• 29
  • 1 minute read

विश्वविख्यात क्रांतिकारक तत्त्ववेत्ता ओशो रजनीश

विश्वविख्यात क्रांतिकारक तत्त्ववेत्ता ओशो रजनीश

विश्वविख्यात क्रांतिकारक तत्त्ववेत्ता ओशो रजनीश

       ओशो तथा रजनीश यांचा जन्म ११ डिसेंबर १९३१ साली मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा या गावी झाला. त्यांचे जन्म नाव चंद्रमोहन जैन असे होते. ते बालपणापासूनच अत्यंत खोडकर होते. त्यांच्या आईचे नाव सरस्वती तर वडिलांचे नाव बाबूलाल असे होते. बालपणापासूनच ते चिंतनशील होते. शालेय जीवनामध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. पुढे त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण सुवर्णपदकासह पूर्ण केले. चिकित्सा, तर्क, युक्तिवाद यामध्ये ते महाविद्यालयीन जीवनापासूनच तरबेज होते. पुढे त्यांनी प्राध्यापक म्हणून सुमारे नऊ वर्षे जबलपूर विद्यापीठात काम केले, परंतु केवळ नोकरी करून आपल्याला जगभरामध्ये आपले विचार नेता येणार नाहीत, यासाठी त्यांनी राजीनामा दिला आणि आपल्या विचाराच्या प्रचारासाठी ते बाहेर पडले. मुंबई, पुणे आणि देशभर त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली. एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. लोकांना बरे वाटावे, राज्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून ते कधीही बोलले नाहीत, तर जे वास्तव आहे आणि जे जनहिताचे आहे ते त्यांनी निर्धास्थपणे मांडले. जगातील सर्व धर्मांचा आणि त्यांच्या धर्मग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता. भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यावरती त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. त्यांच्या विचाराचा परिप्रेक्ष वैश्विक होता.

ओशो तथा रजनीश यांनी कर्मकांड, धर्मांधता, अंधश्रद्धा, बुवाबाजी यावरती कडून हल्ला केला. त्यांच्या युक्तिवादापुढे धर्ममार्तंड घायाळ झाले. वास्तव मांडणी करताना त्यांनी कोणाचा मुलाहिजा बाळगला नाही. जगातील धार्मिक क्षेत्रातील शोषणव्यवस्था त्यांनी चव्हाट्यावर आणली. धर्माच्या नावाखाली केली जाणारी पिळवणूक यावर त्यांनी सडेतोड भाष्य केले. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी केला. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती कमालीचे प्रभुत्व होते. त्यांची वाणी अत्यंत रसाळ आणि प्रभावी होती. तर्कशास्त्र, ध्यान(meditation) आणि तत्त्वज्ञान या माध्यमातून त्यांनी अनेक दिग्गजांना नैराश्यातून बाहेर काढले. जीवनाचा खरा मार्ग त्यांनी दाखवला. त्यामुळे जगातील सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज त्यांच्याकडे आकर्षित झाले, त्यामध्ये नेते, अभिनेते, विचारवंत, कलाकार आणि उद्योजक इत्यादींचा समावेश आहे.

ओशोंनी प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील दोष सांगून शिक्षण कसे असावे, याबद्दल विवेचन केले. लैंगिकतेबद्दल असणारे गैरसमज यावर त्यांनी विस्तृतपणे भाष्य केले. त्यांचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक होता, परंतु त्याचे आकलन समाजाला न झाल्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले. त्यांचा शिष्यवर्ग जगभरातील होता. त्यांनी जैन, बौद्ध,शीख, हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, पारसी, यहुदी, शीख इत्यादी धर्माच्या तत्त्वज्ञानावर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले. त्यांना जसे अनुयायी मिळाले तसेच विरोधकदेखील मिळाले, पण ते डगमगले नाहीत. आपली मांडणी करताना ते कोणाच्या दबावाखाली राहिले नाहीत. अगदी अमेरिकेलादेखील त्यांनी जुमानले नाही. आपल्या अनुयायांच्या आग्रहास्तव त्यांनी अमेरिकेतील कोरेगाव प्रांतात आपला आश्रम स्थापन केला. अमेरिकन सरकारला ते आवडले नाही. शेवटी त्यांना अमेरिका सोडावी लागली. जगातील २१ देशात त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली. शेवटी भारतातील पुणे या ठिकाणच्या कोरेगाव पार्क या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीचा आश्रम स्थापन केला. पुणे येथील आश्रमामध्ये जगभरातील अनुयायी आले. त्यांना त्यांनी नियमितपणे मार्गदर्शन केले. तत्त्वज्ञानाच्या बळावर विवेकानंदानंतर जग जिंकणारा आधुनिक काळातील क्रांतिकारक तत्त्ववेता म्हणजे आचार्य ओशो रजनीश आहेत. त्यांचे मूळ नाव चंद्रमोहन जैन, त्यांना ओशो म्हणजे सागरात विलीन होणारा आणि शेवटी रजनीश या नावाने ओळखले जाते. त्यांचे गाजलेले अनेक ग्रंथ आणि प्रवचने आहेत.

आचार्य रजनीश हे अमेरिकेत असताना त्यांना अमेरिकन प्रशासनाने अन्नातून थेलीयम दिले, असा आरोप केला जातो, त्यामुळे त्यांचे शरीर अकालीच थकले, त्यामुळे वयाच्या केवळ ५९ व्या वर्षी त्यांचे म्हणजे १९ जानेवारी १९९० रोजी निधन झाले. परंतु त्यांच्या जन्ममृत्यूबद्दल असे म्हटले जाते की “ओशो कधीही जन्मले नाहीत, ते कधीही मृत्यू पावले नाहीत, फक्त त्यांनी ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या दरम्यान या भूतलावरती (पृथ्वी) भेट दिली” एक क्रांतिकारक तत्ववेता म्हणून ते अजरामर आहेत, विचार करायला लावणारी विचारवंत म्हणून ते अजरामर आहेत, धर्मांध न होता डोळस असले पाहिजे, असा संदेश देणारे ते बंडखोर तत्ववेत्ता म्हणून ते अजरामर आहेत. प्रवाहपतीत न होता प्रवाहाविरुद्ध लढणारा लढवय्या तत्त्ववेता म्हणून त्यांची ख्याती आहे, पगार घेऊन शेवटपर्यंत नोकरी न करता नोकरीचा राजीनामा देऊन जगामध्ये आपला ठसा उमटवणारा विश्वविख्यात तत्ववेत्ता म्हणून त्यांची ख्याती आहे.

-डॉ. श्रीमंत कोकाटे

0Shares

Related post

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म. फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा…
महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न पुणे : भारतरत्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *