• 53
  • 1 minute read

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू.....!

         देश गंभीर संकटात असतो, त्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक तर विदेश दौऱ्यावर असतात, अथवा जाण्याच्या तयारीत असतात. देशात राम मंदिर लूटमारीच्या चर्चा गंभीरपणे होत असताना ही मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. या शिवाय चीन सैन्य भारतीय सरहद्दीत घुसले असून त्यांनी अरुणाचल व लडाखमध्ये आपले तळ ठोकले आहेत. चिनी सैनिक येथील भारतीय सैनिकांना हाकलून लावत आहेत. भारतीय सैन्य नाहीतर स्थानिक जनता या चिनी सैन्याचा मुकाबला करीत आहे. हे दृश्य हा देश पहिल्यांदाच पाहत आहे. या संदर्भातील जी दृश्ये आणि माहिती समोर येत आहे, ती अतिशय गंभीर व चिंताजनक आहे. अशा स्थितीत ही मोदींचा विदेश दौरा व्यवस्थित सुरू आहे. देशातील स्थितीचे कसलेही सावट त्यांच्या दौऱ्यावर नाही. या स्थितीचे साधे भान ही त्यांना नाही. यावर ते काहीच बोलत नाहीत. यावरून स्पष्ट होते की, मोदीला देशाचे काहीही पडलेले नाही. त्यांना स्वतःचे पडलेले आहे. मंदिरातील दान चोरी व चिनी सैन्याची घुसखोरी ही अचानक उद्भवलेली प्रकरणे नाहीत. पण स्थितीची कसलीही गंभीरता न पाळता ते विदेशात गेले. ही सामान्य घटना नाही. हा दौरा ही केवळ एक योगायोग नाही. तर तो एक डॅमेज कंट्रोलचा प्रकार आहे. ढासळत चाललेल्या प्रतिमेची डागडुजी करण्यासाठी ते विदेशी दौऱ्यावर जावून त्या देशाच्या नागरी सन्मानाने स्वतःला सावरून घेतात. इंडोनेशिया दौऱ्यात धोरणात्मक निर्णय काय घेतले गेले, यावर गोदी मिडियात चर्चा नाही. चर्चा केवळ मोदींना मिळालेल्या नागरी सन्मानावरच सुरू आहे. हाच मोदींच्या ढासळत्या प्रतिमेला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. गोदी मिडियात हीच चर्चा सुरू आहे. 
         बारा वर्षांत १०० च्या आसपास विदेश दौरे मोदींने केले आहेत. जगातील एका ही राष्ट्राचा प्रमुख अथवा प्रधानमंत्री मोदींच्या आसपास नाही. ट्रम्प आणि पुतिन यांच्या नावावर केवळ पाच ते सहा विदेश दौरे आहेत. पण मोदींनी शंभरी ओलांडली आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यांची एक खासियत आहे की, ते ज्या देशात जातात, त्या देशातून बाकी काही आणले नाही तरी स्वतःसाठी एक नागरी सन्मान घेऊन येतात. गेल्या बारा वर्षांत त्यांनी ३५ देशांकडून नागरी पुरस्कार भारतीय तिजोरीवर तान देऊन मिळविले आहेत. यामध्ये सेशेल्स देशाच्या नागरी पुरस्काराचा ही समावेश आहे. हवामान बदल आणि पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा सेशेल्स देशाचा नागरी सन्मान मोदींना मिळाला असून त्यासाठी मोदींनी भारतीय तिजोरीवर डाका टाकून काही ॲम्ब्युलन्स या देशाला या पुरस्काराच्या बदल्यात दान केल्या आहेत. नुकताच इंडोनेशिया सरकारने ही अशाच नागरी पुरस्कार मोदींना दिला असून त्या बदल्यात मोदीने इंडोनेशिया सरकारला भारतीय जनतेचा पैसा लुटून काय दिले आहे ? हा प्रश्न आहे.
        जगभरातील सर्वच राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष अथवा प्रधानमंत्री विदेश दौरे करतात. देशाच्या व्यापार, उद्योगात वाढ करणे, त्यासाठी आपल्याकडील तंत्रज्ञान जगभराला देणे व त्यांच्याकडील आधुनिक तंत्रज्ञान घेणे, हा या दौऱ्याचा उद्देश असतो. विदेशी गुंतवणूक आणून देशात उद्योगाचे जाळे उभे करणे, त्यातून देशातील तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून देणे हा ही उद्देश असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान सन्मान उंचाविण्याचा आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आदी देश हिताच्या उद्देशाने हे दौरे राष्ट्राचे प्रमुख करीत असतात. मोदींच्या अगोदरच्या प्रधानमंत्र्यांनी याच हेतूने विदेश दौरे केले असून त्यांच्या दौऱ्यामुळे विकासात्मक काही गोष्टी घडल्याचे ठळकपणे दिसत आहे. मात्र मोदींने अय्याशीसाठी दौरे केले आहेत. हे लपून राहिलेले नाही. कुविख्यात एपस्टीन फाईलमध्ये जगभरातील कुविख्यात अय्याश राष्ट्र प्रमुखांची नावे असून त्यात मोदीचे ही नाव आहे. ही फाईल मोदींच्या विदेश दौऱ्याची आणि अय्याशीची पोलखोल करीत आहे.
 
         गांधी , नेहरू पाठ सोडत नाहीत, हे शल्य विदेशी पुरस्कारापेक्षा मोठे….!
 
        एखाद्या राष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यात हस्तक्षेप हा विदेशी धोरणाचा भाग असू शकतो. त्यात तसे गैर काहीच नाही. श्रीमती इंदिरा गांधी यांनी असाच हस्तक्षेप करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले आहेत. मात्र कुठल्या ही देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी कुणाचा प्रचार केलेला नाही. मोदींनी अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत खुलेआम ट्रम्पच्या प्रचार केला. यात ट्रम्पचा पराभव झाला, हा वेगळा मुद्दा असू शकतो. पण हे विदेशी धोरणात न बसणारी बाब आहे. मात्र देशातील गोदी, दलाल मिडियाला याचेच भारी कौतुक आहे. मोदींच्या छछोरीगिरीला २४ तास पब्लिसिटी दिली जाते. हे इटलीची प्रधानमंत्री मेलोनी प्रकरणात दिसले आहे. मोदीचे विदेशी दौरे म्हणजे अय्याशी आणि गोदी मिडियाची चांदी. प्रत्येक दौऱ्याच्या वेळी भलेमोठे पॅकेज गोदी मिडियाला मिळते. यामध्ये देशाची इज्जत जात असली तरी मोदी आणि गोदी मिडियाची चंगल होतेय.
            मोदींच्या विदेश दौऱ्यानंतर उभय देशात झालेल्या धोरणात्मक कराराबाबत, व्यापार व उद्योगाबाबत गेल्या बारा वर्षांत कधीच चर्चा देशात झालेली नाही की होत नाही. चर्चा होते ती केवळ मोदींच्या छछोरीगिरीची. त्याशिवाय ज्या देशात मोदी जातात त्या देशातील एखादा नागरी सन्मान मोदींना नक्कीच भेटतो. खरे तर भेटतो म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. तर तो नियोजनबध्द पद्धतीने मिळविला जातो. अथवा काही मोबदला घेऊन खरेदी केला जातो. सेशेल्स देशाचा नागरी सन्मान मोदींना मिळाला असून त्यासाठी सहा अँब्युलन्स दिल्या गेल्या आहेत. जगभरातील २५ देशाचे ३५ पुरस्कार मोदींना मिळाले असून ते ही याच पद्धतीने मिळवले असावेत, अशी शंका त्यामुळेच येते.
            जगभरातील २५ देशांनी मोदींना दिलेल्या पुरस्कार आणि मान सन्मानानंतर गोदी मिडियाने करोडो रुपयांचे पॅकेज मोदींकडूनच मिळवून मोदींची नेहरू, इंदिरा गांधी यांच्याशी तुलना करायला सुरुवात केली आहे. या अगोदर झालेल्या प्रधानमंत्र्यांपेक्षा अधिक पुरस्कार मोदींना मिळाले आहेत, म्हणून ते ग्रेट आहेत, असे भारतीय जनतेच्या मनावर बिंबवले जात आहे. मात्र नेहरूंनी केलेल्या कार्याशी तुलना हे करताना जाणीवपूर्वक टाळली जात आहे. इंडोनेशियामध्ये जो पुरस्कार मोदींना देण्यात आला, त्यावेळी त्या देशाच्या प्रमुखाने जे भाषण केले त्यात त्यांनी नेहरूंचा उल्लेख केला. भारत आणि इंडोनेशिया यांचे आज मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते केवळ पंडित नेहरू यांच्या विदेशी धोरणामुळेच आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मोदीची अवस्था केविलवाणी झाली होती. जगात कुठे ही गेले तरी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू पाठ सोडत नाहीत, याचे शल्य या पुरस्कार व मान सन्मानापेक्षा मोठे आहे. हे मोदींच्या आणि त्यांच्या अंधभक्तांच्या लक्षात आले असेलच. हे समजायला हरकत नाही. 
…………………………………………………………….
 
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी 
मुबई, महाराष्ट्र
0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *