• 125
  • 1 minute read

माझे वडील यांचा स्मृती दिवस: विनम्र आदरांजली: इ झेड खोब्रागडे.

माझे वडील यांचा स्मृती दिवस: विनम्र आदरांजली: इ झेड खोब्रागडे.

             माझे वडील यांचा आज स्मृती दिवस आहे. 1980 मध्ये त्यांनी मला सांगितले होते की अशी नोकरी कर ज्यामुळे लोकांना मदत करता येईल आणि कामामुळे समाजात ओळख होईल. त्यावेळी मी ONGC मध्ये मुंबई ला क्लास वन ऑफिसर होतो. मोठ्या पगाराची नोकरी असून ही गरिबांच्या, गरजूंच्या रोजच्या समस्या दूर करण्यासाठी काही करता येत नसेल तर काय उपयोग? असे ते म्हणाले आणि कलेक्टर बन असा सल्ला दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व कार्य त्यांच्यासमोर होते. माझे वडील शिकलेले नव्हते परतू शहाणे होते, सामाजिक जाणिवा होत्या, दूरदृष्टी होती. 14 ऑक्टोबर 1956 च्या धम्म क्रांती चा संदेश गावागावात पोहचला होता.

मी वडिलांचे म्हणणे मनावर घेतले आणि प्रयत्नांती कलेक्टर झालो. सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करत करत, शक्य तेवढे काम , प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन गरीब, गरजू व शोषीत, वंचितांच्या भल्यासाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे करताना, काही चुकलेही असेल , काही राहून ही गेले असेल मात्र प्रयत्न कुशल कर्माचा होता. Ambedkarism इन administration चा होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानामुळे प्राप्त अधिकाराचा हिंमतीने वापर करीत वर्ष 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातील शाळेच्या भिंतीवर दर्शनी भागात संविधानाची प्रास्ताविका लिहून घेतली व संविधान प्रास्ताविका वाचन सुरू केले, ह्याच वर्षी 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा केला. संविधान ओळख हा असा देशातील पहिलाच उपक्रम प्रथमतः नागपूर जिल्हयात सुरू झाला.पुढे 2015 पासून देशभर सुरू झाला. या कामामुळे थोडीशी का होईना , समाजात एक वेगळी ओळख मिळाली. हे घडून येण्यासाठी पत्नी रेखा हिचे फार मोठे योगदान व त्याग आहे. 45 वर्षांपूर्वी वडिलाने दाखविलेल्या मार्गावर चालत राहिलो त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेशानुसार काम इमानदारीने, स्वाभिमानाने करता आले ह्याचे निश्चितच समाधान आहे.
My Father is my Role model.

इ झेड खोब्रागडे भाप्रसे नि
23 सप्टेंबर 25.

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *