• 140
  • 1 minute read

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी ठरवण्याची कृती होती. हा बॉम्बस्फोट एक षढयंत्र होते, या देशातील २० कोटी नागरिकांच्या विरोधात रचलेले…! स्वतः बॉम्बस्फोट घडवून आणायचे व ते मुस्लिम समाजाने, त्यांच्या संघटनांनी घडवून आणले हे सिद्ध करायचे, या प्रकरणी त्यांना बदनाम करून त्यांच्या राष्ट्रप्रेमावर प्रश्नचिन्ह उभे करायचे व त्यांच्या नागरिकत्वालाच आव्हान द्यायचे, अशा एक नव्हेतर अनेक उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराने यासाठी अगदी तरबेज लोकांना या षढयंत्रात सामिल करून घेतले होते. धर्मगुरु साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी व सुधाकर चतुर्वेदी यांच्या सह अन्य तरबेज लोकांचा यामध्ये सहभाग होता. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कट कारस्थानाच्या वेळी ही नथुराम गोडसे यांनी सुंथा करून घेतली होती. टोपी घातली होती. याचीच पुनरावृत्ती हा बॉम्बस्फोट घडवून करायची असा प्रयत्न होता. पण तो तत्कालीन महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यामुळे फसला व हिंदू आतंकवादाचा जन्म झाला.

       १७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ रमजानचा महिना, शुक्रवारी मालेगाव येथील मशिदीच्या परिसरात नमाज अदा करून नमाजी मुस्लिम समाज बाहेर पडत असतानाच हा बॉम्बस्फोट झाला. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणाला तत्काळ अटक करण्यात आली. हा बॉम्बस्फोट इस्लामिक आतंकवादातून झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. पुढे स्टूडन्स इस्लामिक मुंव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या इस्लामिक विद्यार्थी संघटनेला यात गोवण्याचा प्रयत्न झाला. पण तत्कालीन एटीएस प्रमुख यांनी केलेल्या तपासामुळे हिंदू आतंकवादाचा चेहरा पुढे आला. करकरे यांनी योग्य तपास न करता यात सिमीलाच दोषी ठरविले असते तर आज मुस्लिम समाजाच्या विरोधात देशभर वेगळेच वातावरण निर्माण झाले असते.
      आज १७ वर्षांनंतर यावर बोलण्याचे व लिहिण्याचे कारण इतकेच आहे की, येणाऱ्या ८ मे रोजी या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागणार असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी हिंदूच्या धर्मगुरु, भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, संघ परिवारातील अभिनव भारत या संघटनेचे कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी अन् सुधाकर चतुर्वेदी या ७ आरोपींना बॉम्सफोटाचे कट कारस्थान रचल्याचा आरोपाखाली मृत्यदंडाची शिक्षा होणार आहे. मृत्यूदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा होणार आहे.
       मालेगावात ज्या मशिदीच्या परिसरात हा बॉम्बस्फोट झाला तेथे प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावे असलेली एक मोटर सायकल सापडली. पुढे यातील एक एक आरोपी पकडले गेले. या प्रकरणात १३ आरोपीचा समावेश आहे. सर्व हायप्रोफाइल आहेत. घटनेला १७ वर्ष उलटून गेली आहेत. या दरम्यानच्या काळात मुख्य आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला भाजपने भोपाळमधून लोकसभेवर निवडून आणले, भाजपच्या मुख्य प्रवाहातील एक चेहरा बनविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अनेक वेळा क्लिनचीट दिली. पण एटीएसकडे सबळ पुरावे असल्याने प्रज्ञासिंगला अभय मिळू शकले नाही.
       या प्रकरणातून प्रज्ञासिंगची सुटका व्हावी म्हणून हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडून काढून ते राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आले. पण देशात दहशवाद माजविण्यासाठी संघाने जी टीम तयार केली आहे ती मानवी समाजासाठी फारच घातक असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आल्याने त्यांनी ही या प्रकरणी मोदी सरकारच्या दबावाला बळी न पडण्याची भूमिका घेतली व प्रज्ञासिंग सह अनेकांना दिलेला जामीन रद्द करून त्यांची चौकशी चालूच ठेवली. या चौकशीतून आणखी बॉम्बस्फोटाच्या घटना व या संघी गँगचा त्यातील सहभाग पुढे आला. यातील एक प्रमुख आरोपी असिमानंदचा तर समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात संबंध असल्याचे उघड झाले.
       महात्मा गांधींची हत्या, त्यानंतर गोडसे व गँगने त्यांच्यावर केलेले सशस्त्र हल्ले, त्यामागील संघ व सावरकरांचा सहभाग या साऱ्या गोष्टी संघ एक अतिरेकी संघटन आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. कट कारस्थाने न करता धार्मिक द्वेषाचे राजकारण केले तर लोक सोबत येत नाहीत, हा अनुभव संघाला आल्यानंतर त्यांनी मुस्लिम द्वेषाचा मुद्दा प्रमुख मुद्दा बनवून हिंदुना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी बाबरी मशिदीची निवड करण्यात आली. संसदीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या अनेकांना डावलून मोदींना २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनविले. संघाच्या विश्वासास पात्र ठरत मोदीने वर्षभरातच सन २००२ मध्ये गोध्रा कांड घडवून ५९ हिंदुना कंठस्नान घातले. पुढे गुजरातच्या दंगली घडवून आणल्या. संसदीय राज्य व्यवस्थेत राज धर्म पायदळी तुडविणारा नेता संघाला हवा होता. तो मोदीच्या रूपाने संघाला मिळाला होता. मोदीने गुजरातला आतंकवादाची प्रयोगशाळा बनविली. त्याचं प्रयोगशाळेतून मालेगाव हत्याकांडातील आरोपी बाहेर पडलेले आहेत. इतकेच काय पुलवामा हत्याकांडात वापरलेली कार ही गुजरामधीलच आहे. यावरूनच मोदी व आतंकवाद हे नाते किती घट्ट आहे याची प्रश्चिती येते.

      संघ अगदी स्थापनेपासून अतिरकी कृत्य आणि घटनांमध्ये लिप्त असल्याचे अनेक वेळा उघड झाल्याने संघावर बंदी ही घातली गेली होती. विदेशातील अनेक देशांमध्ये अतिरेकी संघटन म्हणून ही संघावर अघोषित बंदी घातली गेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातील संघाची भूमिका देशविरोधी राहिली आहे. देशाचे संविधान असेल, लोकशाही राज्य व्यवस्था असेल अथवा तिरंगा ध्वज असेल संघ या विरोधातच राहिला असल्याने संघ राष्ट्रविरोधी आहे. हे उघड सत्य आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संघ अशा देशविरोधी कृत्यात सतत लिप्त असल्याचे आढळून येते. संघाशी संबंधित असलेल्या परिवारातील अनेक जण आज ही देशाची गुपिते शत्रू राष्ट्रांना देत असताना पकडले गेले आहेत. पकडले जात आहेत. देशात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटाशी संघ संबंधित आहे. अगदी तरबेज टीम संघाने अशी अतिरेकी कृत्य करण्यासाठी उभी केली आहे.

     मालेगाव बॉम्बस्फोट याच अतिरेकी कृत्याचा साखळीतील एक मोठे कृत्य आहे. यावर आता देशातील सर्वोच्च तपास यंत्रणाने शिक्कामोर्तब केला असून अतिरेकी कृत्यात सामिल असलेल्या संघींना मृत्यदंड देण्यात यावा, अशी मागणी या यंत्रणांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालय यावर येत्या ८ मे रोजी आपली मोहर उठवेल, तेव्हा हिंदू धर्मगुरू साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व तिच्या सोबत मालेगाव बॉम्बस्फोट घटनेचा कट रचणाऱ्या अन्य ६ जणांना फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल…!

………..

– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…
धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

देश के मातम के माहोल को संघ और मोदी सरकार जिम्मेदार…!        पुलवामा के…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *