• 131
  • 1 minute read

स्वातंत्र्य दिनी संविधान प्रास्ताविकेचे Preamble चे वाचन लाल किल्ल्यावरून व देशभरातील सर्वच ठिकाणच्या सर्वच कार्यक्रमात व्हावे !

स्वातंत्र्य दिनी संविधान प्रास्ताविकेचे Preamble चे वाचन लाल किल्ल्यावरून व देशभरातील सर्वच ठिकाणच्या सर्वच कार्यक्रमात व्हावे !

राष्ट्रगान, वंदेमातरम् सोबतच संविधान प्रास्ताविका Preamble चे वाचन करण्यात यावे !

            स्वातंत्र्य दिनाच्या सर्व स्तरावरील सर्व शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगान व वंदेमातरम् सोबतच संविधान प्रास्ताविका Preamble चे वाचन करण्यात यावे. संविधान जागरुकतेसाठी Preamble वाचन करणे आवश्यक आहे. वर्ष 2015 पासून केंद्र सरकारने, संविधान जागृती साठी,संविधान दिवस साजरा करणे सुरू केले आहे. शाळा , कॉलेजेस, विद्यापीठे व कार्यालयात दरवर्षी 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा केला जातो आणि preamble वाचले जाते.  
      संविधान जागृतीचा उपक्रम, देशात सर्वप्रथम वर्ष 2005 पासून नागपूर जिल्ह्यातून शाळेतून सुरू झाला. शाळेच्या भिंतीवर preamble लिहल्या गेले व रोज वाचन सुरु झाले.तसेच 26 नोव्हेंबर 2005 ला, संविधान दिवस साजरा करणे सुरू केले. मी , जिल्हा परिषदेचा सीईओ असताना माझे अधिकारात वर्ष 2005 मध्ये , वरील उपक्रम संविधान ओळख या नावाने कार्यान्वित केला. तो आता देशभर साजरा होऊ लागला आहे.
       स्वातंत्र्य दिनी , कार्यक्रमात राष्ट्रगान, वंदे मातरम् म्हटले जाते,. तसेच Preamble चे वाचन करण्यात यावे. Preamble चे महत्व खूप मोठे आहे. संविधानाचा आत्मा म्हणजे Preamble, प्रास्ताविका /उद्धेशिका हे संविधानाचे, ध्येय व उद्दिष्ट आहे, सार आहे, संविधानाची ओळख , पहिले पान आहे, मूलभूत ढाचा आहे. संविधान जागृती साठी, माननीय प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरून Preamble चे वाचन करावे, करून घ्यावे अशी विनंती आहे.
 
इ झेड खोब्रागडे भाप्रसे नि, संविधान फाऊंडेशन नागपूर.
2Shares

Related post

भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक – ऍड.  डॉ. सुरेश माने

भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक –…

भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक –…
एससी-एसटी-ओबीसीचे आमदार, खासदार, मंत्री खरोखर समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत काय?*

एससी-एसटी-ओबीसीचे आमदार, खासदार, मंत्री खरोखर समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत काय?*

समाजाच्या प्रश्नांसाठी सत्तेला जाब विचारण्याची राजकीय ताकद निर्माण झाली पाहिजे-ॲड. डॉ. सुरेश माने.* जालना : प्रतिनिधी…
……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……..ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !          …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *