• 61
  • 1 minute read

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी!!

राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.
 
या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातील श्वेतक्रांती पाहिली, पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पहिली. आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही पहिली. शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधील की नसणाऱ्या या कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खातं देण्यात यावं.  
 
वंचित बहुजन आघाडीचे ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी, त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल यासाठी तातडीने त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे.
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *