• 45
  • 1 minute read

रशियाकडून तेल खरेदी हा बहाणा आहे ; भारताने चीन-रशियाच्या ब्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी दडपण आणणे हा निशाणा आहे !

रशियाकडून तेल खरेदी हा बहाणा आहे ; भारताने चीन-रशियाच्या ब्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी दडपण आणणे हा निशाणा आहे !

          अखेरीस ट्रम्प यांनी भारताला वाढीव आयात करच नाही तर पेनल्टी देखील लावलीच. ब्राझीलच्या जोडीला आता भारताला पण ५० टक्के आयात कर लागणार

असे निर्णय झाले की ट्रम्प मनमानी करतात असे म्हटले जाते. पण हे अर्धसत्य आहे. त्यांच्या वरकरणी वाटणाऱ्या “मॅडनेस” मध्ये काही एक “मेथड” आहे.

ट्रम्प यांच्या आयातकर धोरणाचे एक उद्दिष्ट स्पष्ट दिसते. अमेरिकेचे व्यापारीच नाही तर समग्र हित केंद्रस्थानी ठेवणे, बदललेल्या जागतिक संदर्भात अमेरिकेचे प्रभुत्वस्थान अबाधित ठेवणे, दादागिरी सुरूच राहील हे पाहणे आणि त्यासाठी “आयातकर अस्त्र” (“वेपनायझेशन ऑफ टेरीफ”) इतर राष्ट्रांविरुद्ध वापरणे, हे ते उद्दिष्ट आहे.

आयात कर केंद्री चर्चा भ्रामक आहेत. व्यापार कराराच्या वाटाघाटी नावापुरत्या आहेत. ट्रम्प यांचे अनेक “बिगर व्यापारी” निकष आहेत. आपल्यासमोर झुकणारे कोण आणि आपल्याला आव्हान देणारे / देऊ शकणारे अशा दोनच कॅटेगरी आहेत
_________

मित्र राष्ट्रांना झुकते माप

अमेरिकेबरोबर “नाटो” सारख्या संरक्षण करारात सामील असलेल्या (युरोपियन युनियन); अमेरिकेतील सरकारी रोख्यात गुंतवणुकी केलेल्या (जपान); अमेरिकन उद्योगात नवीन गुंतवणुकीची आश्वासने देणाऱ्या (दक्षिण कोरिया)

ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका)

या समूहाच्या वाढत्या ताकदीमुळे, आणि या गटावरील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे, अमेरिकेमध्ये अस्वस्थता आहे. आपल्या आयातकर धोरणांत ट्रम्प यांनी त्या समूहातील राष्ट्रांना निवडून टार्गेट केलेले दिसते. त्यासाठी बिगर व्यापारी कारणे सांगितली जात आहेत. तरी उद्दिष्ट या समूहातील राष्ट्रांना अमेरिकेशी पंगा न घेण्याचा इशारा देण्याचे आहे हे उघड आहे.

भविष्यात अमेरिकेच्या अनेक दशकांच्या प्रभुत्ववादाला आव्हान ब्रिक्स समूहाकडून मिळू शकते. म्हणून या राष्ट्रांना निवडून निवडून / चुन चुनके टार्गेट केले जात आहे. अपवाद चीनचा, जरी तो ब्रिक्स मध्ये सर्वात मोठा असला तरीही. कारण सध्यातरी अमेरिकेचे हात चीनच्या दगडाखाली अडकले आहेत म्हणून.

रशिया:
रशियाने युक्रेनशी छेडलेल्या युद्धानंतर अमेरिकेने रशियाबरोबरचे व्यापारी संबंध जवळपास संपुष्टात आणले आहेत. त्यामुळे रशियावर वाढीव आयातकर लावण्याचा मुद्दाच निकालात निघतो.

चीन
अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, इतर सर्व राष्ट्रांच्या तुलनेत चीनकडून सर्वच आघाड्यांवर उभी केली जात असलेली आव्हाने सर्वात गंभीर आहेत. एका स्वतंत्र करारानुसार चीनवर ३० टक्के आयातकर असतील. म्हटले तर सर्वात जास्त आयात कर चीन वर असावयास हवेत. पण अमेरिका चीनवर अधिक अवलंबून आहे , चीन अमेरिकेवर कमी

दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय नागरिकांवर वांशिक भेदाभेद केला जात असल्याचा आरोप ट्रम्प करत असतात. दक्षिण आफ्रिकेवर ३० टक्के आयातकर असतील.

ब्राझिल
ब्राझीलवर लावलेले ५० टक्के आयातकर. हे सर्वच राष्ट्रांत अधिकतम आयातकर आहेत. यात लक्षात घ्यायचा मुद्दा हा की ब्राझील बरोबरील अमेरिकेचा आयात निर्यात व्यापार शिलकीमध्ये आहे. ब्राझीलचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुल्ला, ब्राझीलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बोलसनारो यांची राजकीय मुस्कटदाबी करतात असा आरोप ट्रम्प करतात. बोलसानारो उजव्या विचारसरणीचे आणि ट्रम्प यांचे कट्टर पाठीराखे आहेत.

भारत
भारतावर ट्रम्प यांनी २५ टक्के आयातकर आणि त्याशिवाय अतिरिक्त पेनल्टी २५ टक्के. म्हणजे एकूण ५० टक्के. भारत रशियाकडून तेल आयात करतो हे जर ५० टक्के करांचे कारण असेल तर युरोप देखील रशियाकडून मोठ्याप्रमाणावर तेल खरेदी करतो, त्यावर फक्त १५ टक्के आयातकर आहेत, खुद्द अमेरिका रशियाकडून खनिजे वगैरे आज देखील आयात करत आहे

संजीव चांदोरकर (७ ऑगस्ट २०२५)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *