- 594
- 2 minutes read
मोदीच्या पराभूत बॉडी लँग्वेजमुळे संघ / भाजपचे धाबे दणाणले…!
भाजपसाठी ईडी, सीबीआय अन् दस्तुरखुद्द निवडणूक आयोगच निवडणुकीच्या मैदानात…!!
मोदीची भाषणं आणि बॉडी लुग्वेजवरुन पराभव स्पष्ट दिसू लागताच संघ व भाजपचे धाबे दणाणले असून त्यांनी आता प्रचाराची दिशा बदलली आहे.” इंडिया आघाडीतील नेते एका बाजुला व मोदी अकेला दुसऱ्या बाजुला तरी ही मोदीच भारी, ” असा प्रचार आता जबरदस्तीने सुरु केला आहे. मोदीच्या पराभूत बॉडी लँग्वेजला सावरण्याचा हा अखेरचा प्रयत्न म्हणून हे सारे करण्याचा खटाटोप सुरु आहे. मोदीने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात उभी केलेली अंधभक्त , मूर्ख अन् खोटारड्यांची फौज हे सारे करीत आहे. गोदी मिडिया, भाजप व संघाच्या आय. टी. सेलमधील पोटार्थी दलाल ही कामाला लागले आहेत.
पण सर्व संसदीय परंपरा, संविधान , कायदे पायंदळी तुडवित सीबीआय, ईडी यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करीत विरोधकांना दिला जाणारा त्रास, विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवून भाजपात सामिल करुन घेतले जात आहे व मग त्यांनाच सोबत घेऊन मोदी लढत आहे. विशेष म्हणजे या देशात सध्या भाजप कुठलीच निवडणूक लढवित नाही. भाजपच्या वतीने ईडी, सीबीआय व निवडणूक आयोगच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, हे सारा देश उघड्या डोळ्याने पाहत आहे. तसेच धर्मांधतेच्या नावाखाली या देशातील तरुणांच्या मेंदूची नसबंदी करुन, त्यांना नपुसंक करुन भाजप निवडणुका लढवित आहे. अन्
अंधभक्त अन् दलाल गोदी मिडिया मोदींचे गुणगान गात आहे,
अंधभक्त अन् दलाल गोदी मिडिया प्रचार करीत आहे की, सर्व विरोधकांशी मोदी एकटाच लढत आहे. मग शिवसेना फोडून शिंदेला उरावर का घेतलेय ? राष्ट्रवादी तोडून अजित पवारांना का बोकांडी बसविले आहे ? मोदी एकटाच लढत आहे, तर देशातील ४१ राजकीय पक्ष एनडीएत का आहेत ? त्याशिवाय संघ व संघ परिवारातील शंभरीक संघटना या जुमलेबाजासोबत का म्हणून आहेत ? अन् साऱ्या तपास यंत्रणा व निवडणूक आयोग व दस्तुरखुद्द EVM मशीन ही मोदीलाच का साथ देत आहे ? जी मोदीसारखीच चोर व लबाड आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवाराला मिळालेले मत चोरून ती मतं भाजप उमेदवाराला का देत आहे ? हे सारे प्रश्न आहेत व उत्तरे देशातील जनतेला माहित आहेत. त्यामुळे या खोट्या प्रचाराला कुणी बळी पडणार नाही.
इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांशी मोदी एकटा लढतोय या बाता मारणे ठीक आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, लढण्याची हिंमतच मोदीमध्ये आता राहिलेली नाही. असती तर ज्या नितीशकुमारच्या DNA बद्दल मोदीने जाहीर विधाने केली आहेत, त्या नितीश कुमारला मोदीने सोबत घेतलेच नसते. लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्या समोर आपला टिकाव लागणार नाही, बिहारमधील सपशेल पराभव दिसत असल्याने मोदीने नितिश कुमारला सोबत घेतले. लोकसभेच्या ४० जागा असलेल्या राज्यातील सपशेल पराभव आपल्याला सत्तेच्या बाहेर फेकून देईल, या भीतीपोटी त्याने नितीशकुमारला जवळ केले. एकट्या लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांना घाबरणारा मोदी सर्व विरोधकांशी काय लढणार ?
दिल्ली अन झारखंडमधील पराभव ही स्पष्ट दिसत असल्याने तेथील लोकनियुक्त सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व हेमंत सोरेन यांना ईडीचा गैरवापर करुन मोदीने तुरुंगात टाकले. सरळ मुकाबला करण्याची कुठलीच क्षमता मोदीच काय भाजप व संघामध्ये ही दिसत नाही. इथे ही भाजपच्या विजयासाठी ईडी व सीबीआयच जीवाचे रान करीत आहेत. लढण्याची व विजय मिळवून देण्याची कुवत मोदींमध्ये असती, तर या तपास यंत्रणांची मदत घ्यावी लागली नसती.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनंत उपकार विसरून मोदीने उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद कुटील डाव करुन हिरावून घेतले. सर्व संसदीय परंपरा पायदळी तुडवित शिवसेनेला फोडले, शिलेदार,आमदार व खासदार तोडले, पक्ष, चिन्ह हिरावून घेतले. परिवाराला तुरुंगात टाकायच्या धमक्या दिल्या, इतकेच काय उद्धव ठाकरेंच्या बापाला ही स्वतःचा बाप म्हणून जाहीर केले. दुसऱ्यांचा बाप चोरणारा, जुमलेबाज, फेकड्या शूरवीर कसा असू शकेल ? त्याला लढाऊ म्हणण्याची हिंमत फक्त मेंदूची नसबंदी झालेले नपुसंक अंधभक्तच करु शकतात. कारण ही हिंमत लाज, शरम नसलेलेच करु शकतात. आपले सर्वस्व हारल्यानंतर ही उद्धव ठाकरे अख्या संघ व भाजपला पुरून उरले आहेत. आपला निभाव लागत नाही, हे पाहिल्यावर मोदीने जाहीरपणे उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरणागती पत्करली आहे. अन् अंधभक्तांची गँग मोदीच्या लढाईच्या बाता मारताना थकत नाही. या बाता आता चेष्टा, मस्करीच्या ठरल्या आहेत. ठरत आहेत.
चौकीदार चोर, फेकू, जुमलेबाज असे काही शब्द गुगलवर टाईप केले तर मोदीचे नाव व फोटो गुगल आपल्या समोर आणतो. इतकी बेइज्जती या पदाची मोदीमुळे होत आहे. एक जोकर म्हणून मोदीची प्रतिमा जगभरात उभी राहिली आहे. पंतप्रधान म्हणून मोदीचे जे काही अवमूल्यन झाले आहे, ते देश व देशातील जनतेच्या अस्मितेला तडा देणारे आहे. त्यामुळे या मोदीच्या भक्तांनी असा किती ही प्रचार केला तरी मोदीची औकात आता सर्वांनाच माहित आहे.
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)