• 269
  • 1 minute read

ठाण्यातील द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विरोधात कारवाई करा – समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाण्यातील द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विरोधात कारवाई करा – समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

ठाणे : ठाणे येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांचे फोटोसह ‘बटोगे तो कटोगे’ असे द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, एका तक्रार अर्जातून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, राहुल गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
    द्वेषपूर्ण पोस्टर हटवून ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी या पत्रातून केली आहे. अशा प्रकारची पोस्टरबाजी निवडणूक काळातील आचारसंहिता असताना करण्यास बंदी आहे. सामाजिक तणाव निर्माण करण्यास अशा आशयाचे पोस्टर निमित्त होवू शकते. आचारसंहितेच्या काळात बंदी असतानाही, अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे ते पोस्टर तात्काळ हटवून पोस्टर लावणारे विश्वबंधु राय यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने ताबडतोब कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच शांततेची परिस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला लिहीलेल्या तक्रार पत्रातून केली आहे.

.

0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *