• 109
  • 1 minute read

म.गांधींच्या मारेकऱ्यांना देशभक्त साबित करण्यासाठी गांधी अन डॉ.आंबेडकर यांचेच नाव व वलयाचा हिंदुत्ववाद्याकडून प्रयत्न…!

म.गांधींच्या मारेकऱ्यांना देशभक्त साबित करण्यासाठी गांधी अन डॉ.आंबेडकर यांचेच नाव व वलयाचा हिंदुत्ववाद्याकडून प्रयत्न…!

           महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून सावरकराने ब्रिटिशांकडे माफी मागितली व एक नव्हे 13 माफीनामे लिहिले, राजनाथ सिंग यांच्या या झूठनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी हत्ये प्रकरणात गोडसे व सावरकरांना मदत करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती, असे सावरकरांचे वकील एल. बी. भोपटकर यांचा हवाला देवून सोशल मिडियावर काही व्हिडिओ वायलर होऊ लागले आहेत. देशात संघाच्या विचाराचे अन मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले असताना ही संघ व सारा हिंदुत्ववादी परिवार नथुराम गोडसे व सावरकरांना देशभक्त म्हणून सिद्ध करू शकले नाहीत . करू ही शकत नाही. त्यामुळे गांधी अन आंबेडकर यांच्या नावाचा, वलयाचा वापर करून गोडसे व सावरकर यांना देशभक्त असल्याचे सिद्ध करण्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे…

         महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकर हे ही एक आरोपी होते. अन त्यांना मुद्दाम या प्रकरणात अडकविले नव्हते, तर प्रथमदर्शी सर्व पुरावे होते. सावरकरांना आरोपी बनविताना तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संदर्भातील सर्व कागदपत्रे पाहिल्यावरच सावरकराना आरोपी बनविण्यात आले. त्यामुळे गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना कट कारस्थान करून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अटकविले, या संघ व हिंदुत्ववाद्याकडून होणाऱ्या आरोपात काही तथ्य नाही.महात्म्याचे मारेकरी गोडसे तर आहेच पण संघ, हिंदू महासभा अन सावरकर ही आहेत.
         हे खरे आहे की, गांधी हत्या खून खटल्यातून सावरकर यांची निर्दोष मुक्तता झाली. पण ती पुरावे सादर न केल्यामुळे झालेली आहे. न्यायालयाने निकालपत्रात कुठे ही म्हटलेले नाही की, हत्या प्रकरणात सावरकरांचा संबंध नाही. तर न्यायालय म्हणते पुरावे सादर न केल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात येत आहे. खटल्यात न्यायालयाला अपेक्षित असलेले पुरावे का सादर करण्यात आले नाहीत. हा आज खरा संशोधनाचा विषय आहे.
         ब्राह्मणी, वैदिक धर्माच्या ठेकेदारांचे दुखणे हे आहे की,काही केल्या गांधी अन आंबेडकर संपत नाहीत, तर किती ही प्रयत्न केले तरी गोडसे अन सावरकरांना राष्ट्रभक्त म्हणून मान्यता मिळत नाही, हे या देशातील ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा ठेका घेतलेल्या संघ, विश्वहिंदू परिषद व हिंदू महासभेला कळून चुकले आहे. त्यामुळे गांधी, आबेडकरांचे नाव घेऊनच गोडसे व सावरकर यांना किमान मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न आता या धर्मांध शक्तींनी सुरु आहे. त्यासाठी सोशल मिडियाचा वापर सुरु करण्यात येत असून….. गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना आरोपी बनविण्यास सरदार पटेल व डॉ. आंबेडकरांचा विरोध होता, हे खोटे संदर्भ देवून व्हिडिओ बनून वायलर केले जात आहे. खोटा प्रचार केला जात आहे. भ्रम पसरविला जात आहे.
        मनोहर मालगांवकर नावाच्या संघाच्या प्रचारकाने ‘ द मॅन हू किल्ड गांधी ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात लिहिले आहे की, गोडसेला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात तत्कालीन कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. गोडसेला फाशी ऐवजी जन्मठेप झाली पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांचे मत होते. असे या पुस्तकात लिहिले असून त्यास सावरकराचे वकील भोपटकर अन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न झालेल्या भेटीचा संदर्भ देण्यात आला आहे. गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना विनाकारण गोवण्यात आले असल्याचे डॉ. आंबेडकर यांचे मत होते, असा उल्लेख या पुस्तकात आहे.असा खोटा प्रचार या पुस्तकाचा आधार घेऊन केला जात आहे.
         या संदर्भात भोपटकर म्हणतात,….. एक दिवस मी दिल्लीतील हिंदू महासभेच्या कार्यालयात सावरकर यांच्यावरील आरोपाच्या कागदपत्रांचा अभ्यास करीत असताना तत्कालीन कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मला फोन आला व त्यांनी मला दिल्लीतील मथुरा रोड, छटे मिल या ठिकाणी भेटायला बोलविले. मी भेटायला गेलो, तर डॉ. आंबेडकर स्वतः कार चालवीत मला भेटायला आले व त्यांनी गोडसेची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपची करण्याची इच्छा व्यक्त केली. तर सावरकरांना जाणीवपूर्वक या हत्याकांडात अडकविण्यात आले असल्याचे सांगितले. आंबेडकर पुढे म्हणतात…. सरदार पटेल अन मी स्वतः या विरोधात होतो, असे या पुस्तकात भोपटाकराचा संदर्भ देवून लिहिले आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, ही भेटच बनावट व भ्रम निर्माण करण्यासाठी रचलेले कारस्थान आहे. डॉ. आंबेडकर यांना कारच चालविता येत नव्हती. मग ते कार चालवीत आले हा खोटेपणा या कथित भेटीची पोलखोल करतो.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे काही केवळ राष्ट्र पुरुष अथवा भारतरत्न नाहीत. ते साऱ्या विश्वात वंदनीय आहेत. त्यामुळे आपल्या बद्दल त्यांची चांगली मतं होती, हे सांगण्याचा प्रयत्न अनेक वेळा खोटे संदर्भ देवून या धर्मांध शक्ती करीत आलेल्या आहेत. गोडसे हा महात्म्याचा मारेकरी आहे. अन सावरकर या खटल्यातून पुराव्या अभावी सुटले आहेत की त्यांना सोडविले आहे. त्यामुळे अशा हत्याऱ्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सहानुभूती असूच शकत नाही.
………………………………………

  • राहुल गायकवाड,
    महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *