- 103
- 1 minute read
लोकसभा निवडणुकीत भाजपला किमान बहुमतापासून कोसो दूर ठेवणाऱ्या इंडिया आघाडीला मूठमाती देण्यात मविअच्या नेत्यांना यश
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 124
मविआतील घटक पक्षांनी आपसातील सन्मान जपत जागा वाटून घ्याव्यात; डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांना सन्मानजनक जागा सोडाव्यात
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुदतीत होणार की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार, अशी दाट शंका निर्माण झाली होती. पण या शंकेच्या वातावरणातच निवडणुका जाहीर झाल्या. कार्यक्रम ठरला. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे, तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी म्हणजे 3 च दिवस अगोदर लागणार आहेत. याच 3 दिवसात नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी व्हायला हवा तरच राज्याला नवे सरकार मिळेल, अन्यथा राष्ट्रपती राजवट अटल आहे. अन राष्ट्रपती राजवट लागली तर यावेळी ही घोडेबाजार होईल. घोडे बाजारात भाजप बाजी मारेल, हा गेल्या दहा वर्षातील अनुभव आहे. त्यामुळे मविआने निवडणुकीत बाजी मारण्याच्या रणनीती सोबतच निकालानंतरच्या 3 दिवसातील रणनीती ही ठरवूनच निवडणुकीच्या मैदानात उतरने गरजेचे आहे. आता वरपासून खालपर्यंत प्रचंड कटुता निर्माण करून जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर यासंदर्भातील निर्णय मविआच्या नेत्यांनी घ्यावा. पश्चाताप करण्याची वेळ येवू द्यायची नसेल तर घेतलाच पाहिजे.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व उद्धव सेना या मविआतील हे 3 ही प्रमुख पक्ष विधिमंडळातील आपला नेता या 3 दिवसात सहज निवडू शकतील, पण मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे काय? ते ही ठरवूनच निवडणुकीला सामोरे जाणे मविआ अन राज्याच्या ही हिताचे ठरेल. पण राज्याच्या हिताचे कसलेच सोयरसुतक या पक्षांना नाही. जागा वाटपावरून जी रस्सीखेच सुरु होती व आहे, त्यावरून हेच स्पष्ट दिसत आहे.या 3 प्रमुख घटक पक्षांनी प्रत्येकी किती जागा लढावाव्यात या पेक्षा महत्वाचे आहे की, समोपचाराने जागा वाटप करून भाजप व मित्र पक्षांचा पराभव कसा करता येईल. पण जागा वाटपामध्ये याचा विसर या पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. राज्यातील सुसंस्कृत राजकारणाला मोदी, शहा व फडणवीस यांनी कलंकित केले आहे. राज्याचे वाटोळे करण्याचा चंगच या त्रिकुटाने बांधला असून हे कृत नीच व महाराष्ट्राशी द्रोह करणारे आहे. मात्र अधिक जागा मिळविण्याच्या नादात मविआचे नेते याचा तसुभर ही विचार करताना दिसत नाहीत. मग हे पक्ष व नेते राज्याच्या हिताचा विचारच करीत नसतील तर, मविआला सत्ता तरी का द्यायाची ? हा प्रश्न राज्यातील जनतेसमोर उभा राहिला, तर त्यात वावगे काहीच नाही.
दुसरे महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपला किमान बहुमतापासून कोसो दूर ठेवणाऱ्या इंडिया आघाडीला मूठमाती देण्यात मविअच्या नेत्यांना यश आले आहे. जे काम निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय व अन्य तपास यंत्रणा सोबत असताना ही मोदी – शहाला जमले नाही. ते शरद पवार व मविआ नेत्यांनी करून दाखविलेले आहे. इंडिया आघाडीत असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांपैकी समाजवादी पार्टी, सीपीएम, सीपीआय व (सीपीआय एम.एल.) लिबरेशन या पक्षांचे अस्थित्व राज्यात आहे. मात्र मविआचे राजकारण करीत शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी या पक्षांना निवडणूक प्रक्रियेपासूनच दूर ठेवले आहे. अन हे कृत्य नकळत झालेली नाही, तर जाणीवपूर्वक केलेले आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी कसलाही सन्मान या मविआने या पक्षांना केलेला नव्हता. मात्र देश व संविधानावरील संकट टाळण्यासाठी या जनवादी पक्षांनी तो अपमान ही सहन केला. मात्र याची ही जाणीव शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांना नसेल, तर राज्य व देशातील जनतेच्या भावनाच त्यांना समजत नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील जनतेच्या समोर इंडिया आघाडीचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळेच काँग्रेस, शरद पवार व उबाठा सेनेला यश मिळविता आले. यावेळी ही राज्यातील प्रागतिक राष्ट्रीय पक्षांना मविआने नेत्यांनी पूर्णपणे डावळले. ही कृति इंडिया आघाडीला डावलण्याचीच आहे. तसेच राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येवू नये, याची रणनीती आखण्यापेक्षा मविआचे नेते जागा वाटपात रमले आहेत. जागा वाटपात यशस्वी होणे म्हणजे राज्यात सत्ता मिळविणे, हाच अविर्भाव या नेत्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून राहिला आहे. राज्यातील कुठल्याही समस्येकडे मविआचे लक्ष नाही, की सरकारच्या विरोधात कसले आंदोलन नाही. विरोधी पक्षाचे कर्तव्य ही मविआ नेते विसरले आहेत की, असे वाटू लागले असून तसेच वातावरण राज्यात निर्माण ही झाले आहे. उलट राज्याच्या तिजोरीची लूट करीत शिंदे – फडणवीस – पवार सरकार रेवड्या योजना जाहीर करीत असून निसटून जात असलेल्या विजयाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन इकडे मविआत ठणठण गोपाला आहे.
मागे वळून पाहताना…..
विद्यमान विधानसभेत काँग्रेस पक्षाचे 44, एकीकृत राष्ट्रवादीचे 54, एकीकृत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मात्र गेल्या 5 वर्षात या 3 ही पक्षांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत. काँग्रेसच्या 11 ते 13 आमदारांनी अनेक वेळा पक्षाशी गद्दारी करून भाजपला मदत केली. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला आपले आमदारच काय, पक्ष व चिन्ह ही संभाळता आलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्यासारखे लोकप्रिय नेतृत्व असताना कसलीही राजकीय औकात नसलेल्या एकनाथ शिंदे यांनी 43 आमदार अन चिन्हासह पक्ष आपल्या नावावर केला. तीच अवस्था जानता राजा शरद पवारांची झाली. अजित पवारांनी ही 41 आमदारासह पक्ष व चिन्ह आपल्या नावावर केले,अन हा राजा हात चोळीत बसला. अशी अवस्था असताना जागांवर अडून बसने कदापी शहाणपणाचे नव्हते व नाही. पण सत्तेचे भुकेले व मती हारवून बसलेल्या या पक्षांना व त्यांच्या नेत्यांना हे कोण सांगणार ? शहाणपण नावाची गोष्टच त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. हे जागा वाटपाचा तमाशा पाहिल्यानंतर स्पष्ट झाले.लोकसभा निवडणुकी अगोदर राहुल गांधींनी दोन भारत जोडो यात्रा काढून जनतेशी संवाद साधला, देश समजावून घेतला. पण त्यांना त्यांचा पक्षच समजून आला नाही. हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. अथवा ते ही सत्तेच्या राजकारणासाठी नाटकच करीत आहेत, असे ही समजावे लागेल.
राज्यात 1990 पासून शिवसेना – भाजपची अधिकृत युती राहिली असून 2014 पर्यंत शिवसेना कधीच 150 जागाच्या खाली निवडणूक लढली नाही. 25 वर्ष युतीच्या राजकारणात सेना मोठ्या भावाची भुमिका बजावत राहिली. पण 2014 मध्ये एक – दोन जागामुळे युती तुटली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना -भाजप वेगवेगळे लढले. यावेळी भाजपला 122 तर सेनेला केवळ 63 जागा मिळाल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी ही वेगवेगळेच लढले. या निवडणुकीत काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा आहे की, 288 जागा लढवून ही काँग्रेस व राष्ट्रवादी 50 चा आकडा ही पार करू शकलेली नाही. तर 2019 मध्ये भाजप व सेना युतीत भाजप व मित्र पक्ष 164, तर सेना 124 जागांवर निवडणूक लढली. अन भाजप 105, तर सेनेने 56 जागा जिंकल्या. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढले व अनुक्रमे 44 व 54 जागा जिकल्या. ही भाजपच्या तुलनेत अतिशय वाईट कामगिरी होती. आज ही तशीच काहीशी स्थिती असताना जागांचा हट्ट कशापायी सुरु आहे. हे कळत नाही.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव तर झालाच. पण त्या अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली. हा तर विधानसभेपेक्षा ही दारुण पराभव होता. हा सारा पराभव डोळ्या समोर ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते यावेळी जागा वाटपाच्या चर्चेला बसले असते, तर तोडगा केव्हाच निघाला असता. पण याचे भान ही या नेत्यांना नाही, हे त्यांच्या वागण्यावरून दिसत आहे. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव सेना 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी शरद पवार 10 जागांवर लढले. अन अनुक्रमे 9, 13 व 8 जागा जिंकल्या व काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या डोक्यात हवा शिरली. तिच हवा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अडचणीची ठरू लागली आहे. मात्र या जागा या पक्षांनी स्वकर्तृत्वावर जिंकलेल्या नाहीत.तर राज्यातील जनतेला मोदी व भाजप नको असल्याने त्या जनतेने भरभरून मतं दिली. त्यामुळे हे यश मिळाले आहे. त्या जनतेच्या भावनांचा विचार करून तरी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातील तिढा सोडविण्याचा प्रयत्न या पक्षांनी करायला हवा.नाहीतर ही जनता यांना ही धडा शिकवू शकते. हा केवळ इशारा नाही. या देशातील जनतेनेच निवडणुकीची सूत्र हाती घेतली आहेत. हे मविआने समजून घेतले पाहिजे.
मविआतील कुठल्या घटक पक्षांनी आपसातील सन्मान जपत जागा वाटून घ्याव्यात व डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांना सन्मानजनक जागा सोडव्यात, ही अपेक्षा संविधानवादी व पुरोगामी जनतेची आहे. मात्र काँगेस, राष्ट्रवादी आडमुठ्यासारखे वागत आहे. त्यांचे हे वागणे भाजपच्या पत्त्यावर पडू नये, या ही चिंतेत राज्यातील प्रागतिक पक्ष व पूरोगामी जनता आहे. मात्र या तीन ही पक्षांच्या नेत्यांना त्याची पर्वा नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उजडला असताना ही तोडगा निघत नाही, ही याच पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका असून त्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेच जबाबदार आहेत.
राज्यातील जागा वाटपाची सूत्र मविआमध्ये तरी काँग्रेसने आपल्या हाती घेतल्याचे आज स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे याबाबतचे सारे निर्णय नेहमीप्रमाणे दिल्लीतच होणार आहेत. राज्यातील नेतृत्वाला काँग्रेसमध्ये तसा काही अधिकार नसतो. यावेळी ही नसल्याने काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत जावून बसले होते. पर्यायाने इथली चर्चाच त्यामुळे ठप्प झाली होती व आहे.याचा परिणाम असा झाला की,उलट सुलट वावड्या उडत राहिल्या. त्या योग्य नाहीत. तर या सर्व गदारोळात शिवसेना उबाठामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी उबाठाला संपवायला निघाली आहे, असा एक संदेश या पक्षाच्या तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला असून निवडणुकीच्या तोंडावरचा हा संदेश मविआसाठी योग्य नाही. नेमका हाच प्रचार करीत गद्दार शिंदे उबाठाला व उद्धव ठाकरेंना बदनाम करीत आहे. भाजप ही असाच प्रचार करीत आपल्या नीच कृत्यांवर पांघरून घालत आहे. याची नोंद खरे तर मविआने घ्यायला हवी. ती राजकीय दृष्ट्या महत्वाची ही आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब गंभीर आहे. पण कुणालाच काही पडले नाही. सर्वांना जागा हव्या आहेत.जिंकण्यासाठी की, हारण्यासाठी याचे ही गणित काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत कसलेही आडेवेढे न घेता शिवसेना उबाठाने रामटेक व अमरावती या आपल्याकडील दोन स्टाडींग जागा काँग्रेससाठी सोडल्या. ही उदरता यावेळी काँग्रेस का दाखवत नाही, हेच समजत नाही. विदर्भातील एक ही जागा मित्र पक्षांना सोडणार नाही, अशी ताठर भुमिका काँग्रेसने घेतली होती, ती आता मवाळ झाली असली तरी पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
………………………… ………………..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares