• 112
  • 1 minute read

ट्रम्पकडून भारताला सिंगल आऊट केले जात आहे? 

ट्रम्पकडून भारताला सिंगल आऊट केले जात आहे? 

           हो. कारण सुरु असणाऱ्या वाटाघाटी मध्ये भारतावर टांगती तलवार ठेवायची आहे आणि दुसरे कारण , भारताने चीन रशिया गटात सामील होऊ नये म्हणून 

त्यासाठी आयात कर अस्त्र वापरले जात आहे. त्याला दोन उद्दिष्टे आहेत. एक, व्यापारी आणि दोन भू राजनैतिक !

व्यापारी 

अमेरिका सोयाबीन , मका इत्यादी शेतमालाचा आणि डेअरी प्रोडक्ट्सचा मोठा उत्पादक आहे. आणि हा शेतमाल जेनेटिकली मॉडिफाइड आहे. बदलत्या जागतिक व्यापाराच्या संदर्भात त्याला या शेतमाल , डेअरी मालासाठी मार्केट हवे आहे. अमेरिका संरक्षण साहित्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे. त्यासाठी मार्केट हवे आहे 

भारताने रशियाकडून संरक्षण सामुग्री / ऊर्जा घेणे थांबवले / कमी केले तरच अमेरिकेचा माल खपू शकणार आहे 

भू राजनैतिक 

ट्रम्प नाही तर अमेरिका या सुपरपॉवरला चिंता आपल्या जगातील प्रभूत्वाची / हेजेमनी. त्याला आव्हान चीन या अक्षाभोवती जे दुसरे पॉवर सेंटर उभे राहत आहे ते देऊ शकते याची त्याला मनोमन खात्री आहे. भारताने 

चीनच्या वाढत्या प्रभावाखाली जाणाऱ्या ब्रिक्स किंवा तत्सम अंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाऊ नये ही अमेरिकेची इच्छा आहे. भारताला अमेरिकेच्या प्रभावात असणाऱ्या गटात / गोटात खेचले जाणार आहे. 

आपण व्यापार करार वाटाघाटी सुरु आहेत असे म्हणतो. पण ती अर्धी देखील स्टोरी नाही. अनेक बिगर व्यापारी अटींवर , संबंधनावर चर्चा , सहमती साठी या असतात. 

२५ टक्के अतिरिक्त आयतकाराला २१ दिवसांची मुदत दिलेली आहे. सुरु होणारी सहावी फेरी त्या मुदतीत संपेल, संपवा हा मेसेज आहे. 
वाढीव आणि आधीचे देखील आयातकर वाटाघाटांच्या टेबलवरील निगोशिएशन चिप्स आहेत. 

संजीव चांदोरकर (८ ऑगस्ट २०२५) 

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *