• 89
  • 1 minute read

संघ व भाजपच्या समाजकंटक गुंडांचा जेएनयुमध्ये दारूण पराभव…!

संघ व भाजपच्या समाजकंटक गुंडांचा जेएनयुमध्ये दारूण पराभव…!

जेएनयुचा मुड हाच देशाचा मुड…. !

फॅसिस्ट, फाशीवादी अन् देशद्रोही शक्तींकडून देश व संविधान तोडण्याचा, बदलण्याचा कुठलाच डाव या देशातील युवक यशस्वी होऊ देणार नाहीत, असा विश्वास या देशातील १४० करोड जनतेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ( जे एन यु) विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत भाजपच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारूण पराभव करून डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या, समाजवादी व आंबेडकरवादी विचारांच्या विद्यार्थी संघटनांचा हा विजय २०२४ च्या लोकसभा निकालाची झलक ठरली तर त्यात काही वावगे वाटायला नको. कारण हा देशाचा मुड आहे.
जेएनयुमधील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. भाजप तर या निवडणुकीकडे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहत होती. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव अन् संयुक्तं सचिव या चार ही प्रमुख पदावर एबीवीपीचा डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी दारूण पराभव केला. जे एन यु वर भगवा फडकविण्याचे संघ व भाजपचे स्वप्न आहे. पण नफरतीचे राजकरण करणाऱ्यांना येथे पाय ठेवायला जागा नाही, हे वेळोवेळी जेएनयुमधील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
संघ व भाजपसारख्या फॅसिस्ट व फाशीवादी शक्तीला जेएनयुमध्ये पाय रोवता येत नसल्याने ते जगभरात नाव लौकिक असलेल्या या विद्यापीठाला बदनाम करीत आहेत. अन् याकामी ते अंध भक्तांची फौज असलेल्या ए बीवीपी च्या गुंडांचा वापर करीत आलेले आहेत. यावेळी झाला. पण डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनांच्या कुशल व अभ्यासू नेतृत्वाने या सर्वांवर मात करीत विजय मिळविला.
या देशाला हिंदुराष्ट्र बनविण्यास केवळ अन् केवळ संविधानच अडथळा ठरत असल्याने 2024 च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर संविधान बदलले जाईल अन् सेक्युलर असलेला हा देश हिंदुराष्ट्र घोषित होईल. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखणे हे प्रत्येक भारतीयांचे आज प्रथम लक्ष असले पाहिजे. संघ, भाजप व मेंदूची नसबंदी झालेल्या त्यांच्या अंधभक्त विद्यार्थी संघटनेचा सहज पराभव होऊ शकतो. हा धडा जेएनयुने दिला आहे. भाजप विरोधातील इंडिया आघाडीने या विद्यार्थी संघटनांनी अहंकार बाजुला ठेवून निवडणूक जिंकण्यासाठी जे नियोजन केले. ते इंडिया आघाडीच्या नेत्यांना मार्गदर्शक ठरू शकते. प्रश्न हा आहे की, इंडिया आघाडीचे नेते जेएनयुमधील या घटनेला किती महत्त्व देतात ?
बाकी हाच विजय एबीवीने मिळविला असता तर विजयी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे देशभर सत्कार सोहळे आयोजित करण्यात आले असते. पण पदरात पराभव पडला असून तो जिव्हारी लागला आहे. याचा पुरेपूर फायदा उठवित देशातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ” जेएनयुचा मुड हाच देशाचा मुड ” असा ही एक नारा देत लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले पाहिजे.

जयभीम, लाल सलाम, जय समाजवाद, जय संविधान !!

-राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…
वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

“राजकारण हा काही आट्यापाट्याचा खेळ नाही. तो आमच्यासाठी संग्राम आहे, तो आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *