• 146
  • 1 minute read

हि “वसुंधरा” माझी पण आहे !

हि “वसुंधरा” माझी पण आहे !

हि “वसुंधरा” माझी पण आहे !

चिमण्या , कावळे, पोपट, कबुतरे , मैना (हे मला माहित असलेले मुंबईकर पक्षी) आणि पक्षांच्या असंख्य प्रजाती 
गाई , बैल, म्हशी , कुत्रे , मांजरी असंख्य जलचर आणि जमिन-चर प्राणी आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती 
आणि असंख्य जीव जंतू , ज्यांची नावे अर्थातच मला माहित देखील नाहीत 
श्वास घेणाऱ्या अन्न, पाणी शोषणाऱ्या ,  सूर्यप्रकाश पिणाऱ्या  स्वतःचे अन्न स्वतः बनवणाऱ्या असंख्य सजीव झाडे वनस्पती यांच्या प्रजाती  आणि नद्या, नाले, समुद्र,  डोंगर, वाळवंटे, इत्यादी 
या पृथ्वीवर रांगणारी बागडणारी लहान मुले (आणि जी अजून जन्माला यायची आहेत पण ज्यांचे प्रतिनिधित्व करायला कोणी नाही) 
 
आपल्या परीने  आपल्या भाषेत, जी अर्थात आपल्याला माहित असणाऱ्या शब्दांची भाषा नाहीये,
आपण प्रौढ माणसांना सांगत आहेत कि हि “वसुंधरा” माझी पण आहे
आपण ऐकत नाही आहोत वरील सगळे त्यांची देखील आई असणाऱ्या “वसुंधरे”कडे आपल्याबद्दल तक्रार करत आहेत ; 
आई “वसुंधरा”आपले सगळे चाळे बघतेय ,
त्यांच्या तक्रारी ऐकतेय ; अधून मधून आपल्याला सांगतेय कि सुधारा 
आपण आपल्या धुंदीत आहोत , आईच्या सांगण्याकडे लक्ष देत नाही आहोत ;
एवढेच नाही तर आईच्या शरीराच्या देखील चिंधड्या करत आहोत 
एक दिवस ती आई वसुंधरा स्वतःलाच उध्वस्त करून घेईल , 
तिला खरेतर आपल्याला शिक्षा करायची असेल पण आपल्या कुकर्मामुळे अक्षरशः अगणित प्रजातीना आणि स्वतः वसुंधरेला किंमत मोजावी लागणार आहे 
तो पर्यंत २२ एप्रिल ला दरवर्षी वसुंधरा दिन साजरा करत राहू 
 
संजीव चांदोरकर 
0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *