• 285
  • 2 minutes read

॥ऐरणीवरच्या ठिणग्या॥१९॥ इरोम शर्मिला जर तू…

॥ऐरणीवरच्या ठिणग्या॥१९॥ इरोम शर्मिला जर तू…

इरोम शर्मिला
लष्करी कायद्याच्या विरोधात
स्रीजातीच्या अब्रुसाठी
तू १६ वर्षे उपोषण केलं
तुझ्या योगदानाची
मणीपूरी महिलांनी
नव्वद मतांच दान करुन
बोळवण केली

उपोषणाऐवजी जर तू
साध्वी बनून
आश्रम काढला असता
देशभर तुझ्या आश्रमांचं
साम्राज्य निर्माण झालं असतं
आणि मग तू
इलेक्शनला उभी राहिली असती
तर विक्रमी मताधिक्याने
निवडून आली असती
इतकंच काय
मंत्रीही झाली असती

वेडाबाई!
महिला बिचाऱ्या
फार भाविक असतात
त्यांच्याकडे मतांचा जोगवा
मागण्यापेक्षा त्यांच्यापुढे तू
दानपेटी ठेवली असती
सोन्या-नाण्यांनी ती
ओसंडून वाहीली असती

विषमतावादी ब्राह्मणी भांडवली
व्यवस्थेचं समर्थन आणि
पुरुषप्रधान व्यवस्थेचं
गुणगान गाणारी
कीर्तन-प्रवचनं केली असती
तर महिलांनी मंडपात
प्रचंड गर्दी केली असती
सहा आकडी
बिदागी मिळाली असती

त्या भांडवलावर
हर्बल सौंदर्यप्रसादनांचे
उत्पादन सुरु करुन
आध्यात्मिक साम्राज्याबरोबर
आर्थिक साम्राज्यही उभारले असते
कणग्यात पैसे साठवले असते

जिवंतपणीच तू
नवसाला पावणारी देवी म्हणून
ख्यातकिर्त झाली असती.
हळदीकुंकवाने मळवट
अनं खणानारळाने तुझी
ओटी भरायला महिलांची
झुंबड उडाली असती.

सोळा वर्षे तपश्चर्या करुन
ख्याती तुझी पोहचली
फक्त नव्वद जणांपर्यंत
पण भगवी-श्वेत वस्र
परिधान करणाऱ्या साध्वींना
कोणत्याही साधनेविना
अख्खा भारत ओळखतो
सर्व सुखसाधने
त्यांच्या पायाशी लोळतात
नि हजारो भक्त
त्यांच्या पायांवर लोळण घेतात

तू सायकलीवर फिरत
मतं मागत बसली
बये!
मतांसाठी चारचाकी वाहनातून
रोड शो करावे लागतात
‘पुअर’ शो नाही
लोक पुअर उमेदवाराला
मतं देत नाहीत
कारण जो स्वतःची
उन्नती करु शकत नाही
तो लोकांची उन्नती
काय खाक करणार!
जो स्वतः खातपित नाही
तो आम्हाला
खाऊपिऊ घालणं दूरच
खाऊपिऊही देणार नाही

मित्रहो!
हे विनोदावारी घेऊ नका
आता आमच्यासाठी
उपोषणं करायला
कोणीही धजणार नाही
रडायला माणसं मिळत नव्हती
आता हसायला मिळत नाहीत
उद्या उपोषणकर्तेही
भाड्याने आणावे लागले
तर नवल नाही

सुभाषचंद्र सोनार,
राजगुरुनगर.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *