते परत कुशीनगरला गेले. त्यानंतर त्यांचे निधन ८ मे १९७२ ला झाले. त्यांना बत्तीस देशांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या देशात त्यांच्या गावी त्यांचा जनतेने पुतळा उभारला. त्यांच्या कार्याला व त्यागाला अभिवादन…..

0Shares