सरकारला हव्या तशा शिफारशी करण्यात हातखंडा असल्यानेच नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना…!

सरकारला हव्या तशा शिफारशी करण्यात हातखंडा असल्यानेच नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना…!

..... तरी, आंबेडकरी समाजाला भ्रमित करण्यात यश येणार नाही!

       हिंदीची सक्ती प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तात्पुरती माघार घेतल्याने मराठी माणसांची लढाई अधूरी आहे. विजयोत्सव साजरा करणे मराठी माणसांचे खचलेले मनोबल उचविण्यासाठी योग्यच आहे. पण राज्यातील पेशवाई सरकार व सरकारचे प्रमुख अनाजी पंत ही काही कमी नाहीत. त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी एक समिती स्थापन केली असून ही समिती सरकारला हव्या तशाच शिफारशी करणार यात तिळमात्र शंका नाही. नरेंद्र जाधव याबाबतीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याच जातकुळीचे आहेत. बाकी या समितीचे अध्यक्षपद नरेंद्र जाधव यांना देवून आंबेडकरी समाज विरुद्ध उर्वरित जनता असे चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ही सदावर्तेला फडणवीस यांनीच उभे केले आहे. आंबेडकरी समाज विरुद्ध उर्वरित महाराष्ट्रातील जनता असे वातावरण निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. पण तो ना सदावर्तेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकला, ना आता नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून पूर्ण होईल.
       एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभे करण्याचे नीच व घाणेरडे राजकारण करण्याचा उद्योग फडणवीस यांनी बंद करावा. मराठा आरक्षणाच्या वेळी मराठा व ओबीसी समाजात असाच संघर्ष उभा करून ओबीसींना पुन्हा सोबत आणण्यात भाजपला यश आले आहे. मात्र इथे गाठ आंबेडकरी समाजाशी आहे. किती ही सदावर्ते व नरेंद्र जाधव उभे केले, तरी आंबेडकरी समाजाला भ्रमित करण्यात यश येणार नाही, हे सरकारमधील अनाजी पंतांनी समजून घ्यावे. आंबेडकरी समाज सुज्ञ आहे. सत्तेची लालच असलेले काही गद्दार संघ व भाजपशी जवळीक साधून वळचणीला जात असतील ही पण आंबेडकरी समाज हा स्वाभिमानी आहे. हे लक्षात घ्या. संघ, भाजपमध्ये अनेक रिकामटेकडे लोक असताना नरेंद्र जाधव यांच्याच गळ्यात घंटा बांधण्याचा डाव आंबेडकरी जनता ओळखून आहे. 
          राज्यात मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार हे घटनाबाह्य सरकार होते. ते कसे घटनाबाह्य होते व कसे स्थापन झाले, हे सर्वांना माहित आहे. विद्यमान सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले असून ७६ लाख मतांची चोरी करून हे सरकार स्थापन झाले आहे. याचा अर्थ ही दोन्ही सरकारे संविधान व लोकशाही विरोधी आहेत. त्यावर कडी करीत आमचे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे जाहीरपणे सरकारचे म्होरके बोलत आहेत. त्यामुळे जे जे संविधान, लोकशाही विरोधी व हिंदुत्ववादी आहेत, त्या सर्वांच्या विरोधात आंबेडकरी समाजाने उभे राहिले पाहिजे. यामध्ये राजकीय पक्ष व त्या पक्षाचे नेते, विचारवंत हे ही अपवाद नाहीत. अशा सरकारशी असहयोग पुकारला पाहिजे. सरकारचे पुरस्कार नाकारले पाहिजेत. पण जमिनीवरील चित्र वेगळे आहे. आंबेडकरी विचाराचे म्हणून घेत सावरकर व हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लोक आंबेडकरी चळवळ व समाजातून उभे राहत आहेत. संघ , भाजप हे जाणीवपूर्वक करीत आहे, हे फार दुदैवी आहे. 
       
  घटनाबाह्य सरकारला सहयोगही संविधान विरोधी कृतीच….!
 
              संविधान व लोकशाही विरोधातील लढा संघ, भाजपने अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे. या देशात आता केवळ नावासाठीच संविधान व लोकशाही उरली असल्याचे चित्र निर्माण झाले असून वस्तुस्थिती ही अशीच आहे. संवैधानिक संस्था सत्तेच्या बटिक झाल्या आहेत. अशा वेळी आंबेडकरी विचारवंत म्हणून घेणाऱ्यांनी हे सरकार स्थापन करीत असलेल्या कुठल्या ही समितीवर जाणे, अध्यक्षपद स्वीकारणे हा संविधान व लोकशाहीशी द्रोह आहे. डॉ. आंबेडकर यांच्याशी केलेली गद्दारी आहे. हे समजून घेतले पाहिजे. पण हे समजून घ्यायची व तशी कृती करायची कुवत नसेल, तर हे कसले विचारवंत ? उजवे विरुद्ध व डावे/पुरोगामी अशी सरळ विभागणी या देशातील सर्वच क्षेत्रात झालेली आहे. विचारवंतांची पण झालेली आहे. देशभर ते दिसत आहे. मधल्या काळात साहित्यिक, विचारवंत प्रज्ञा पवार यांनी या पेशवाई सरकारच्या विरोधात उभे राहत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज अशाच साहित्यिक व विचारवंतांची गरज आहे. सरकारचे लाभार्थी बनून त्यासाठी काम करणारांची नाही. 
         बाकी नरेंद्र जाधव हे विचारवंत सरकारी लाभार्थी या गटात मोडत आहेत. विचारधारा नसलेले ते विचारवंत आहेत. सरकारला हव्या तशा शिफारशी करण्यात त्यांच्या हातखंडा आहे. ते ज्या शिफारशी करतात, तशा शिफारशी अन्य कुणी करणार नाही, हे फडणवीस यांना माहित असल्यानेच त्यांनी या समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले आहे. सरकार धार्जिणे आणि जन विरोधी ही त्यांची गुणवत्ता आहे. शेतकरी दारू पितात म्हणून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, हा निष्कर्ष त्यांनीच काढलेला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही. शेती पंपासाठी वीज व पाणी देत नाही, हे नरेंद्र जाधव यांना दिसले नाही. अन् दिसले असले तरी ते त्यांच्या दृष्टीने खूप शुल्लक गोष्ट होती. 
         सदावर्ते ही तसा शुल्लक आहे. पण त्याच्या माध्यमातून अनाजी पंतांची पिल्लावळ जे काम करीत आहे, ते फार भयानक आहे. आज कुठल्या ही प्रसार माध्यमांवर तो डाव्या, समाजवादी व आंबेडकरवादी विचारांच्या प्रवक्त्यांना साधे बोलू ही देत नाही. त्यामुळेच तो शुल्लक आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे हे मूर्खपणाचे लक्षण असून असे दुर्लक्ष करणारे मूर्ख पावलोपावली आहेत. अधिक काही नाही. काळ सोकावतोय. हे मात्र नक्की.
…………………….
 
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी,
 महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *