- 15
- 1 minute read
संघ भाजपची सत्ता आणि ब्राह्मणी वर्ण वर्चस्वाकडे वाटचाल!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 41
संघ भाजपची सत्ता आणि ब्राह्मणी वर्ण वर्चस्वाकडे वाटचाल!
फॅसिस्ट संघटना वा त्या विचारांना मानणारे राजकीय पक्ष यांची भूमिका ही हुकूमशाहीवादी आणि राष्ट्रवाद सांगणारी असते. त्यात जात आणि वंशवाद यांना महत्त्व दिल्या जाते. त्याला ते राष्ट्र म्हणतात. उदा. रा.स्व.संघ ही फॅसिस्ट संघटना आहे ही बाब आता सर्व मान्य आहे. संघाचे हिंदू राष्ट्र हे फॅसिस्ट विचारांवर आधारित आहे. संघ मिलिटंट सैनिक संघटन आहे आणि तो सतत सामाजिक उतरंड कायम राहावी म्हणून आक्रमक असतो. त्याचप्रमाणे तो ज्या लोकांना किवा धर्माना विरोध करतो त्या विरुद्ध ही आक्रमक असते. उदाहरणार्थ संघ हा नेहमी सर्वाधिक मुस्लिमांविरुद्ध आक्रमक भूमिका घेताना दिसतो. मुस्लिम हे हिंदू राष्ट्राचे शत्रू आहेत अशा प्रकारची भूमिका हेडगेवारपासून गोळवलकर आणि आज मोहन भागवत पर्यंत घेतलेली आहे किंवा घेत आहेत. दुसरे म्हणजे ते इथल्या लोकांना देखील वर्ण व जातीय विषमतेत विभागून ठेवणे आणि तशा प्रकारची वागणूक किंवा व्यवहार समाजामध्ये राहील त्यासाठी सुद्धा आक्रमक भूमिका घेतो आणि या उलट लोकशाहीची भूमिका आहे. लोकशाही हे लोकांसाठी लोकांद्वारे निर्माण होणारी राजकीय व्यवस्था असते.
परंतु संघ फॅसिस्ट नाझी विचाराचा आहे.
आणि ही बाब संघाचे वैचारिक मार्गदर्शक मा.स.गोळवलकरांच्या लिखाणातून स्पष्ट होते. आणि ते विचार त्यांनी लिहिलेल्या ‘वै ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड व बंच आॅफ थाट्स’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून दिसून येते. त्यांनी कधीही लोकशाहीचा पुरस्कार केला नाही. त्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला आणि त्यालाच त्यांनी हिंदू राष्ट्राचे रूप म्हटले आहे.
संघाचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न
*मनुचा मासा* *रा स्व संघ* या नावाचे पुस्तक अमरावती येथील प्रा. कु.ल.महाले यांनी १९८४ मध्ये लिहिले आहे. त्यात त्यांनी संघाने १९४७ साली दिल्लीची सत्ता काबीज करण्या साठी आखणी केल्याचे लिहिले आहे. अर्थात, संघ गैर राजकीय मार्गाने सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न करत होता म्हणजे त्याला लोकशाही मार्ग महत्वाचा नाही. सत्ता काबीज करण्यासाठी तो काहीही करु शकतो. हे पुस्तक मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोकवांग्मय प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.
धीरेंद्र झा या दिल्लीतील प्रसिद्ध पत्रकार, लेखकाने संघांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यातील इंग्रजी भाषेतील ‘गोळवलकर: दी मीथ बिहाइंड दी मॅन, दी मॅन बिहाइंड दी मशीन’ या पुस्तकात ही बाब आहे.
आणि म्हणून आज जी सत्ता या देशावर आहे त्यांना आपण मोदीची सत्ता म्हणतो किंवा मोदीच्या नेतृत्वाखाली देशाचे राजकारण चालते असे म्हणतो. ते मोदी संघाचे प्रॉडक्ट आहेत. संघातून निर्माण झालेले व्यक्तिमत्त्व आहे आणि संघ जर फॅसिस्ट असेल तर मोदी शहा फॅसिस्ट सत्ताधारी ठरतात. जी सत्ता लोकांच्या इच्छेनुसार चालते, लोकांच्या भल्याचा विचार करते, लोकांचा सत्तेवर दबाव असतो ती लोकशाही असते. परंतु आज सत्तेवर दडपण संघाचे आहे. आणि या दडपणाखाली लोकांच्या विचारांना, लोकांच्या गरजांना महत्त्व देण्यात येत नाही. जातीय उच्च नीचता किंवा चातुर्वर्ण्य हे लोकशाहीमध्ये बसत नाही. कारण जिथे समाजात बंधुता नाही, समता नाही, जिथे लोकांच्या इच्छेला महत्त्व नाही, लोकांच्या गरजांना महत्व नाही लोकांच्या गरजा आम्ही म्हणून तशा प्रकारे सोडवू म्हणजे एक प्रकारची हुकूमशाही अशा पद्धतीची ही नीती संघाची आणि भाजपची आहे. त्याप्रमाणे आज आपल्या देशाची सत्ता चालू आहे. म्हणजे इथे लोकशाही आहे म्हणणे भ्रम आहे.
लोक भावना आणि सत्ता
स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे ती त्यांच्या भल्याची आहे, शोशण विरहित आर्थिक रचनेची आहे, सामाजिक समतेची आहे, सामाजिक न्यायाची आहे. हे सर्व आजच्या संविधानामध्ये आहे. परंतु प्रत्यक्षात अजूनही ती स्थिती आलेली नाही. अजूनही त्यांच्या आकांक्षाची पूर्ती झालेली नाही. या उलट सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये, समतेच्या विरोधामध्ये आणि बंधुभावाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण केले जात आहे. धार्मिक उन्माद वाढत आहे आणि काही धर्मियांना शत्रू ठरवले जात आहे. दुय्यम नागरिक करण्याकडे वाटचाल आहे.
ज्यांना सामाजिक रचनेत निम्न स्थान आहे ते कायम कसे राहील यासाठी ही सत्ता कार्यरत आहे.
लोकांसाठी जिथे शासन नाही एका पक्षासाठी आहे आणि तो पक्ष एका जातीचा आहे एका जातीच्या भल्यासाठी, त्या जातीच्या वर्चस्वासाठी निर्माण झालेला पक्ष आहे त्याची सत्ता ही लोकसत्ता म्हणता येत नाही ती लोकशाही म्हणता येत नाही आणि म्हणून या देशांमध्ये आज जे चालू आहे ते फॅसिस्ट राजकारण नी राजनीती आहे आणि म्हणून आज देशातील जनता ही विषमतेत उच्चनीचतेत भरडल्या जात आहे आणि म्हणून खरी लोकशाही निर्माण करण्याची गरज आहे. फॅसीझमला लोकशाही म्हणा हा जो प्रकार लादण्यात येतो आहे त्याचा विरोध करण्याची गरज आहे आणि नसण्याचे मूळ या देशांमध्ये जात व्यवस्था आहे. के.एम. पणिक्कर नावाच्या विचारवंतांनी आणी एकवेळ भारतीय शासनात मोठ्या पदावर असलेल्या अधिकारी यांनी 1936 साली ‘कास्ट अॅंड डेमाॅक्रसी’ नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जोपर्यंत जात व्यवस्था आहे तोपर्यंत या देशांमध्ये लोकशाही अवतरू शकत नाही, लोकशाही निर्माण होऊ शकत नाही.
आपण लोक जर निवडणुका होतात म्हणून लोकशाही असं म्हणत असू तर आपण एक प्रकारचा भ्रम पाळत आहोत. स्वतःलाच भ्रमात ठेवत आहोत. एक जातीय सत्तेला लोकशाही म्हणत आहोत. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे हे समजून घेण्याची गरज आहे. या हुकूमशाहीला फसून बहुजनातले जे लोक त्या पक्षात जातात म्हणजे मनुवादी फॅसिस्ट सत्तेला मदत करतात.
डॉ आंबेडकरांनी जे संविधान साकारले त्याला विरोध करतात असं म्हणता येईल.
*मनुस्मृती संविधान?*
मनुस्मृती ज्या संघटनेचे संविधान आहे आणि आजच्या संविधानाला ज्या कारणावरून त्या संघटनेचा विरोध होता की या संविधानामध्ये मनुस्मृती मधलं काही नाही आणि म्हणून हे संविधान आम्हाला मान्य नाही. त्या विचारांचा राजकीय पक्ष जर सत्तेत असेल तर त्या पक्षाला आजचे संविधान मान्य असू शकते का? कारण आरएसएसची भूमिका आहे तीच भूमिका भाजपची आहे, तीच भूमिका मोदी किंवा शहांची आहे आणि म्हणून आजच्या सत्तेला लोकशाही म्हणणे आभास आहे. कारण जी विचारसरणी समतेच्या विरोधी आहे, बंधुतेच्या विरोधी आहे, जात वर्णव्यवस्थावादी आहे ती संघटना किंवा तो पक्ष लोकशाहीवादी राहू शकतो का? त्यामुळे आजच्या सत्तेला लोकशाही म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. ज्या प्रकारे लोकशाहीबद्दल संघाचे गुरु मा.स. गोळवलकर यांनी मांडणी केली आहे की या देशाला लोकशाहीची गरज नाही. आजची लोकशाही आमच्या प्राचीन व्यवस्थे प्रमाणे नाही. म्हणून आमची लोकशाही बद्दलची भूमिका आजच्या संविधाना प्रमाणे नाही.
चातुर्वर्ण्य हा त्यांचा धर्म आहे आणि ही बाब मनुस्मृतीच्या (१२-१) प्रकरणात स्पष्टपणे म्हटले आहे की चातुर्वर्ण्य हा धर्म होय.
आणि ब्रह्माच्या शरीरातून चातुर्वर्ण्याची उत्पत्ती झाली आहे अशा प्रकारच्या विकृत विचारसरणीला मान्य करणारी राज्यसत्ता किंवा सत्ता या देशात जारी असेल तर लोकशाही सत्ता असू शकते का?
तथाकथित स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणतात की ज्या देशात चातुर्वर्ण्य नाही तो म्लेंच्छ देश होय आणि त्यांनी हेही म्हटले की पेशवाई ही हिंदू राष्ट्राचे रूप होते. _(पहा- सावरकर समग्र वांग्मय व व माझे पुस्तक ‘RSS मुक्त भारत का व कशासाठी?’ )_
या देशांमधील बहुतांश लोक उच्चनीचतेच्या मानसिकतेत जगत आहेत. त्या जातव्यवस्थेने मानवता नाकारली आहे, माणूसपण नाकारलं आहे. इथे जनावरा़चे मूत्र पवित्र ठरते पण मानवाचा स्पर्श चालत नाही. अशी विकृत भूमिका घेऊन जगणारे, वागणारे लोक इथे उच्च आणि पवित्र ठरत असतील आणि ते सत्ताधारी असतील तर तिथे खरी मानवता आहे , लोकशाही आहे असे मान्य करणे फसवणूक आहे.
सत्तेची जी भूमिका म फुले, पेरीयर रामस्वामी, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज यांनी मांडली आहे ती आणि आजची स्थिती यात काही संबंध आहे का?
यावरून समतावादी व्यवस्थेला त्यांचा विरोध आहे तसाच लोकशाही विचारांना आहे.
जात वर्ण भेद असलेल्या देशांमध्ये लोकशाही असू शकत नाही. अशा भूमिकेत असलेले लोक सत्तेत आहेत आणि म्हणून
आज आपण लोकशाहीत जगत आहोत असं मानत असू तर आपण भ्रमात आहोत. आपण गुलामीत राहत असून स्वतंत्र असल्याच्या बाता मारत आहोत. या देशांमध्ये ना बहुजनांना सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य आहे ना इथे लोकशाही आहे. इथे जात उतरंडी प्रमाणे व्यवहार जारी आहेत. त्यामुळे अस्पृश्यता, क्रूरता, अन्याय, भेदभाव जारी आहे तो एक प्रकारचा जात फॅसिझम आहे. म्हणून लोकांनी या लोकशाही कशी निर्माण होईल या देशांमधली जाती व्यवस्था कशी नष्ट होईल यावर विचार करायला पाहिजे. कृती करायला पाहिजे.
आज जे काही होत आहे ते मनुस्मृतीप्रमाणे कसं होईल याकडे या सत्तेची वाटचाल आहे. ही मनुवादी फॅसिझमची वाटचाल आहे.
0Shares